Apurva Jadhav

Abstract Others

3  

Apurva Jadhav

Abstract Others

हसा

हसा

2 mins
425


      'निरोगी आयुष्यासाठी नेहमी हसत रहा' हे वाक्य तर तुम्ही ऐकले असेलच. पण हसल्यामुळे एकाने भयंकर मार खाल्ला,यावर तुमचा विश्वास बसणे म्हणजे जरा अवघडचं आहे.हो ना?पण तरीही हे सत्य आहे.हसल्यामुळे एकाने खरंच मार खाल्ला होता.त्याचे झाले काय,हसमुख नावाचा एक परराज्यातून आलेला मुलगा होता.त्याला हसण्याची विचित्र सवय होती.प्रत्येक एका वाक्यानंतर तो जोरजोरात हसायचा.त्याची ती सवय काल-पर्वाची नसून लहानपणापासूनची होती.अहो हो,हे पटण्यासारखे नाहीये,पण सत्य आहे.त्या सवयीमुळे तो नेहमी अडचणीत सापडायचा.त्याने त्याची ती सवय मोडण्यासाठी प्रयत्नही केले,पण दुर्दैवाने त्याला ते जमले नाही.एकदा हसमुख लग्नासाठी मुलगी बघायला गेला होता.त्यावेळी मुलीचे बाबा भावुक झाले आणि म्हणाले,"आम्ही आमच्या मुलीला खूप लाडाने सांभाळले आहे.आमची परिस्थिती नसतानाही आम्ही तिचे शिक्षण थांबू दिले नाही.आता तिला चांगले सासर आणि चांगला नवरा मिळावा हीच आमची अपेक्षा आहे".असे म्हणत ते रडू लागले.बाबांना रडताना बघून मुलगीही रडू लागली.त्यावर हसमुख,"हो तुमचे बरोबर आहे".असे म्हणत सवयीप्रमाणे जोरजोरात हसू लागला.हसमुखच्या वागण्याचा मुलीच्या वडिलांना खूप राग आला.हसमुखच्या सवयीबद्दल कोणी मुलीच्या वडिलांना सांगणार,त्या आधीच त्यांनी हसमुखला घराबाहेर काढले.खरं तर त्याने मारचं खाल्ला असता.पण त्यावेळी तो पाहुणा म्हणून आला होता म्हणून वाचला.


      कामानिमित्त हसमुख आठवड्याभरासाठी महाराष्ट्रात आला होता.मुंबईला जात असताना त्याची गाडी एका गावाजवळ खराब झाली.आजूबाजूला कुठे गॅरेज आहे की नाही हे बघण्यासाठी ड्रायव्हर हसमुखपासून थोडा लांब गेला.बराच वेळ ड्रायव्हरची वाट बघूनही तो आला नाही.त्यामुळे हसमुख सहजच फिरवण्यासाठी गावाच्या आत गेला.तेव्हा तिथे एक गावकरी आला आणि म्हणाला,"दादा तुम्ही कोणाला भेटायला आला आहात"? त्यावर हसमुख म्हणाला,"क्या,क्या बोल रहे हो भाई"?आणि सवयीप्रमाणे पुन्हा एकदा जोर-जोरात हसू लागला.गाव छोटे असल्यामुळे गावकऱ्यांना हिंदी कळत नव्हती.त्यामुळे त्या गावकऱ्यालाही कळाले नाही की हसमुख काय म्हणाला.पण ज्याप्रकारे तो जोरजोरात हसत होता ते बघून त्या गावकऱ्याला वाटले की तो वेडा आहे.


      हसमुख तिथून अजून पुढे गेला आणि एका घराजवळ पोहोचला.तिथे एकाचा मृत्यू झाला होता आणि सर्वजण तिथे जोरजोरात रडत होते.त्यावर एका व्यक्तीने हसमुखला विचारले,"तुम्ही कोण आहात?तुम्ही मयतीसाठी आला आहात का?पण हसमुखला ते काय म्हणत आहेत ते कळाले नाही. त्याला असे वाटले की ते त्याचे नाव विचारत आहेत.त्यावर हसमुख म्हणाला,"मेरा नाम हसमुख है.में गुजरात से आया हू" आणि पुन्हा एकदा जोरजोरात हसू लागला.त्या वेळी सर्वांना हसमुखचा खूप राग आला.त्यावर गांवकरी त्याला म्हणाले,"अरे तुला लाज नाही वाटत?इथे एकाचा मृत्यू झाला आणि तू हसतोयस".त्यावर हसमुख म्हणाला,"अरे,मेरी गाडी खराब हो गई है.मुझे मुंबई जाना है"आणि पुन्हा एकदा हसू लागला.त्यावर गावकरी आणखी चिडले आणि त्याला मारायला लागले.मागील वेळी तो मार खाता-खाता वाचला होता,पण यावेळी त्याने मार खाल्लाचं.तेवढ्यात हसमुखचा ड्रायव्हर तिथे आला आणि त्याने सर्वांना हसमुखच्या त्या विचित्र सवयी बद्दल सांगुन त्याला सोडविले.


      असं म्हणतात की हसणे आरोग्यासाठी चांगले असते.पण हसमुखच्या त्या विचित्र सवयीमुळे,हसणे त्यांच्या आरोग्यासाठी जरा घातकच ठरले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract