Author Sangieta Devkar

Abstract Inspirational

4.0  

Author Sangieta Devkar

Abstract Inspirational

ती एक चिमणी

ती एक चिमणी

3 mins
220


आपल्या आयुष्यात,विश्वात चिमणी व्यस्त होती सगळ तर तिच्या मना सारख झालं होत.कुठे काहीच कमी नव्हती.कसली उणीव ही नव्हती.तीच पिल्लू मोठा झाला होता,त्याला ही आता पंख फुटले होते,तो बाहेरच्या जगात मस्त विहरत होता.चिमणा त्याचा करियर मध्ये गुंतला होता.कसलीच कमतरता नव्हती चिमणी ला.तरी पण मन कधीतरी उगाच उदास व्हायचे,काहीतरी सलत ,खुपत राहत असायचे.पण नेमके काय हे तिला ही समजत नव्हते.आवडीचे काम,करियर तिने मना पासून जपले होते,त्यात ती खुश होती मग मन का दुखी होत ? या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हत.आता ही घरात ती एकटीच होती.तिचा चिमणा कामात बिझी.त्याला तिच्या साठी वेळच नव्हता .चिमणी च्या मनात काहीतरी होत ,ते बाहेर येत नव्हते.खूप बोलायचे होते तिला,मन मोकळे करायचे होते पण कोणा जवळ? अस कोणी जवळच तिला आठवेना मी ज्याच्या जवळ मी मन मोकळ करू.

अचानक तिला आठवन झाली, कावळ्याची..अरे आपण त्याच्या साठी दार उघडलेच नाही,किती वेळ कावळा आपल्या दारा बाहेर टकटक करत उभा होता पण आपण त्याला आत घेतले नाही.आणि आता मला त्याच्याशी बोलावेसे वाटते आहे .चिमणी ला आता लक्षात आले की तिला नेमके काय सलत आहे.


अधाश्या सारखी ती दार उघडुन बाहेर गेली ,कदाचित कावळा बाहेर असेल..पण बाहेर कोणीच नव्हते.संध्याकाळ ,रात्र अशीच त्याच्या आठवणीत गेली.

दुसऱ्या दिवशी चिमणी ला एक कॉल आला,तिने नंबर पहिला, तो अनंनोन होता,तिने उचलला..हॅलो चिमणे कशी आहेस?

त्याचा नुसता आवाज ऐकून हीच मन आनंदी झालं.सगळा ताण सल,उदासी कुठल्या कुठे पळून गेली.

अग,बोल ना.विसरलीस काय मला?. कावळ्याने विचारले.

अरे..मला माफ कर,तू माझ्या दारात आला होतास तरी मी दार नाही उघडले.माझ्या संसारात,व्यापात गुंग होते रे.

असू दे ग. पण आता तरी बोलणार आहेस का?मला तर खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्या सोबत.आपल बालपण पुन्हा एकदा जगायचं आहे ग.

चिमणी खुश झाली,जणू बालपणी वहीत ठेवलेले पिंपळाच् पान तिला आज पुन्हा मिळालं होत.मनातल सगळ सगळ घडा घडा बोलत राहिली.इतकं दिवस सगळ साचून राहीलेल कावळ्या सोबत शेयर करत राहिली.मन हलक झालं.तो सगळ शांत पणे ऐकून घेत होता.

अरे तुला माझा राग नाही आला का?

का येईल,तू तर माझी जिवलग मैत्रीण आहेस चिमणे,मला गरज होती म्हणून मी तुझ्या दारात आलो होतो,पण असो..प्रत्येकाचं स्वतंत्र अस विश्व,आयुष्य असत ग.तू तुझ्या विश्वात मग्न होतीस.अशा वेळी तू मला साथ द्यावीस अशी मी अपेक्षा करण त्या वेळी फार चुकीचे होते.तुझ्या आयुष्या वर,मी अतिक्रमण करू शकत नव्हतो,म्हणून मग तुझ्या आयुष्यातून मी वजा व्हायचे ठरवले ,आणि कायम साठी निघून गेलो.

मी खूप खुश आहे रे,माझ्या संसारात..प्रेम करणारा नवरा आहे,मनासारखं करियर घडवले मी.आमचं पिल्लू आता मोठ झालं, तो ही त्याच्या विश्वात मग्न आहे. हल्ली तुझी सारखी आठवण येत होती.तुझ्याशी खूप बोलायचे होते कावळ्या.मला ना तुझी राधा बनायची होते रे.कृष्णाला समजून घेणारी राधा,त्याची मैत्रीण.पण तुम्हा पुरुषांना खूप घाई असते रे,नात्याला लेबल लावण्याची.एखादी तुम्हाला आवडली की लगेच तुम्ही तिला रुक्मिणी च्या रुपात बघू लागता.मैत्रीण सखी हे नात तुमच्या जमेत नसतेच का रे?.पण मला हवा होतास तू माझा कृष्ण सखा म्हणून, ज्याला मी वेळ प्रसंगी आवाज दिला की माझ्या मदतीला धावून येणारा ...माझा सखा.तुला मी रुक्मिणी च्या रुपात हवी होते ना की राधा म्हणून.तुम्हाला तुमच्या वर भक्ती करणारी मिरा प्रिय असते.राधे चे स्थान नसते तुमच्या मनात,आयुष्यात.उद्या जर तू पुन्हा माझ्या दारात आलास तर कोणत्या नात्याने मी दार उघडू? मला कधी माझं मन मोकळं करावेसे वाटले तर , हक्काने ,विश्वासाने तुझ्या खांद्या वर डोकं ठेवायचे असेल तर .तू असशील ना..माझा कृष्ण सखा बनून? प्रत्येक चिमणीला हवा असतो रे असा एखादा कृष्ण सखा,जो तीच मन जाणत असतो,तिला समजून घेत असतो .फक्त हे नात समजुन घ्यायची गरज असते..काचेच्या वस्तुंवर ‘हॅडल वीथ केअर’ लिहीलेल असत ना तर ते नात खुप नाजुकपणे सांभाळण्याची गरज असते..ह्या नात्यात लक्ष्मणरेषा ही ओलांडायची नसते आणि समोरच्या ला दुखवुन नात्याला तडा ही जाउ द्यायचा नसतो..निखळ असत हे कावळा चिमणीच मैत्रीचं नातं!

चिमणा बाई..काळजी नको करू मी आहे कायम तुझा कृष्ण सखा बनून.तुला जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा बिनदिक्कपणे माझ्या दारात ये.तुझ्या साठी माझ्या घराचं दार नेहमी उघडे असेल..


समाप्त #जागतिक चिमणी दिवस निम्मित..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract