ती पावसाळी रात्र.(भाग 2)
ती पावसाळी रात्र.(भाग 2)


त्याला तिच्या बद्दल वाटणारी काळजी ,त्याच प्रेम बघून सानवी चे भरून आले.
सानवी,बोलून तर बघ ग,मन हलक होईल.इतके दिवस मनात साचून राहिलेला पाऊस तुझ्या ही नकळत बाहेर येईल.प्लीज बोल.
आदी, दोन वर्षा पूर्वी माझं लग्न विराज सोबत ठरले होते.अगदी एकमेकांना बघून आम्ही पसंद केले होते.मग आम्ही दोघे कॉल वर बोलत होतो,भेटायला ही जात होतो.विराज चांगला होता महनजे मला तसा वाटला त्या वेळी पण तो माझा गैरसमज होता.
त्या दिवशी मी विराज ला भेटायला गेले.आम्ही खूप भटकलो.मस्त मजा केली आणि अचानक पाऊस सुरू झाला.मला तर पाऊस खूप आवडत असायचा.मी मस्त पावसात भिजत होते विराज माझ्या कडे बघत हसत होता.मी त्याला ही माझ्या सोबत पावसात ओढून घेतले.दोघे चिंब भिजलो.
विराज म्हणाला, सानु माझे घर इथून जवळ आहे.आपण घरी जावू तू कपडे चेंज कर खूप भिजली आहेस.
अरे पण विराज तुझे आई बाबा काय म्हणतील मी असे घरी यायचे म्हंजे?
सानू ते दोघे गावी गेले आहेत,मी एकटाच आहे घरी.मग मला प्रश्न पडला की याच्या सोबत जावू की नको.तेव्हा विराज म्हणाला, सानवी माझ्यावर विश्वास नसेल तर राहू दे.आय एम नॉट फोर्सड यू.
ठीक आहे विराज चल जावू.मग आम्ही त्याच्या घरी आलो.
विराज ने त्याचे कपडे मला थोडा वेळ घालायला दिले मस्त गरमागरम कॉफी बनवली त्याने.आम्ही कॉफी पीत बसलो होतो.
विराज ने माझा हात हातात घेतला, सानू आय लव यू.त्याने माझ्या चेहर्या वर आलेले केस काना मागे घेतले.मी त्याच्या स्पर्शाने मोहरुन गेले.त्याच्या नजरेत हरवुन गेले.
विराज ने अलगद माझा किस घेतला.मी ही त्याला प्रतिसाद दिला.कारण थोडा वेळा साठी मी ही बहकले होते.विराज ने मग मला घट्ट मिठी मारली.
विराज,मी आता घरी जाते उशीर झाला आहे.
सानू आज इथेच थांब ना.
नाही विराज हे ठीक नाही. सानवी घाबरली होती.
विराज ने सानवी नको म्हणत असताना देखील तिच्या वर जबरदस्ती केली.सानवी,त्याला प्रतिकार करत होती पण विराज पुढे ती हतबल झाली.विराज ने तिला अक्षरशः ओरबाडले.बाहेर जोराचा पाऊस सुरू होता त्या आवाजात तिचा आवाज ,तिचे हुंदके दबून गेले.
सानवी,रडत होती.विराज तिच्या जवळ आला सानू अग आपल लग्न होणार आहे ना.मग का काळजी करतेस?
विराज लग्न होणार आहे म्हणून तू लग्ना आधीच असा वागलास? आय कान्ट ॲक्सीपट धिस.
सानवी,अग यात गैर काहीच नाही आणि माझा कंट्रोल गेला त्यात काय मोठा इश्यू आहे?
सानवी,त्याच्या घरातून बाहेर पडली.घरी येवून तिने आई ला विराज सोबत लग्न मोडत आहे अस सांगितले.
आदित्य सानवी जवळ आला,तिचे अश्रू त्याने पुसले.
आदित्य तेव्हा पासून हा पाऊस मला आवडत नाही.पाऊस आला की मला ती पावसाळी रात्र आठवते.आय हेट द रेन.
सानवी,विराज तसा होता म्हणून सगळ जगच तसे नसते ग. जगात वाईट लोक आहेत तिथे चांगली लोक सुद्धा आहेत.आय रिअली लव्ह यू सानू.तू आता जशी आहेस तशी मला आवडतेस.
आदी,आय लव्ह यू टू म्हणत सानवी ने त्याला घट्ट मिठी मारली.
आज सुध्दा बाहेर पाऊस पडत होता पण आज सानवी आणि आदित्य एकत्र कॉफी घेत बाहेरचा पाऊस एन्जॉय करत होते.
(समाप्त)