Apurva Jadhav

Others

2  

Apurva Jadhav

Others

थंड

थंड

4 mins
185


      बघता बघता नोव्हेंबर महिना आला आणि हिवाळा सुरू झाला.हिवाळा म्हणजे माझा सगळ्यात आवडता ऋतू.काय वातावरण असतना हिवाळ्यात,एकदम झकास!आपण अगदी थंडीने कुडकुडलो तरी हिवाळा आपल्याला हवाहवासाच वाटतो.एक वेगळीच नशा असते त्या थंडीत.आजही अगदी तसंच वातावरण आहे.हे वातावरण बघून मला मागच्या वर्षीचा हिवाळा आठवला.मागच्या वर्षीची आमची महाबळेश्वरची ट्रीप आणि त्या ट्रिपमुळे आम्ही टाकलेला चहाचा स्टॉल.तो दिवस आजही आठवतो मला.ते हिंदीत म्हणतात ना 'गुलाबी ठंड' अगदी तसच वातावरण होतं.त्या दिवशी आम्ही सर्व मित्रमंडळींनी महाबळेश्वरला स्टे केला होता.त्यादिवशी रात्रीचे दहा वाजले होते आणि आम्ही महाबळेश्वरच्या रस्त्यांवर फिरत-फिरत थंडीची मजा घेत होतो.त्या दिवशी आम्ही सगळेच थंडीने कुडकुडत होतो,पण तरीही सगळ्यांना फिरायचे होते.कोणीही हॉटेलवर परत जायला तयार नव्हतं.तिथे फिरत असताना आम्हाला एक आज्जी दिसल्या.त्या थंडीने कुडकुडत होत्या त्यांच्याकडे अंगाभोवती पांघरून घ्यायला काहीच नव्हते.शेजारीच एक शालचे दुकान होते.आम्ही तिथून एक शाल खरेदी केली आणि त्या आज्जींना दिली.त्या आज्जी खूप खुश झाल्या.तेवढ्यात माझा एक मित्र म्हणाला,"अरे समोर चहाचा स्टॉल आहे.चला ना आपण चहा प्यायला जाऊ".आम्ही सगळे स्टॉलकडे जायला निघालो.आम्ही जात असताना त्या आज्जी आमच्याकडेच बघत होत्या.त्या आम्हाला काही म्हणाल्या नाही,पण मला कळाले की त्यांनाही चहा प्यायचा होता.त्यामुळे मी त्यांनाही सोबत घेतले.


मी सगळ्यांसाठी चहा मागवला.चहा येईपर्यंत आमच्या गप्पागोष्टी रंगल्या.बोलता बोलता त्या आज्जींने आम्हाला सांगितले की त्यासुध्दा मुंबईच्याच आहेत.हे ऐकल्यानंतर आमचा त्यांना पहिला प्रश्न हाच होता की जर त्या मुंबईच्या आहेत तर इथे काय करत आहेत?आणि अश्या रस्त्यावर का बसल्या होत्या?तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की,त्या चुकुन महाबळेश्वरला आल्या होत्या.त्यांना वाचता येत नसल्याने त्या मुंबईऐवजी महाबळेश्वरच्या एस.टी मध्ये बसल्या.त्यांनी सांगितले की त्या आधी ज्या हॉटेलवर काम करायच्या,ते हॉटेल बंद पडल्यामुळे मालकाने त्यांना त्यांच्या पुण्याच्या मित्राच्या हॉटेलवर कामासाठी पाठवले.तिथे तीन महिने काम केल्यानंतर मालकाने त्यांना कामावरून काढले.त्यामुळे त्या मुंबईला परत जाण्यासाठी निघाल्या होत्या.पण चुकुन महाबळेश्वरला पोहोचल्या.आता मुंबईपर्यंत जाण्या इतके पैसेही त्यांच्याकडे नव्हते.आम्ही गप्पा मारत होतो इतक्यात चहा आला.आम्ही सगळ्यांनी चहा प्यायला.त्या चहाची चव काहीतरी वेगळीच होती.आम्ही त्या चहावाल्या दादांना विचारले की,तो कोणत्या प्रकारचा चहा होता आणि त्या चहाला काय म्हणतात?तेव्हा त्यांनी सांगितले की,त्या चहाला 'हिवाळी चहा' म्हणतात.आम्हा सगळ्यांना तो चहा खूप आवडला.आम्ही त्या आज्जींना मुंबई पर्यंत जाण्यासाठी पैसे दिले.आज्जींना एस.टी मध्ये बसवून आम्ही सगळे हॉटेलवर परत गेलो.हॉटेलवर गेल्यावर सुद्धा त्या हिवाळी चहाची चव माझ्या जिभेवर रेंगाळत होती.काय माहीत का?पण मला असे वाटत होते की,आपणही एक चहाचा स्टॉल सुरू करावा.नंतर मी विचार केला की,मला कुठे एवढा छान चहा बनवता येतो.मी जर चहा बनवला तर माझे स्टॉल सुरू व्हायच्या आधीच बंद पडेल.त्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त विचार न करता झोपी गेले.दुसर्‍या दिवशी आम्ही महाबळेश्वरहुन मुंबईला परत आलो.मुंबईला परत आल्यावरही,मला सारखं असं वाटत होतं की आपला एक चहाचा स्टॉल असावा.


      दोन महिन्यांनंतर आम्ही सर्व मित्र जेव्हा बाहेर फिरायला गेलो होतो,तेव्हा आम्हाला त्या महाबळेश्वरवाल्या आज्जी दिसल्या.त्या आम्हाला बघून खूप खुश झाल्या.त्यांनी आमच्या सगळ्यांची अगदी प्रेमाने विचारपूस केली.त्या आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेल्या.एका छोट्याशा खोलीत त्या एकट्याच राहायच्या.त्यांनी आमच्यासाठी चहा बनवला.आम्ही जेव्हा तो चहा प्यायला तेव्हा आम्हाला आज्जींचा चहा त्या हिवाळी पेक्षाही जास्त आवडला.तो चहा खूप स्वादिष्ट होता.आज्जींच्या हातचा चहा पिऊन माझ्या डोक्यात एक विचार आला.मी घरी गेले आणि बाबांना सांगितले की,मला एक चहाचा स्टॉल सुरू करायचा आहे आणि तिथे चहा त्या आज्जीच बनवतील.मी त्या आज्जींबद्दल बाबांना आधी सांगितले होते त्यामुळे त्यांनी मला स्टाॅल टाकण्याची परवानगी दिली.मी ती गोष्ट माझ्या मित्रांना सांगितली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून स्टॉल सुरू करण्याचे ठरवले.आम्ही त्या आज्जींकडे गेलो आणि त्यांना विचारले की,त्या आमच्या स्टॉलवर चहा बनतील का?तेव्हा त्यांनी आनंदाने होकार दिला.मी त्यांना विचारले की त्या चहामध्ये असं काय मिसळतात की ज्यामुळे चहा इतका टेस्टी होतं.तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांना एक विशिष्ट प्रकारचा मसाला बनवता येतो.तो त्यांना त्यांच्या आज्जीने बनवायला शिकवला होता.तो मसाला चहामध्ये मिसळल्यानंतर चहाला खूप छान चव येते.तेव्हा आम्ही आज्जींना विचारले की,आपण आपल्या चहाचं नाव काय ठेवायचं?तेव्हा त्यांनी सांगितले की,त्या ज्या प्रकारचा चहा बनवतात त्या चहाला सप्तमसाली चहा असे म्हणतात.त्यामुळे आम्ही आमच्या चहाचे नाव 'सप्तमसाली' ठेवायचे ठरवले.आम्ही त्यांना विचारले की त्या चहाचे नाव सप्तमसाली चहा असे का आहे?तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की,त्या चहामध्ये जो मसाला वापरतात तो एक मसाला सात वेगवेगळ्या मसाल्यांपासून तयार केला जातो.त्यामुळे त्या चहाचे नाव सप्तमसाली असे आहे.


      काही दिवसांनंतर आमच्या कॉलेजच्या बाहेर आमचा चहाचा स्टॉल सुरू झाला.आमच्या कॉलेजमधल्या मित्रांना तर,आमचा चहा खूप आवडू लागला.चहा प्यायल्यावर सर्वजण अज्जींच खूप कौतुक करू लागले.आज्जींना तर माहीतच नव्हते की त्यांच्या हाताला इतकी चव आहे.पण आमच्या स्टॉलच्या माध्यमातून त्यांच्या चहाचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं.थंडीच्या महिन्यात तर लोकं आवर्जून आमच्या स्टॉलवर चहा प्यायला येतात.आम्ही टाकलेला स्टॉल,जो आजही उत्तम रित्या सुरु आहे,प्रसिध्द आहे.त्या प्रसिद्धचे श्रेय आज्जींना,महाबळेश्वरच्या ट्रिपला आणि हो,थंडीलाही जात बरं का.


Rate this content
Log in