पोट
पोट

1 min

357
वृषभ त्यादिवशी जिममधून धापा टाकत आला. नेहाने विचारले,"का रे वृषभ काय झालं?"
वृषभ म्हणाला," काही नाही. अगं, मी आज एका भिकाऱ्याला पाहिलं. अगदी शुष्क झाला होता तो. भुकेने व्याकुळलेला. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे आशेने भीक मागत होता. ज्यांना त्याची दया आली त्यांनी खिशातून एखादं नाणं टाकलं त्याच्या डब्यात. काही मात्र घाई गडबडीत पाहून न पाहिल्यासारखे करत पुढे जात होते." मग काय झालं, वृषभ? एक कटाक्ष नजर टाकत नेहाने विचारले.
मी मात्र इकडे पोटाचा घेर कमी करण्यासाठी जिमच्या वाऱ्या करतोय.