Apurva Jadhav

Others

3  

Apurva Jadhav

Others

रंगपंचमी

रंगपंचमी

5 mins
375


      रंगपंचमीचा सण म्हणजे आनंद,उत्साह आणि मस्तीचा आहे.पण काहीकाही वेळी त्याच रंगपंचमीच्या रंगांमुळे आपण गोंधळूनही जातो.सर्वांचे रंगलेले चेहरे पाहून आपण गोंधळून जातो की हा नेमका कोण.अशीच एक गोंधळून सोडणारी रंगपंचमी परांजपेंच्या घरातही साजरा करण्यात आली होती.परांजपे ठाण्यातील प्रसिद्ध उद्योगपती होते.रंगपंचमी साजरी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना त्यांच्या बंगल्यावर आमंत्रिण केले होते.रंगपंचमीच्या दिवशी सर्वजण बंगल्यावर आले.पाहुण्यांमधील नाईक आणि शिंदे हे दोन कुटुंब परांजपेंच्या खूप जवळचे होते.नाईकांची आयशा आणि शिंदे यांचा अभिमन्यू हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते.पण आयशाच्या मनात मात्र काहीतरी भलतंच होतं.परांजपेंनी पाहुण्यांचा पाहुणचार केला आणि मग काही वेळाने रंगपंचमीचा कार्यक्रम सुरू झाला.सर्वांचे चेहरे रंगलेले होते.कोण परांजपे,कोण शिंदे,कोण नाईक काहीच कळत नव्हते.इतक्यात तिथे अभिमन्युची मैत्रीण रसिका आली.अभिमन्यूच्या घरी रसिका तिची अंगठी विसरून गेली होती.ती अंगठी घेण्यासाठी रसिका परांजपे यांच्या बंगल्यावर आली होती.तिने अभिमन्युला बाहेर येऊन अंगठी देऊन जायला सांगितले.अभिमन्यू ने तिला होकार दिला आणि तो बाहेर जायला निघाला.इतक्यात त्याच्या बाबांनी त्याला अडवून एक काम सांगितले.तेव्हा त्याने सांगितले की तो रसिकाला तिची अंगठी परत करायला चाल्ला आहे.तेव्हा त्याच्या बाबांनी हे काम एका छोट्या मुलाला करायला सांगुन त्याला व्यवस्थित समजावले की ती अंगठी कोणाला द्यायची आहे.पण तरीही तो छोटा असल्यामुळे गोंधळून गेला आणि ती अंगठी त्याने रसिकाला द्यायच्या ऐवजी आयशाला दिली.अभिमन्यू ला वाटले की अंगठी रसिकाला मिळाली त्यामुळे तो कार्यक्रमात रंगला.तिकडे रसिकालाही एक महत्त्वाचा कॉल आला,त्यामुळे तिलाही निघावं लागलं.तिने विचार केला कि,अंगठी ती अभिमन्यू कडून उद्या घेईल.पण दुसरीकडे मात्र खूप मोठा घोळ झाला होता.कारण तिथे आयशाला वाटत होतं की ही अंगठी अभिमन्यूने तिला भेट म्हणून दिली आहे व ती खुश झाली होती.तिच्या मनात अभिमन्यु होता पण आता तिला असं वाटू लागलं होतं की अभिमन्यूच्या मनातही तीच आहे.आयशाने खूप मोठा गैरसमज करुन घेतला होता.ती त्या अंगठी कडे बघून खुश झाली आणि म्हणाली,"अभिमन्यूने तर मला गिफ्ट दिले पण आता मी सुद्धा त्याला काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायला हवे".पण त्या वेळी तिच्याकडे अभिमन्यूला द्यायला काहीच नव्हते.तेवढ्यात तिचे लक्ष तिच्या बाबांच्या नवीन घड्याळाकडे गेले आणि तिने विचार केला की आपण हा घड्याळ अभिमन्यूला द्यावा.त्यामुळे तिने त्या छोट्या मुलाला बोलावले ज्याने तिला अंगठी दिली होती आणि ती त्याला म्हणाली,"हे बघ,हा घड्याळ समोर अभिमन्यु उभारला आहे ना त्याला देऊन ये".


      तिकडे अभिमन्यूच्या मित्रांनी त्याच्या नकळत त्याच्या थंडाईत भांग मिसळली.त्यामुळे त्याचा स्वतःवर ताबा नव्हता.आयशा लांबूनच त्या छोट्या मुलाला घड्याळ देताना पाहत होती.त्या मुलाने अभिमन्यूला घड्याळ दिले हे पाहून ती खुश झाली.इतक्यात आयशाला एक महत्त्वाचे काम आठवले आणि ती तातडीने तिथून निघाली.रंगपंचमीचा कार्यक्रम सुरू असताना नाईकांना लक्षात आले की त्यांचं घड्याळ हे गहाळ झाले आहे.नाईकांच्या घड्याळाची किंमत तब्बल तीन लाख होती.त्यामुळे त्यांना खूप चिंता वाटत होती.त्यांनी त्याची कल्पना परांजपेंना दिली.परांजपे घड्याळाचा शोध घेऊ लागले परंतु त्यांना घड्याळ काही सापडले नाही.सगळीकडे एकच गोंधळ उडाला.परांजपेंनी अभिमन्युला घडलेला प्रकार सांगितला.पण मागच्या तासाभरात काय घडले हे त्यांला आठवतच नव्हते कारण त्याने भांग मिसळलेली थंडाई प्यायली होती.हा सगळा प्रकार आयशाच्या कानावर पडला.तिच्या लक्षात आले की ही सर्व चूक तिची आहे आणि ती धावतच परांजपे यांच्या बंगल्यावर गेली.तिथे जाऊन तिने तिच्या बाबांची माफी मागितली आणि सर्वांना सांगितले की घड्याळ अभिमन्यूकडे आहे व तिनेच तो घड्याळ त्याला दिला होता.हे ऐकून अभिमन्यू गोंधळून गेला आणि आयशाला म्हणाला,"घड्याळ माझ्याकडे नाहीये,उगाच सगळ्यांना काहीही सांगू नको".त्यावर आयशा म्हणाली,"घड्याळ तुझ्याकडेच आहे,खोटं नको बोलू.ते घड्याळ त्या मुलाने तुला दिलेले मी पाहिले होते".अभिमन्यूला हे तर माहितच होते की ते घड्याळ त्याच्याकडे नाहीये पण मागील तासाभरात काय घडले हे देखील त्याला आठवत नव्हते.त्यामुळे तोही गोंधळून गेला.आयशाचे म्हणणे होते की,घड्याळ अभिमन्यूकडेच आहे आणि अभिमन्यूचे म्हणणे होते की घड्याळ त्याच्याकडे नाहीये.मग आता घड्याळ नेमके आहे तरी कोणाकडे?हा प्रश्न सर्वांना पडला होता.


      इतक्यात तिथे परांजपे यांच्या पत्नी आल्या.त्यांच्या हातात नाईकांचे घड्याळ पाहून सर्वजण चकित झाले.सर्वजण त्यांना विचारू लागले की ते घड्याळ त्यांना कुठे सापडले.तेव्हा त्या म्हणाल्या,"हा घड्याळ रामू कडे होता आणि त्यानेच मला दिला".हे ऐकून सर्वांना असे वाटले की रामूने घड्याळ चोरले असावे.त्यावर परांजपे यांच्या पत्नीने सर्वांना सांगितले की रामूने घड्याळ चोरले नसून त्याच्याकडे हे कोणीतरी दिले होते.त्यावर सगळे आणखी गोंधळले आणि परांजपे रामूला म्हणाले,"रामू आता खरंखरं आणि व्यवस्थित सांग की नेमके काय घडले".त्यावर रामू म्हणाला,"कार्यक्रम सुरू असताना एक छोटा मुलगा माझ्याकडे आला आणि त्याने माझ्या हातात हे घड्याळ दिले.मला वाटलं की हे घड्याळ साहेबांचं असेल आणि त्यांनी मला सांभाळण्यासाठी दिले असेल,त्यामुळे मी ते ठेवून घेतले.पण आता जेव्हा माझ्या लक्षात आले की घड्याळाचे हे गोंधळ झाले आहे,तेव्हा मी हे घड्याळ मॅडमकडे दिले".हे ऐकल्यानंतर आयशाच्या लक्षात आले की त्या मुलाने ज्याच्या हातात घड्याळ दिला होता तो मुलगा अभिमन्यू नसून रामू होता.त्याचा चेहरा रंगलेला असल्यामुळे तिला त्याचा चेहरा ओळखू आला नाही.आयशा म्हणाली,"अभिमन्यू आणि बाबा मला माफ करा यात सगळी चूक माझी होती.जेव्हा मी त्या मुलाला अभिमन्यूकडे घड्याळ देण्यासाठी पाठवले त्यावेळी सगळ्यांचे चेहरे रंगलेले असल्यामुळे त्याने अभिमन्यू ऐवजी रामूला ते घड्याळ दिले आणि हा सर्व गैरसमज झाला".त्यावर अभिमन्यू म्हणाला,"पण तू त्या मुलाला माझ्याकडे घड्याळ देण्यासाठी का पाठवले?तो घड्याळ तुला मला का द्यायचा होता"?त्यावर आयशा म्हणाली,"तू जर मला अंगठी देऊ शकतोस तर मी तुला एक घड्याळ नाही देऊ शकत.तू मला अंगठी दिली त्यामुळे मी तुला घड्याळ दिले".असे म्हणत आयशाने तिच्या हातातली अंगठी अभिमन्यूला दाखवली.काही वेळ विचार केल्यानंतर हा सर्व प्रकार अभिमन्यूच्या लक्षात आला आणि त्याने डोक्याला हात लावून घेतला.त्यावर आयशाचे बाबा आयशाला ओरडून म्हणाले,"आयशा नीट सांग काय घडले आहे?मला काहीही कळत नाहीये".त्यावर अभिमन्यू म्हणाला,"काका मी सांगतो नेमके काय घडले".माझ्याकडे माझ्या मैत्रिणीची एक अंगठी होती जी चुकून माझ्याकडे राहिली होती.ती अंगठी घेण्यासाठी माझी मैत्रीण इथे आली होती.मी ती अंगठी तिला द्यायला जाणार इतक्यात बाबांनी मला अडवले आणि एक काम सांगितले.त्यामुळे मी ती अंगठी एका छोट्या मुलाच्या हातात दिली,माझ्या मैत्रिणीला देण्यासाठी.पण त्याने ती अंगठी माझ्या मैत्रिणीला देण्याऐवजी चुकून आयशाला दिली आणि आयशाला वाटले की ती अंगठी मी तिला दिली आहे.त्यामुळे तिने रिटर्न गिफ्ट म्हणून माझ्यासाठी त्याचं मुलाच्या हातून घड्याळ पाठवला.पण सगळ्यांचे चेहरे रंगलेले असल्यामुळे त्याने तो घड्याळ मला देण्याऐवजी चुकून रामूला दिला.पण आयशाला वाटले की तो घड्याळ मला मिळाला आणि हा सगळा गैरसमज झाला".हे सर्व एका तासाभरात घडून गेले हे ऐकून सर्वांना आश्चर्य तर वाटलेच पण त्याबरोबरच सर्वजण जोरजोरात हसू लागले.आयशा निशब्द उभी होती तर अभिमन्यूने त्याच्या डोक्याला हात लावले होते.शिंदेंना आणि परांजपेंना तर कळतच नव्हते की आपण काय बोलावे.नाईक तर काय बोलूच शकत नव्हते कारण हा सगळा गोंधळ त्यांच्या मुलीनेच घातला होता.पण एक गोष्ट मात्र आहे त्या रंगपंचमीच्या कार्यक्रमात जो सावळा गोंधळ झाला होता तो शिंदे,परांजपे आणि नाईक परिवार आयुष्यभर विसरू शकणार नाही.


Rate this content
Log in