Priti Dabade

Inspirational

4.1  

Priti Dabade

Inspirational

उपजीविका - अलक

उपजीविका - अलक

1 min
147


रेणू खूप लहान होती तेव्हा. काळाने अचानक घाव घातला. वडिलांचं छत्र हरवलं तिने. आईसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता पुढे काय? 

घरात पैशाची कमी होती. तरीपण रेणूच्या आईने दुःख बाजूला सारून वडापावची गाडी टाकली छोट्या रेणूकडे पाहून. बघता बघता दिवस जाऊ लागले आणि तिचा चांगलाच जम बसला.

आता ती जास्त पैसे कमवू लागली. गाडी रूळावर येऊन उपजीविकेचं कोडं सुटलं होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational