Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

थँक्यू बाबा (भाग २)

थँक्यू बाबा (भाग २)

5 mins
198


अनु ने मग कॉलेज मधून तो स्पर्धेचा फॉर्म घेतला.आणि या स्पर्धेच्या तयारी ला ती लागली.फॉर्म भरून कॉलेज मध्येच द्यायचा होता.

अनु घरी आली होती.तिची आजी एक अल्बम बघत होती. अनु आली तसे आजी ने तो अल्बम बाजूला ठेवला.

आजी अग कोणाचा अल्बम आहे तो,मला पण बघू दे ना.

कोणाचा नाही अनु ,जा तू फ्रेश होऊन ये.

आजी तू काहीतरी लपवते आहेस ना माझ्या पासून.?

अनु ने मग आजी च्या मागे असणारा अल्बम आपल्या कडे घेतला.तो उघडुन एक एक फोटो बघत राहिली.फोटो बघत असताना तिच्या चेहऱ्या वरचा रंग बदलत होता.हे कसे शक्य आहे अनु विचारात पडली.."आजी हे आई चे फोटो आहेत ना ? 

हो अनु..म्हणुच मी तुला हा अल्बम दाखवत नव्हते.

आजी ,माझी आई पण मॉडेलिंग करत होती? किती सुंदर दिसत होती आई.

हो अनु..खूप नावाजलेली आणि प्रसिद्ध मॉडेल होती तुझी आई.

अनिकेत बरोबर शिकायला होती अपूर्वा .कॉलेज मध्ये सगळ्या फॅक्शन मध्ये भाग घेत असायची.नाटक अभिनय नृत्य यात पारंगत होती. 

आजी आईच्या अंगात ही कला होती म्हणूनच कुठे तरी मला पण मॉडेलिंग ची आवड निर्माण झाली असेल ना?

हो अनु,तू अपूर्वा ची लेक तीच च तर रक्त खेळतय तुझ्या शरीरात.

मग आजी,आई ने हे क्षेत्र निवडले ते तुम्हाला पसंत होते मग मला का आडकाठी करता तुम्ही? बाबा ना तर हा विषय घरात चालत सुद्धा नाही.अस का आजी.?

अनु,तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला अनिकेत च देईल.त्याला विचार.

आजी मी बाबांना आज विचारणारच आहे या बद्दल.अनु मग तिच्या रूम मध्ये गेली.

रात्री जेवण करताना अनु ने विषय काढला,बाबा मी आईच्या फोटो चा अल्बम बघितला आज.

तुला कोणी दाखवला तो.अनिकेत आई कडे बघून म्हणाला.

अनिकेत मी बघत होते तो अल्बम..पण असे ही आज ना उद्या अनुला हे सांगणं गरजेचेच होते,तिला जे मॉडेलिंग च खूळ लागले आहे ना,ते तरी डोक्यातून निघून जाईल.

अनु,अगोदर जेवण करून घे मग आपण बोलू.अनिकेत म्हणाला.

अनिकेत अनु सोबत बाल्कनीत बसला होता.. बाळा,मी तुझ्या स्वप्नांच्या आड येतो आहे ,तुला मना सारख करियर करून देत नाही आहे,या मागे माझा स्वार्थ आहे .

कसला स्वार्थ बाबा.आणि आई सुद्धा मॉडेल म्हणूनच काम करत होती ना?मग यात वाईट काय आहे सांगा.

अनु,कॉलेज मध्ये मला अपूर्वा भेटली.मग आम्ही प्रेमात पडलो आणि लग्न ही केले.तिला मॉडेलिंग ची भयानक आवड होती,मी तिला त्यात सपोर्टच केला.तुझी आजी ही आईला काही बोलत नसायची.जे आवडते ते करू दे म्हणत असे.अपूर्वा आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने टॉप मॉडेल च्या पंक्तीत जाऊन बसली.तिला खूप सारे ॲड्स मिळत गेले.यश,प्रसिध्दी सगळ तिला मिळत गेले.मी ही खूप खुश होतो. लग्ना नंतर चार वर्षांनी तुझा जन्म झाला तुझ्या कडे लक्ष द्यायला मी ,तुझी आजी होतो त्यामुळे अपूर्वा ला काळजी नव्हती.तिला फक्त हीच काळजी होती की डिलिव्हरी मध्ये आणि त्या नंतर तीच सौंदर्य जरा लोप पावणार होते.पण तशी आपल्या फिगर ची अपूर्वा काळजी ही घेत होती.शेवटचे तीन महिने ती घरी च होती,त्यानंतर तुझा जन्म झाला.मग अजून दोन महिने अपूर्वा घरी थांबली पण या कालावधीत अपूर्वा ची लोकां मधली क्रेझ कमी झाली.तिला मॉडेलिंग च्या ऑफर कमी येवू लागल्या बाकीच्या मॉडेल्स अपूर्वा च्या पुढे निघून गेल्या. इकडे तू मोठी होत होती आणि एकी कडे अपूर्वा काम नसल्याने डिप्रेशन मध्ये चालली होती.टॉप मॉडेल असणारी अपूर्वा आता तिला कोणी ओळखेनासे झाले.यातच अपूर्वा खचली आणि नैराश्यात गेली.तिला जगणं नकोसे झाले.मग एक दिवस झोपे च्या गोळ्या घेवून तिने स्वत :ला संपवले.तेव्हा तू पाच वर्षाची होतीस.या मॉडेलिंग ने तुझ्या आई चा जीव घेतला अनु,आता तेच वेड जर तुझ्या डोक्यात असेल तर मला नको आहे ते तुझ करियर.

पण बाबा माझ्या बाबतीत पण असच काही होईल असे नाही ना? मी आजच्या काळातली स्ट्राँग मुलगी आहे.मी हार पण आनंदाने पचवू शकते आणि पुन्हा लढू पण शकते.

नाही अनु,काही ही झाले तरी तू या क्षेत्रात यायचे नाही.मला तुला गमवायचे नाही .माझ्या अपूर्वा ची तू एकच आठवण आहेस माझ्या जवळ.पुन्हा हा विषय मला अजिबात नको आहे अनु समजल.

अनिकेत उठून गेला. अनु चे डोळे भरून आले.आई ने अशी हार मानली आणि संपवले स्वत:ला .

अनु ने मिस पुणे साठी जो फॉर्म भरला होता ती स्पर्धा दोन दिवसांनी होती.तिची तयारी चालू होती पण सगळ गपचुप .घरी कोणाला काही माहीत नव्हते.आपल्या आई ची एक साडी ती नेसणार होती एकदम ट्रॅडिशनल लूक मध्ये जाणार होती . स्पर्धेत तीन चार रावूंड होणार होते,त्यात एक ट्रॅडिशनल लूक रावूंड होता.ती साडी अनु ने छान प्रेस करून आणली होती.दुसऱ्या दिवशी कॉलेज साठी म्हणून ती बाहेर पडणार होती आणि स्पर्धा अटेंड करणारा होती.सगळ साहित्य आपल्या सॅक मध्ये घेवून अनु निघाली.

स्पर्धा थोड्या वेळात सुरू होणार होती .तिच्या एक दोन फ्रेंड्स ही या स्पर्धेत होत्या.अनु आपला मेकअप करत बसली होती.सगळं सामान नीट आहे का बघत होती.तेव्हा तिला समजले की ती आई ची साडी गडबडीत घरीच राहिली आता काय करायचे? अनु विचारात पडली.इथून तिचे घर खूप लांब होते. तेवढा वेळ ही नव्हता आता.एका मागे एक राऊंड सुरू होणार होते.साडी सोबत तिचा फॉर्म कन्फर्म झाल्याचे लेटर ही घरी राहिले होते.

आता अनु तो ट्रॅडिशनल राऊंड अटेंड करू शकणार नव्हती.खूप निराश मनाने ती तिथे बसून होती.आई ची तिला खूप आठवण आली,डोळे भरून आले आज आई असती तर नक्की तिने मला सपोर्ट केला असता असा विचार ती करत होती.आणि अचानक तिच्या अश्रू भरल्या नजरे समोर तिला अनिकेत दिसला.. अनु ने डोळे पुसले .. बाबा तुम्ही इथे? तिला खूप आश्चर्य वाटले.


हो अनु हे काय स्पर्धेत भाग घेतलास पण ही अपूर्वा ची साडी घरीच विसरून आलीस.हसतच अनिकेत म्हणाला.

बाबा,म्हणत अनु त्याच्या मिठीत शिरली.

तिच्या डोक्या वरून हात फिरवत अनिकेत म्हणाला, अनु मी खूप विचार केला,अपूर्वा च्या वेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे.तू माझी एकुलती लेक आहेस,मग तुझं स्वप्न तेच माझं स्वप्न असायला हवे.तुला मी सपोर्ट नाही करणार तर कोण करणार? सहज सकाळी तुझ्या रूम मध्ये गेलो तेव्हा टेबल वर ही साडी आणि हे लेटर मला दिसले.मग मी निर्णय घेतला की बस माझ्या मुलीला सपोर्ट करायचा.मग या पत्त्या वर ही साडी घेवून आलो.तुला हारताना मी नाही पाहू शकत.

अनु खूप खुश झाली,बाबा बाबा.आय लव यू सो मच.. अँड थँक्यू बाबा..अनु च्या डोळ्यात आता आनंदाश्रू होते.

अनु,एकदम मस्त सगळे राऊंड पार कर. ऑल द बेस्ट .मी बाहेर थांबतो.

अनिकेत मग अनु ला थम्स अप करत बाहेर विंगेत बसायला गेला.


समाप्त #पहिले प्रेम.. सीझन २.स्पर्धा



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract