Priti Dabade

Drama Horror Thriller

3.6  

Priti Dabade

Drama Horror Thriller

गूढ

गूढ

2 mins
12.2K


गोष्ट आहे तशी जुनीच. पंधरा वर्षांपूर्वीची. सविताने नुकताच वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला होता. फ्लॅट खूपच प्रशस्त होता. त्यावेळी ती कंपनीत नोकरी करत होती. रविवार होता त्यादिवशी. तिच्या लक्षात आले की आपल्या बाथरूमच्या दाराच्या आतील कडीचा स्क्रू सैल झाला आहे. 


म्हणून तिने छोटा बत्ता घेऊन तो स्क्रू आत ढकलण्याचा प्रयत्न केला. काही केल्या तो आज जात नव्हता. तिचा ठोकण्याचा वेग अजूनच वाढला. एकदाचा बसला होता छान. तिने आतून कडी लावून पाहिली. नंतर दार उघडायला गेली तर कुठे दार उघडतय? आतून दार ठोकत ठोकता बाहेरची कडी कशी लागली तेच कळले नाही. एवढी शिकलेली असून तिला असं वाटलं की या घरात भूत वगैरे तर नाही ना.


तिने दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला. पण सारं निष्फळ. शेवटी बाथरूमच्या खिडकीजवळ गेली. ती खिडकी पण बंद काच आणि छोटीशी झडप उघडी होती. तिने खूप हाका मारल्या. पण हाका कोणापर्यंत पोहोचल्या नाहीत. तिसऱ्या मजल्यावरच्या घरात ती अशी एकटी अडकलेली. परत दार खूप जोरात ओढण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग होईना. मग मात्र तिने खूप जोरजोरात रडायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं मनात म्हणत होती. रडू काही आवरत नव्हतं. पण अगदी दहा मिनिटातच कडी उघडली गेली. 


ती आश्‍चर्यचकित झाली. सुटका झाल्याच्या आनंदापेक्षा ती या विचारात पडली की कडीचा थोडादेखील आवाज न होता कशी काय उघडली? घाम पुसत पुसत तिने पूर्ण घर पाहिलं. पण कोणीच नव्हतं. कडी उघडण्याचं कोड तिला आजवर सुटलेलं नाही. तेव्हापासून तिचा स्वामी समर्थांवरचा विश्वास आणि श्रद्धा वाढत गेली. 


दुसऱ्या दिवशी तिने तिच्या ऑफीसमधल्या मैत्रिणींना झाला प्रकार सांगितला. त्या तिला म्हणाल्या, "तू एक उद्योगीच आहेस." ती मात्र विचारांच्या जाळ्यात होती. हे एक गूढ होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama