लक्ष्मीची पाऊले
लक्ष्मीची पाऊले
गौरीगणपतीचे दिवस होते. गौरीच्या आगमनाची सगळी तयारी केली होती स्मिताने. तिच्या मनाला एक विचार स्पर्श करून गेला. ह्यावेळी गौरीची पाऊले आपल्या दोन वर्षांच्या मुलीकडून काढायचे. तिने कुंकवाच्या ताटात पालवीचे पाय बुडवले आणि पाऊलं काढत काढत गौरीचे स्वागत केले घरात.
इकडे शोभा तिसऱ्यांदा आई होणार होती. ती खूप खूश होती. पहिल्या दोन्ही मुली होत्या.
नवरा तिच्या सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन घरी आला आणि रागात म्हणाला ," उद्या आपण दवाखान्यात जात आहोत."