Apurva Jadhav

Others

3  

Apurva Jadhav

Others

सौंदर्य

सौंदर्य

2 mins
357


   नमस्कार मी पत्रकार आहे.आम्ही महाराष्ट्रात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना,बातम्या या नागरिकांसमोर आणतो.पण मागील महिन्यात काही वेळासाठी आम्ही बातम्या,घटना या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला होता.त्या उपक्रमाचे नाव होते,'शोध सौंदर्याचा'.आम्ही एक सर्वेक्षण केले.त्या सर्वेक्षणात आम्ही जनतेला,सौंदर्य म्हणजे काय?हा एक छोटासा प्रश्न विचारला. 

या सर्वेक्षणाला जनतेने चांगलाच प्रतिसाद दिला.काहींनी सौंदर्य म्हणजे गोरा रंग,श्रृंगार,काळेभोर केस असे उत्तर दिले.तर दुसरीकडे काहींनी सौंदर्य म्हणजे कर्तुत्व,कर्म,प्रामाणिकपणा असे उत्तर दिले. पण त्यांच्यापैकी एकाने अनोखे आणि वेगळे उत्तर दिले.ते उत्तर होते,सौंदर्य म्हणजे स्मितहास्य. ते उत्तर अगदीच वेगळे होते.आम्ही त्यांच्याशी संपर्क केला.त्यांनी दिलेल्या अनोख्या उत्तराबद्दल आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.आम्हाला त्यांचे सौंदर्या बद्दलचे विचार खूप आवडले.म्हणून आम्ही त्यांची मुलाखत घेण्याचे ठरवले.


      ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेत मुलाखतीला सुरुवात झाली.आम्ही ज्यांची मुलाखत घेत होतो,त्यांचे नाव पुरुषोत्तम देशमुख असे होते.ते एक सामाजिक कार्यकर्ता आणि लेखक होते.समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी,या समाजाची मानसिकता,अश्या अनेक विषयांवर त्यांचे लेख आहेत.आमचा त्यांना पहिला प्रश्न असा होता की,त्यांच्या मते स्मितहास्य म्हणजेच सौंदर्य असे का?त्यावेळी त्यांनी आम्हाला दोन चित्र दाखवले. एका चित्रात,एक गोर्‍या रंगाची मुलगी उदास आणि चिंतीत होती.दुसऱ्या चित्रात एक सावळ्या रंगाची मुलगी होती.तिच्या चेहर्‍यावर स्मितहास्य होते.पुरुषोत्तम यांनी आम्हाला उलट प्रश्न केला की,या चित्रात कोणती मुलगी सुंदर दिसत आहे?त्यावर आम्ही दुसऱ्या चित्रातली मुलगी असे उत्तर दिले.हे ऐकल्यावर पुरुषोत्तम हसले आणि म्हणाले,"तेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे.सौंदर्य म्हणजे रंग किंवा चेहरापट्टी नसते.सौंदर्य एक प्रकारची प्रसन्नता आहे आणि ती प्रसन्नता आपल्याला दुसऱ्या चित्रात पाहायला मिळते.दुसर्‍या चित्रातील मुलगी रंगाने सावळी आहे पण तिच्या चेहर्‍यावर स्मितहास्य आहे.तिच्या चेहर्‍यावरील स्मितहास्यामुळे तिचे सौंदर्य बहरून आले आहे.त्यामुळे ती सुंदर दिसत आहे.दुसऱ्या चित्रातील मुलगी रंगाने गोरी आहे पण तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य नाही.त्यामुळे तिचे सौंदर्य दिसून येत नाही.या जगात असा कोणताच चेहरा नाहीये जो हसल्यानंतर सुंदर दिसत नाही. माझ्या मते जर आपल्याला सुंदर दिसायचे असेल तर कोणतेही कॉस्मेटिक्स वापरण्यापेक्षा चेहऱ्यावर एक स्मितहास्य फुलवले पाहिजे.आपण आपोआप सुंदर दिसू". पुरुषोत्तम देशमुख यांचे सौंदर्या बद्दलचे विचार ऐकून आम्हाला त्यांचे खुप कौतुक वाटले.आमच्या या सर्वेक्षणामुळे सौंदर्याची वेगळी बाजू या समाजासमोर आली,याचा आम्हाला अभिमान आहे.


Rate this content
Log in