SHUBHAM KESARKAR

Abstract

3  

SHUBHAM KESARKAR

Abstract

मित्र

मित्र

3 mins
356


एका गावात दोन तरुण राहत असत , एकाच नाव होतं घनश्याम आणि एकाच नाव होतं श्याम. दोघेही अत्यंत जिवलग आणि लहानपणापासून एकाच गावात वाढलेले आणि शिकलेले सुद्धा , कोणत्याही कामात एकमेकांची ते मदत घेत असत , कधीही नाही , नको , मी नाही करणार असे उद्गार त्यांच्या तोंडून कधीही निघत नसत , अत्यंत चपळ आणि हुशार. शाळेतील त्यांचा प्रवास एकत्र , महाविद्यालयात सुद्धा आणि योगायोग म्हणजे दोघांनाही एकाच शहरात काम मिळणं आणि ते पण एकाच कंपनीत. दोघेही अत्यंत आनंदात आणि उत्साहात सुद्धा , त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा आता कोणतीच भीती नव्हती कारण दोघेही पुढे जाऊन एकाच कंपनीत काम करणार होते आणि एकाच घरात सुद्धा राहनार होते. दोघेही गावातून शहराकडे येण्यास निघाले आणि आपल्या कामावर रुजू झाले. बघता बघता दोघांनाही त्या कंपनीत सहा महिने पूर्ण झाले. जाताना एकत्र , जेवताना एकत्र आणि चक्क घरी येताना सुद्धा एकत्र. काही दिवसांसाठी श्याम काही कागदपत्रांच्या कामासाठी काही दिवसांसाठी गावी यावं लागलं आणि काही दिवसांनंतर तो पुन्हा शहराकडे आला. शहराकडे येण्याअगोदर त्याने घनश्यामला भरपूर कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याने काही कॉल उचले नाही. श्यामने विचार केला की कोणत्यातरी कामात व्यस्त असेल त्यामुळे त्याला कॉल घेणं जमत नसेल. श्याम आपल्या रुमपाशी येऊन बघतो तर घनश्याम हा घाबरलेल्या अवस्थेत , एका टेबल खाली बसून होता , घनश्यामने ते बघताच त्याला तिथून बाहेर काढले आणि त्याला आधी पाणी देऊन नंतर त्याच्याकडून जाणून घेतले की झाले तरी काय , तू एवढा का घाबरला आहेस.घनश्यामने आधी सांगण्यास नकार दिला पण जेव्हा श्यामने आपल्या मैत्रीची शप्पथ दिली तेव्हा त्याने सांगितलं की काही माणसं तू नसताना आपल्या घरी आले होते आणि चोरीच्या उद्देशाने खिडकीमधून आता येण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना बघताच मी दार खिडक्या पूर्णपणे लावून घेतले आणि इथे येऊन लपलो , त्यांच्या हातात काही धार धार शस्त्र आणि ते मला मारण्याचा प्रयत्न करत होते. मी प्रचंड घाबरलेलो.श्याम ने ह्या सगळ्या गोष्टी ऐकताच थेट पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आणि ह्यासगळ्या गोष्टी सांगितल्या. पोलिसांनी योग्य ती कारवाई करू असे श्यामला सांगितले आणि दुसऱ्या दिवशी श्यामची नाईट शिफ्ट होती आणि घनश्यामहा घरीच होता आणि झोपला होता. श्यामने कामाला जाताना सर्व काही लावून घेतले आणि तो निघाला. रूम खाली येताना त्याला दिसते की दोघे जण घरावरती पाळत ठेवत आहेत आणि तो काहीच न बोलता तिथून पुढे जातो आणि थेट पोलिसांना कॉल करून त्यांना ह्याबद्दलची माहिती देतो. श्याम घरी येत असताना तो बघतो की दोघे जण खिडकी उघडून आत शिरत आहेत आणि तेवढ्यात घनश्यामचा जोरात ओरडण्याचा आवाज येतो आणि पोलिसांसोबत आलेला श्याम घरी पळत जातो आणि तेवढ्यात बघतो की एक माणूस घनश्यामला चाकूने मारत असतो तेवढ्यात श्याम तिथे येऊन स्वतःला घनश्याम पुढे घेऊन येतो आणि ते चाकू चुकून श्यामला लागते आणि तेवढ्यात पाठून आलेले पोलीस चोरांना पकडते आणि अरेस्ट करून घेऊन जाते आणि श्यामला लगेच रुग्णालयात भरती करतात पण सुदैव म्हणजे श्यामला छोटा मार लागलेला असतो आणि तो लगेच बरा होतो. घनश्याम हे बघून अत्यंत आनंदी आणि स्वतःला नशीबवान मानतो की त्याला श्याम सारखा मित्र भेटला आणि ते दोघे काही दिवसांसाठी आपल्याला गावी निघून येतात आणि एकत्र मिळून व्यवसाय सुरू करतात आणि नेहमी एकत्र राहतात. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract