Apurva Jadhav

Others

3  

Apurva Jadhav

Others

सूर्यप्रकाश

सूर्यप्रकाश

3 mins
326


आजच्या या विकसित आणि आधुनिक काळातही,कुठे न कुठे असमानता,भेदभाव यांचा काळोख पसरलेला आहे.काही ठिकाणी आजही जातीभेद,धर्मभेद,लिंगभेद या सर्व समाजघातक घटकांचं अस्तित्व आहे.अश्याच समाजघातक घटकांच्या आहारी गेलेलं गांव म्हणजे जीवधनपूर.राज्याच्या सीमेवर असलेल हे एक छोटसं गाव होत.गाव छोटे असल्यामुळे तिथे कुठल्याच प्रकारची शिक्षण व्यवस्था नव्हती,आणि गावकऱ्यांना त्यात रसंही नव्हता.ज्ञान आणि शिक्षणाअभावी या गावात असमानता,भेदभाव आणि अश्या अनेक समाजघातक घटकांचा वारा दूरदूर पर्यंत वाहताना दिसत होता.जातीभेदी मानसिकतेमुळे गावात,उच्च आणि तुच्छ जात अश्याप्रकारे गावाचे दोन भाग झाले होते.उच्च जाती अंतर्गत येणाऱ्या गावकऱ्यांना गावात कुठेही वावरण्याचा अधिकार होता,पण तुच्छ जाती अंतर्गत येणाऱ्या गावकऱ्यांना नाही.मानव अधिकारांना लक्षात घेऊन ही गोष्ट खूप लज्जास्पद होती.पण यावर आळा बसवणार तरी कोण?एके दिवशी एका तुच्छ जातीय( गांवकर्यांच्या म्हणण्यानुसार)मुलाने उच्चजातीय व्यक्तीच्या पाण्याला स्पर्श केल्याने त्याला निर्दयीपणे मारहाण केली जात होती.इतक्यात तिथे न्यायाधीश सर्नोबत आले.त्या गावाजवळून प्रवास करत असताना सरनोबत यांची गाडी खराब झाली.सुदैवाने न्यायाधिशांनी ते सर्व कृत्य पाहिले आणि त्यांनी लगेचच पोलिसांना याची कल्पना दिली.न्यायाधीशांनी त्या सर्वांना समज दिली.पण त्या गावाची माहिती घेताच न्यायाधीश्यांच्या लक्षात आलं की हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही.आणि त्यांनी निर्धार केला की या प्रकरणाचा सोक्षमोक्ष ते लावणारचं.त्यांनी गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.गावकरी त्या मुलाशी जे वागले त्याची त्यांना काहीच खंत नव्हती.न्यायाधीशांनी गावकऱ्यांना समानतेचा धडा शिकवण्यासाठी एक शक्कल लढवली.


      एके दिवशी सकाळी न्यायाधीशांनी गावकऱ्यांना एका ठिकाणी जमा केले.न्यायधिश म्हणाले,"आता तुम्ही उच्च जातीय आणि तुच्छ जातीय दोन्ही गटांनी सूर्यप्रकाशाखाली उभे रहावे".न्यायाधीशांची ही गोष्ट ऐकून सर्वांना प्रश्न पडला की ते आपल्याला हे करायला का सांगत आहेत आणि त्यांनी हे करण्यास नकार दिला.पण न्यायाधीशांनी गावकऱ्यांना आग्रह केल्याने ते सूर्यप्रकाशाखाली उभे राहिले.काही वेळ उभे राहिल्यानंतर गावकर्‍यांच्या पायाला चटके बसू लागले.शेवटी न राहावता ते सूर्यप्रकाशापासून लांब झाले.हे पाहून न्यायाधिश सरनोबत जोरजोरात हसू लागले.त्यांना हसताना पाहून गावकरी चकीत झाले आणि म्हणाले,"तुम्ही का हसताय आणि आम्हाला सूर्यप्रकाशाखाली उभे करण्याचे कारण तरी काय"? त्यावर न्यायाधिश म्हणाले,"तुमच्या ठायी असलेल्या असमानतेच्या मानसिकतेला नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला सूर्यप्रकाशा खाली उभे केले.माझ्या हसण्याचे कारण विचाराल तर,माझा डाव यशस्वी झाला म्हणून मी हसलो".हे ऐकून गावकरी गोंधळून गेले.त्यांना प्रश्न पडला की न्यायाधीश काय बोलत आहेत?आणि कसला डाव?त्यावर न्यायाधीश म्हणाले,"मी समजावतो,जेव्हा मी उच्च आणि तुच्छ जातीय दोन्ही गटांना प्रखर सूर्यप्रकाशाखाली उभे केले,तेव्हा सर्वांच्या पायाला समान सूर्यप्रकाशाचे चटके बसले.हो ना? मला हेच तुम्हाला सांगायचे आहे.जर निसर्ग आपल्याला समान वागणूक देत,आपल्यामध्ये भेदभाव नाही करत,तर आपणच का आपल्या मध्ये भेदभाव करावा.जर तुम्ही खरंच उच्च आणि ते तुच्छ असते तर निसर्गाने फक्त त्यांच्या पायाला चटके बसू दिले असते,तुमच्या पायाला नाही.सांगण्याचे तात्पर्य इतकेच की माणूस हा आधी माणूस असतो त्यानंतर त्याच्यावर जातीचे ठसे उमटवले जातात.या जगात सगळ्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणाकडून ही कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही.हे जितक्या लवकर तुम्ही समजून घ्याल तुमच्यासाठी तितकेच चांगले आहे.त्या दिवशी तुम्ही त्या मुलाला जी वागणूक दिली त्यानंतर मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकलो असतो.पण तुमच्या या समाजघातक मानसिकतेवर घाव नाही घालू शकलो असतो.त्यामुळे मी हे सर्व केले".हे ऐकल्यानंतर सर्वजण मान खाली घालून नि:शब्द उभारले होते.न्यायाधीशांच्या हुशारीचा सकारात्मक परिणाम गावकऱ्यांवर झाला आणि त्यांनी त्यांची चूक मान्य केली.


      गावात पुन्हा असे काही घडू नये म्हणून न्यायाधीशांनी स्वत: पुढाकार घेऊन गावात शाळा सुरू केली. शिक्षणाचे आणि ज्ञानाचे महत्त्व समजवले.गावातील साक्षरतेचे प्रमाण काही वर्षांनी वाढले,गावाचा विकासही झाला.ते सर्व शक्य झाले ते फक्त आणि फक्त न्यायाधीश सर्नोबत यांच्यामुळे.त्यांनी ज्या पद्धतीने या नाजूक परिस्थितीला हाताळले ते खरंच कौतुकास्पद होते.कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा आरडाओरडा न करता त्यांनी गावकऱ्यांना समानतेचा धडा शिकवला.एका अविकसीत गावाला विकसित केले.त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच.


Rate this content
Log in