कू.शुभम संतोष केसरकर

Drama

3  

कू.शुभम संतोष केसरकर

Drama

देवाचिया द्वारी

देवाचिया द्वारी

4 mins
11.6K


मानावे कोणी व ऐकावे कोणी, आणि ऐकले तरी समजवावे कोणी, या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यावे कोणी, याप्रकारची परिस्थिती आज उद्भवत आहे. संकट हे मोठे, मातही करू शकतो, जाण आपल्यात ठेवा, सर्व काही सोपे आहे. या सर्व गोष्टी आपल्याला कळत असूनही त्याप्रमाणे कोणीही वागत नाही, समांतर अशी ही परिस्थिती आमच्याच कॉलनीत घडावी हा केवळ योगायोग म्हणावा.


संकटाचे सावट जेव्हा येण्यास प्रारंभ होत होता त्याचवेळी सुयशला बाहेर देशातून नोकरीसाठी पत्र पाठवण्यात आले व त्यापत्रात सरळ सरळ लिहिले होते की तुम्हाला ताबडतोब नोकरीसाठी इथे यावं लागेल. संकट हे समोर दिसत होते, पण पोटाचाही प्रश्न त्यापुढे होता. सुयशने कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता, तो नोकरीसाठी बाहेरगावी जाण्यास तयार होता. आईचे बोलणे त्याने ऐकलेच नाही. स्वतःवर विश्वास ठेवून तो बाहेर गावी जाण्यास तयार आहे, असे त्याने सर्वांना सांगितले व तो पुढच्याच क्षणी बाहेरगावी गेला. पुढे कोणते संकट असेल याचे त्याला भान राहिले नाही, भान असे बोलण्यापेक्षा परिस्थितीकडे त्याने दुर्लक्ष केले. अगदी एका आठवड्यानंतर, देशातील विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व जगभरात घातलेल्या थैमानामुळे सर्व देश हे Lockdown झाले. प्रत्येक देशातील प्रधानमत्र्यांनी केलेल्या भाषणातून एवढेच कळत होते की संपूर्ण देश हा Lockdown झाला आहे व कोणालाही कुठेही जाता किंवा फिरता येणार नाही, सर्वांनी आपल्या घरीच बसून राहावे, असे सर्वत्र सांगण्यात येत होते.


सुयशची आई घाबरत घाबरत त्वरित आमच्याजवळ आली व तिने सांगितले की, सुयशला मी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे पण तो काही उत्तर देत नाही, तू त्याला पुन्हा एकदा संपर्क करून विचार की, तो कुठे आहे व कसा आहे. कारण त्याच्या काळजीपोटी एक अन्नाचा कणही खाली उतरत नाही, आठवड्याभरात तो स्वतःहून संपर्क करत होता, पण काही दिवसांपासून त्याने एकदाही मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही, आता मी काय समजू, कुठे असेल तो...


तेव्हा मी त्यांना बोललो की, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो तो कुठे आहे. आता माझ्यासमोर असा प्रश्न निर्माण झाला की या Lockdown काळात मी त्याला कसं शोधू, तो कुठे जात आहे तेही त्याने आम्हाला सांगितले नव्हते. मी क्षणांचाही विलंब न करता पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पण पोलीस स्टेशनला जात असताना कित्येकांनी मला अडवलं. रहदारी दिसणाऱ्या या रस्त्यावर संपूर्ण काळोख व लांब लांबपर्यंत कोणीही दिसत नव्हते. मी अखेरीस पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्यांना या सर्व गोष्टीची कल्पना दिली. त्यांनी सांगितले की या LockDown मध्ये त्याला शोधणे आणि तो मिळाला तरी त्याला आणायचे कसे?? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.


मी पुन्हा घरी आलो. सुयशच्या घरी गेलो, त्याच्या आईला भेटलो, त्यांच्याशी विचारपूस केली असता, त्यांच्या Room मध्ये एक पत्र सापडलं व त्या पत्रात दुबई या देशाचा उल्लेख होता. मी त्वरित पोलीस स्टेशन गाठले, त्यांना मी सुयशचं पत्र व सुयशची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवले व त्यांच्याकडून एवढेच सांगण्यात आले की सुयशला परत आणणे खूप धोक्याचे आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही स्थगित केली आहे, त्यामुळे आता त्याला आणणे खूपच कठीण आहे.


पोलिसांनी दिलेल्या या उत्तरानंतर आम्ही पुन्हा नैराश्य भावनेने आमच्या घरी आलो. आम्ही घरी आलो हे कळताच, सुयशची आई त्वरित घरी आली व आम्हाला विचारण्यास सुरुवात केली. आम्ही आता तिला काय सांगू या प्रश्नात गुंतलो होतो. पण जे खरं आहे ते सांगणं खूप महत्त्वाचं होतं. आम्ही सुयशच्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या, ते ऐकताच ती अगदी खचून गेली. ती एकही शब्द आपल्या मुखातून न काढता आपल्या घराच्या दिशेने गेली. दोन-तीन दिवस आम्ही पोलिसांना सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो, पण काही उत्तर मिळत नव्हते. सुयशच्या आईने स्वतःला घरीच कोंडून घेतले होते. आम्ही सर्वांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ती काहीच न बोलता शांत होती. फक्त देवाकडे एकच मागणे होते की, तिच्या मुलाला त्यांनी या संकटातून पुन्हा माझ्याजवळ आणावे. आठवडा गेला, रुग्णांची संख्या वाढत होती. आम्हीही आता तो विषय पुन्हा पुन्हा काढत नव्हतो.


सर्व काही सुरळीत सुरू होते आणि त्यामध्येच एक नवीन न्यूज आमच्यापर्यंत पोहोचली ती म्हणजे सरकारतर्फे जे भारतीय बाहेर देशात अडकले आहेत, त्यांना मायदेशी आणण्यासाठीचा हा निर्णय होता व काही दिवसांनी सुयश भारतात आला व काही दिवसांसाठी त्यास एका वसतीगृहात ठेवण्यात व त्यानंतर त्यास सोडण्यात आले व तो आपल्या घरी आला. घरी येताच त्याने पाहिले की त्याची आई देवाकडे प्रार्थना करत आहे. सुयशने लगेचच आपल्या आईला मिठी मारली. आधी त्याच्या आईला खरे वाटलेच नाही की तिचा मुलगा पुन्हा इथे आला आहे. नंतर तिने स्वतःहून त्याला कुशीत घेतले. देवाचे तिने आभार मानले. सुयशचेही कर देवासमोर जुळले व नंतर दोघेही माय-लेक आनंदाने हे क्षण जगत राहिले. मागचं सगळं विसरून सुयशनेही ठरवले की आपल्या मायभूमीतच कार्य करावे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama