स्टोरीमिरर एक हक्काचं व्यासपीठ
स्टोरीमिरर एक हक्काचं व्यासपीठ
माझा स्टोरीमिरर प्रवास सुरु झाला तो शिक्षकांसाठी असलेल्या स्पर्धेमुळे. असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार की माझ्यातील कवयित्री शोधण्याचे काम स्टोरीमिररने केले. मी कधीच कविता लिहिली नव्हती. पण का कोणास ठाऊक स्टोरीमिररने मला ती लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले. वेगवेगळ्या विषयांवर कविता लिहिण्याचा जणू मी चंगच बांधला. हे सारे शक्य झाले ते फक्त आणि फक्त स्टोरीमिररमुळे. मी माझ्या मुलाला आणि विद्यार्थ्यांना हे एक लिखाणाचे हक्काचे व्यासपीठ आहे. त्यामुळे तुम्ही भाषेवर प्रभुत्व मिळवू शकता हे समजावून सांगितले.
एवढेच नव्हे तर भाग घेतल्यानंतर सर्टिफिकेट देणारे हे एक आगळेवेगळे व्यासपीठ आहे. भाषेबद्दल गोडी निर्माण झाली. हे लेखन अखंड सुरुच राहिले. दहा भाषेत हे उपलब्ध असल्यामुळे कमीत कमी तीन भाषेत तरी मला माझे लेखन प्रकाशित करता आले. आपल्याला गुण मिळतात. त्यामुळे आपण अजून लेखन सुधारायला हवे हे समजण्यासाठी मदत होते.
जास्त गुण मिळाले की उच्चकोटीचा आनंद मिळतो. माझ्यासारख्या असंख्य कवी, कवयित्री, लेखक, लेखिका घडवून भाषा जपण्याचे काम आणि त्यांना वृद्धींगत करण्याचे मोलाचे काम स्टोरीमिरर करत आहे.
ज्यांना लिहिता येत नाही पण वाचनाची खूप आवड आहे, त्यांच्यासाठी सुद्धा किती वाचनीय असे साहित्य स्टोरीमिरर आहे ज्याचा असंख्य वाचक आस्वाद घेतात. भारतभर ह्याचे जाळे पसरले आहे. ते पूर्ण जगात पसरावे. अजून साहित्यनिर्मिती होत राहो हीच इच्छा. लेखनाने व्यक्ती घडतो. व्यक्तीमुळे देश घडतो. भाषेचे सौंदर्य वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येते. भाषा समृद्ध होते.
