STORYMIRROR

Chandanlal Bisen

Abstract

4  

Chandanlal Bisen

Abstract

स्वर्गाहून सुंदर..! (अलक)

स्वर्गाहून सुंदर..! (अलक)

1 min
418

माणूस जन्माला येतो. लहानपणापासून वयोवृद्ध पर्यंत अनेक भूमिका वठवीत असतो. पूर्वजात संस्कारानुरूप भूमिका वठवितांना सदोष, निर्दोष आचरण घडून येत असते. एका घरात पूर्वापार सुसंस्काचा प्रवाह पिढ्यानपिढ्या चालत आलेला होता. वर्तमान पिढीतसुद्धा संस्कार झिरपलेला होता. मोठे कुटुंब होते. घरातील सर्व घटकांमध्ये वागण्यात बोलण्या चालण्यात छानपैकी समन्वय दिसून यायचा. प्रत्येकांमध्ये नम्रता, प्रेमभाव, एकमेकांविषयी आदरभाव, जिव्हाळा, आत्मीयता असे अनेक गुणांचा समुच्चय दिसून यायचा. भांडण-तंटे त्या घरात कसे भटकणार..! असे असावेत पारंपरिक संस्कार..! अहो स्वर्ग आहे की, नाही माहित नाही. पण या घरात तरी स्वर्गमय वातावरण आहे. हे घर स्वर्गाहून सुंदर आहे, असे म्हणण्यात काहीच वावगे नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract