प्रसंग
प्रसंग


माझे कुटुंब म्हणावे तर एकत्र, एकसंध व एकनिष्ठ, व माझ्या ह्या कुटुंबात काही प्रसंग हे अगदी वेगळे व आपणास पटण्यासारखे असावे तर असे मुळीच नाही. त्यातील एक सुंदर प्रसंग मी तुमच्यासमोर सांगू इच्छितो. ह्या प्रसंगातून तुम्हाला आमच्या कुटुंबातील प्रेम व आपुलकीचा नक्कीच सुगंध येईल. माझी आई मला सांगायची त्यानुसार मला माहित आहे की मी खूपच लहान होतो जेमतेम १ वर्षाचा, आणि आमच्या कॉलनीत मी जणू सर्वांचा लाडका होतो, सर्व जण मला घरातून आईला न सांगता बाहेर घेऊन जायचे, व आई मला सगळीकडे शोधायची व सर्वांना सांगायची की तुम्ही मला सांगत तरी जा की तुम्ही शुभमला कुठे घेऊन जात आहात. माझ्या कुटुंबात आम्ही चारजण... मी, माझा मोठा भाऊ, माझी आई व माझे वडील. आमच्या घरात माझ्यापेक्षा कोणी मोठं असल्याने जास्त लाड हे माझेच बाकी कोणाचेच नाही. माझ्यावर जास्तीत जीव कोणी लावला आहे तर ते माझे कुटुंब आहेतच पण त्याच बरोबर आमच्या शेजारी राहणारी व मला आईप्रमाणेच जीव व माया देणारी ती माझी आई होती, माझा सांभाळ करणे, माझे सर्व हट्ट पुरवणे व मला स्वतःच्या हाताचे गोडगोड पदार्थ खाऊ घालणे ह्या सर्व गोष्टी मला आठवतात, त्यावेळी मी लहान होतो पण कोणी माझ्यावर प्रेम केले व कोणी मला जास्तीत जास्त जीव लावला ह्याचे समोर उदाहरण माझ्याभोवतीच फिरत होते. खूप काही आनंदाचे क्षण मी माझ्या लहानपणी व्यतीत केले आहेत, त्यामध्ये तुम्हा सर्वांना मोलाचा वाट देखील समाविष्ट आहे.
आमचा परिसर हा मिश्रीत होता व त्यामध्ये काही विविध धर्मांचे माणसं सुद्धा वास्तव्यास होते, पण त्याकाळी कोणताही भेद आमच्या इथे कधीही उद्भवला नाही, सर्व एकोप्याने व आपुलकीने एकमेकांसोबत राहत असत. सर्व काही सुरळीत व एका सरळ गतीने व्यतीत होत होते, पण अचानक एका दिवसात असे काही घडले की कोणालाही विश्वास बसण्याजोगे नक्कीच नसावे. मी सर्वांचा लाडका असल्यामुळे मला कोणीही घरातून माझ्या आईला न सांगता बाहेर घेऊन यायचे, याचीच सवय मलासुद्धा लागली, मीही कधी कधी आईच्या नजरेत न येता पटकन बाहेर निघून यायचो, माझ्या ह्या सवयी बघून माझ्या आईने आमच्या दरवाज्याजवळ एक मोठी फळी लावून घेतली, माझ्याभोवती जणू कोणीतरी एक मोठी व मजबूत भिंतच उभी केली, दरवाज्यासमोर उभ्या केलेल्या ह्या फळीमुळे आईचे लक्ष माझ्यावर अगदी काटेकोरपणे केंद्रित होते, त्यामुळे माझे बाहेर जाणे ही बंदच झाले. पण त्यादिवशी का कळेना सकाळी आईने केर काढण्यासाठी ती फळी हटवली पण प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशी तिने दारावरील फळी पुन्हा लावलीच नाही, व त्यादिवशीच आपल्या कामानिमित्त रस्त्यावरुन जाणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीने मला बाहेरून हात दाखवला व दरवाज्यासमोर फळी नसल्या कारणाने मी त्यादिवशी घरातून रेंगत रेंगत बाहेर पडलो व त्या व्यक्तीचा पाठलाग करण्यास सुरवात केली, ते माझ्यापुढे व त्यांच्यापाठी मी, त्यांना वाटतं त्यादिवशी समजलेच नसणार की मी त्यांच्यापाठी आलो आहे असं, तुम्हा कोणालाच विश्वास बसणार नाही की मी रेंगत रेंगत त्यादिवशी चक्क आमच्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहचलो व तिकडेच मी अचानक थांबलो, व ज्यांच्यापाठी मी रेंगत रेंगत आलो होतो ते त्यांच्या कामानिमित्त रेल्वे पकडून आपल्या मार्गाने प्रस्थान झाले.
पण मी एकतर लहान व त्यामध्ये मला काही कळतही नव्हते, मी आपला मोठमोठ्याने रडायला लागलो, इथे तिथे ह्या माणसांची धावपळ व त्याबरोबरच स्टेशन म्हटले की ट्रेनचा आवाज व त्यासर्व गोष्टींना घाबरून मी त्याठिकाणी रडायला लागलो, व माझ्या आईला ह्या गोष्टी कळताच क्षणी तिने आमच्या शेजाऱ्यांना व त्याचबरोबर माझ्या वडिलांनासुद्धा तिने कळवले, माझा मोठा भाऊ ही त्याच क्षणी त्याच्या मित्रांसोबत शाळेतून घरी आला, व माझ्या आईने त्याला शेजारी ठेवले व ती त्याच क्षणी मला शोधण्यास निघाली, माझा मुलगा कसा असेल?, त्याला कोणती इजा तर झाली नसेल ना? असे व त्याहून भयानक विचार तिच्या मनी रुजत होते, तिने आजूबाजूला सर्वांना माझ्याविषयी विचारले पण त्यांच्यापैकी कोणालाही माझ्याबद्दल माहिती नव्हते, तिची शोधाशोध चालूच होती व दुसऱ्या ठिकाणी मी त्या रेल्वे स्टेशन व एकटाच, त्यावेळी काहीतरी करावे ह्याचे ज्ञान मला त्यावेळी नक्कीच नव्हते, तरीही मी रेंगत रेंगत त्याठिकाणी प्रदक्षिणा मारत होतो. वेळ अगदी विचित्र होता व पण आई-मुलामधील नातं हे अत्यंत मजबूत व कायम होते. माझ्या आईला बघण्यासाठी एक वेगळीच तळमळ माझ्या मनात निर्माण होत असावी असे मला तरी वाटत आहे. आमच्या घरातील सर्वजण मला शोधण्यासाठी तितर-बितर झाले होते असे आईने मला सांगितले होते. शोधमोहीम ही आमच्या परिसरापुरतीच नव्हे तर त्या ठिकाणाहून संलग्न असणाऱ्या सर्व ठिकाणी सुरू होती. सर्वजण जीव मुठीत घेऊन मला शोधत होते, माझ्या नावाचा उल्लेख हा सर्व ठिकाणी होत होता, पण त्यातून एक चांगली गोष्ट अशी घडली की स्टेशनवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी मला त्यांच्या बैठीस्थानी ठेवले. अगदी दिवस मावळत्या क्षणी येऊन ठेपला होता पण माझा अजूनही कोणताच पत्ता लागला नव्हता. पण त्या मावळत्या क्षणी एक अविस्मरणीय घटना घडली ती म्हणजे त्यावेळी आमच्या कुटुंबातील एका सदस्याने मला तिथे पाहिले व अत्यंत चकित भावनेने माझ्याकडे काही वेळ पाहतच राहिले व थोड्या वेळाने त्यांना विश्वास पटला की तो मीच होतो, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब तेथील पोलीस निरीक्षकांना ह्याची माहिती सांगितली व आपले ओळखपत्र दाखवून मला तेथून घेऊन घराकडे प्रस्थान केले.
आमच्या इकडचे लोक सांगतात की मी जेव्हा घरी नव्हतो त्यावेळी माझ्या आईची हालत की खूप बिकट व अत्यंत भीतीदायक झाली होती, तिला फक्त तू तिच्या डोळ्यासमोर पाहिजे होतास बाकी कोणी नाही, खूप प्रेम करते रे तुझी आई तुझ्यावर कधीही तिला तुझ्यापासून दूर करू नकोस, नेहमी तिला तुझ्यासोबतच ठेव. मी माझ्या घराकडे पोहचताच माझ्या आईने मला कडक अशी मिठी मारली व मला प्रेमापोटी ओरडली की "कुठे गेला होतास तू?, तुला माहीत आहे की मी किती घाबरले होते तुला इथे न बघून… तुला माहीत आहे का बोल?" असे प्रश्न जणू ती जिवाच्या आकांताने मला विचारत होती व तितकीच घट्ट मिठी तिने मला मारली होती, त्यातच तिचं घाबरणसुद्धा बंद झालं व जे मला घरी घेऊन आले, त्यांचेदेखील आईने आभार मानले व त्यांना दुसऱ्या दिवशी जेवणासाठी आमंत्रण दिले. आईचे प्रेम व ती करत असलेली माया ही ह्या जगात जणू कोणीही करू शकणार नाही, त्यामुळे आपल्या आईला सांभाळ व आपल्या वडिलांचीदेखील काळजी घ्या व त्यांना कधीही आपल्यापासून दूर करू नका.
एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की प्रेमासाठी व आपुलकीसाठी आपल्या मुलांसोबत ते राहत असतात, त्यांना पदोपदी आपली प्रगती बघायची असते व आपण करत असलेल्या मेहनतीचं चीज व त्यांनी केलेल्या मेहनतीचं चीज ह्याचे फळ त्यांना नक्की द्या व ते सुखी म्हणजे आपणदेखील हे लक्षात ठेवा, व त्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात करा.