सुविचार (अलक)
सुविचार (अलक)
तसा जरा गरम डोक्याचा आहे बरं राघव, पण उगीचच चिडचिड करणाऱ्यातला नव्हे, अतिशय प्रामाणिक आणि समजूतदार आहे राघव, कधीही खोटं बोलत नाही, अहो, खोटं बोलावं हा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही इतका हा साधा सरळ आणि हुशार असा राघव. आज मात्र शाळेतून मधून निघून आला आणि आईपाशी येऊन म्हणाला, आई, आज वर्गात हेडमास्तर आले होते म्हणून मराठीच्या सरांनी आम्हाला जे शिकवलं गेलं नव्हतं ते ही धडे शिकवलेत, असं आम्हाला मुख्याध्यापकांना सांगायला सांगितलं.
आई म्हणाली "बरं ,मग"!
राघव आईला म्हणाला,"अगं आई काल मराठीच्या सरांनीच आम्हाला नेहमी खरे बोलावे हा सुविचार आमच्या मनावर बिंबवला होता गं...
