Apurva Jadhav

Abstract

3  

Apurva Jadhav

Abstract

ठिकाण

ठिकाण

3 mins
426


आज पुन्हा ती तिथे गेली. भावनांच्या गर्दीत हरवून आठवणीत रमली.तेवढ्यात तिचं लक्ष समोर असलेल्या पुस्तकांच्या कपाटाकडे गेलं.ती त्या कपाटाकडे गेली आणि त्यातील एक पुस्तक काढून घेतल.त्या पुस्तकाचे नाव 'आयुष्य:एक मायाजाल'असे होते.मानवाचं आयुष्य आणि त्याची मानसिकता,यावर आधारित ते पुस्तक होत.त्यात असे लिहिले होते की,"मानवाच जन्म आणि मरण हे केवळ एक माया आहे.जन्माचा आनंद आणि मरणाचं दुःख ही मानवाची मानसिकता आहे. हे सर्व ती शांतपणे वाचत होती.शेजारी असलेल्या खुर्ची वर ती बसली,आणि काही तरी विचार करु लागली.इतक्यात तिचं लक्ष तिच्या बाबांच्या फोटोकडे गेलं आणि ती ढसाढसा रडू लागली.ती त्या फोटोकडे बघत रडत-रडत एकसारखी म्हणत होती,"का,का तुम्ही आम्हाला सोडून गेलात?तुम्हाला आमची ही अशी अवस्था बघवते?नाही ना?मग याना परत.


      संध्या ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे.सहसा जस एका मध्यमवर्गीय कुटुंबाच आयुष्य असतं,तसंच तिच्या कुटुंबाच ही होत.पण ते म्हणतात ना आपलं आयुष्य कधी,कुठलं वळण घेईल हे नाही सांगता येत.एक अपघात आणि संपूर्ण कुटुंब बिथरले.एका भयंकर रस्ता अपघातात संध्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.त्यांच्या घरात शोकाकूल वातावरण पसरलं.या धकक्यातून सावरण त्यांच्यासाठी खुप अवघड होत.पण शेवटी आयुष्य ते आयुष्य च ते थांबवता तर येत नाही. तिन्ही भावंडांमध्ये संध्या थोरली असल्यामुळे तिने पुढाकार घेऊन घराची जबाबदारी स्वीकारली. हळूहळू ते कुटुंब सावरलं.पण आठवणी कधीच मरतं नसतात.संध्याला जेव्हा ही तिच्या बाबांची आठवण यायची तेव्हा ती त्यांच्या खोलीत जाऊन बसायची.तिला असं वाटायच की त्या ठिकाणी तिच्या बाबांच अस्तित्व आहे.


      आजही गेली आणि एकटीच फोटोकडे बघून बोलत बसली.इतक्यात तिला तिच्या बाबांचा आवाज ऐकू आला.तिने विचार केला कदाचित आपला भास असावा.पण मागे वळून पाहताच तिला तीचे बाबा दिसले.तिला कळेना हे सत्य की भास.तीचे बाबा म्हणाले,"संध्या,सत्य-भास याचा विचार नको करु.बघ मी आलोय".हे सगळं पाहून संध्या गोंधळून गेली.आता काय बोलावं हे तिला कळतं नव्हतं.ती धावतच तिच्या बाबांकडे गेली आणि त्यांना घट्ट मिठी मारली.तिने तिच्या बाबांना विचारलं,"तुम्ही कायमचे परत आलात ना?आता तुम्ही आम्हाला सोडून नाही ना जाणार"? त्यावर तिचे बाबा म्हणाले,"परत तर जावं लागणारच.पण तु हताश नको होऊ.आजचा पूर्ण दिवस मी इथेच थांबणार आहे".त्यावर संध्या थोडी निराश आणि थोडी खुश झाली.तिने तिच्या बाबांना तिच्या शेजारी बसवलं आणि त्यांच्या सोबत मनसोक्तपणे गप्पा मारू लागली.ती आज खुप खुश होती.तेवढ्यात तिच्या बाबांनी तिच्या हातात भेट म्हणून एक अंगठी दिली.बोलून-बोलून ती आता थकली होती,त्यामुळे ती तिच्या बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपी गेली.


      सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिच्या आजुबाजुला कोणीचं नव्हत.तिला कळत नव्हतं काल जे घडलं ते सत्य होत की स्वप्न.तेवढ्यात तिच लक्ष त्या अंगठी कडे गेलं जी तिच्या बाबांनी काल तिला दिली होती.ती विचार करु लागली की काल घडलं ते नेमकं काय होत.तेव्हा तिला तिच्या बाबांच वाक्य आठवलं,"सत्य-भास याचा विचार नको करू".आणि तिने ती अंगठी तिच्या बोटात घातली.ती त्या अंगठीकडे बघून हसली आणि म्हणाली,"बाबा,आता या अंगठीच्या रुपात तुम्ही कायम माझ्या सोबत आहात".


      संध्यासोबत जे घडलं ते सत्य होत की भास हे कोणालाच माहित नाही.पण विज्ञानात एक वाक्य आहे "Energy cannot be created and nor be destroyed".या वाक्याचा अर्थ असा की,"उर्जा ना तर निर्माण होऊ शकते,नाही नष्ट".मग मरणासोबत मानवाच अस्तित्व पूर्णपणे नष्ट होत का?मानवाचं शरीरही एक प्रकारची उर्जाच आहे ना.पण या प्रश्ननाच उत्तर आत्तातरी कोणाकडेच नाहीये.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract