STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

2  

Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

स्पर्श

स्पर्श

7 mins
66

डॉक्टर ,कशी आहे माझी मुलगी ? ती बरी होईल ना यातून? पुष्पा ताई विचारत होत्या.

हे बघा झाल्या प्रसंगाचा खूप मोठा धसका रितीका ने घेतला आहे. त्यामुळे ती मानसिक दृष्टया ठीक नाही आहे. तिला एक आठवडा हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल. 

ठीक आहे डॉक्टर ,पण रितिका ला काही गंभीर दुखापत नाही ना झाली.

रितीका वर त्या गुंडांनी जबरदस्ती केली तेव्हा तिने त्यांना प्रतिकार केला त्या झटापटीत तिला लागले आहे. त्या गुंडांनी ही रितीकाला ला मारहाण केली आहे. 

पुष्पा ताई रडू लागल्या. आपल्या मुलीची ही अशी अवस्था त्या बघू शकत नवहत्या. विलास रितिका चे वडील तिथे आले,पुष्पा त्या गुंडांना पोलिसांनी लगेचच पकडले आणि त्याच्या वर गुन्हा दाखल केला आहे. त्या भागातील सी सी टिव्ही फुटेज मधये रितिका ला घेऊन जाणारी कॅब दिसली.

अहो,पण आपली लेक,ती अत्यवस्थेत आहे. डॉक्टर म्हणाले की तिला मानसिक धक्का बसला आहे. 

पुष्पा आपण आपल्या मुलीला नक्की यातून बाहेर काढू आणि ती लवकर बरी ही होईल.

रितिका हॉस्पिटलमध्ये कोणाला ही स्वतःला चेक अप करू देत नव्हती की नर्स ला हात देखील लावून देत नवहती. " मला हात नका लावू ,नाहीतर मी खून करेन तुमचा,माझ्या जवळ आलात तर बघा... " अस ओरडत असायची कारण तिच्या सोबत घडलेली ती घटना अजून ही तिच्या मनाची पकड घेऊन होती. जे झालं त्याचा खोल परिणाम रितिका च्या मनावर जबरदस्त झाला होता. खर खोट,भास आभास या दुनिये पासून ती खूप दूर ...नैराश्याच्या खोल डोहात बुडाली होती.


 रितीकाला आठ दिवसांनी घरी सोडण्यात आले. पुष्पा ,आदित्य ला सगळं आता सांगितले पाहिजे. विलास म्हणाले.

 अहो ,पण आदित्य ने हे सगळं ऐकून ठरलेले लग्न मोडले तर? त्याच्या घरच्यांनी ही आपण अजून काही बोललो नाही आहोत. 

 पुष्पा, अग ही गोष्ट लपवून नाही ठेवू शकत आपण . जे घडले ते खरं सांगायचे आदित्य ला मग बघू लग्न मोडले तरी चालेल पण खोटं बोलून ,गोष्टी लपवून मला माझ्या मुलीच आयुष्य नाही बरबाद करायचे. आदित्य जो निर्णय घेईल तो मान्य असेल मला. मी माझ्या मुलीला आयुष्यभर सांभाळू शकतो . 

आदित्य ला विलासरावानी रितिका बद्दल म्हणजे ती आजारी आहे तू ताबडतोब ये असा कॉल केला. आदित्य आणि रितिका ची चार महिन्या पूर्वी एंगेजमेंट झाली होती. कंपनीच्या एका प्रोजेक्ट साठी आदित्य फॉरेन ला गेला होता. तो परत आला की दोघांचे लग्न लावून देणार होते . पण त्यात एक दुर्घटना रितिका सोबत घडली. 

आदित्य सुट्टी घेऊन लगेचच भारतात आला. घरी आताच काही रितू बद्दल सांगू नको अशी विनंती विलासरावां नी त्याला केली होती. 

रितू ,हे घे थोडं खाऊन घे. आणि मी छान केस विंचरन देते आज तुला भेटायला कोणीतरी येणार आहे... पुष्पा रितू च्या रूम मधये आली होती.

रितू ने बळ बळ थोडं खाऊन घेतले. शून्यात नजर लावून ती बसली होती. आई ने तिचे केस विंचरायला घेतले तसे ती दचकली आणि अंग आकसून घेतले तिने. रितू अग मी आई आहे तुझी ,तू आपल्या घरात आहेस बाळा,इथे तुला कोणी काही ही नाही करू शकणार. पुष्पा ने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा कुठे रितू ला जरा विश्वास बसला. नाहीतर कोणाचा ही स्पर्श तिला नकोसा वाटत होता. आपल्याला कोणीतरी स्पर्श करते ही भावना तिला भीतीदायक वाटत होती. स्पर्शाची भीती बसली होती मनात तिच्या. " रितू,रितू कुठे आहेस तू आवाज देतच आदित्य आत आला. समोर पाहतो तर रितू चा भकास मलूल चेहरा,कपाळावर बँडेज,हाताला बँडेज,डोळे खोल ,शून्यात गेलेले. रडून रडून डोळयातले आटलेलं पाणी गालावर सुकून गेलेले.. तिला अशी बघून आदित्य चे डोळे भरून आले.." रितू काय झाले तुला ? आदित्य तिचा हात हातात घेत म्हणाला. तसे झटकन रितू ने आपला हात त्याच्या हातून काढून घेतला." रितू, मी तुझा आदि,आपली एंगेजमेंट झालीय, विसरलीस का? बोल ना अशी अवस्था का झाली तुझी? तू मला ओळखत नाहीस का रितू ? आदित्य तिला विचारत होता पण ती शून्यात कुठेतरी हरवली होती. आई काय झालं हे ? आणि रितू मला का ओळखत नाही. तुम्ही सांगा काय झालं नेमकं. पुष्पा आदी ला सांगतच होती इतक्यात विलास तिथे आले, पुष्पा तू आदित्य ला काही ही सांगू नकोस. जे काही सांगायचे ते सगळं रितू सांगेल.

अहो,पण कसलीच शुद्ध नाही आहे ती आदी ला ओळखत पण नाही ती कशी सांगणार ?

पुष्पा अशा मानसिक अस्वस्थतेत आपलं माणूस,त्याचा स्पर्श समोरच्याला माणसात आणण्याचे काम करू शकतो. जी गोष्ट बोलून होत नाही ती कधी कधी स्पर्शाने होऊन जाते. आदि रितू ला सांगायला भाग पाडू दे तरच आपली रितू त्या धक्कयातून बाहेर येऊ शकेल. ठीक आहे म्हणत पुष्पा बाहेर गेली.

आदित्य रितू समोर बसला. रितू माझ्या कडे बघ, नीट बघ आपलं लग्न ठरले आहे. तुला काय झालेय ते तू सांगितले नाहीस तर मला कसे समजेल. तू पूर्ण बरी झाली आहेस आणि मी आहे ग सोबत तुझ्या प्लिज बोल रितू बोल आदित्य ने तिला जोर जोरात खांद्याला धरून हलवले. रितू त्याला ढकलू पाहत होती पण आदिची तिच्या वरची पकड घट्ट होती. हे डोक्याला काय लागेल तुला आणि हाताला पण ...कोणी मारले का तुला रितू की तुझा अपघात झाला..बोल आणि हे बघ आपले एंगेजमेंट चे फोटो म्हणत आदी ने मोबाइल मधले त्यांचे फोटो दाखवले. रितू ने ते बघितले तिला काहीतरी आठवले.आदि ने तिचा चेहरा आपल्या हातात धरला,रितू कोण होती ती लोक? आणि कधी घडले हे सगळं मला सांग रितू आदि ला तिची अवस्था बघून तिच्या सोबत काय घडले असेल याची कल्पना आली होती. आदी एकटक तिच्या नजरेत बघत होता.. कुठेतरी रितू ला ही आतुन वाटले की हा आपला आदिच आहे.. बोल रितू मी त्या लोकांना जीवानिशी मारून टाकेन ज्यांनी तुझी ही अवस्था केली. आदि,म्हणत रितू ने त्याला घट्ट मिठी मारली. आदी तू कुठे होतास आदी..त्या लोकांनी माझी.... रितू ला पुढे बोलवेना तसे त्याने तिला थोपटले आणि मनसोक्त रडू दिले.. थोड्या वेळाने रितू शान्त झाली. आदि ने तिला प्यायला पाणी दिले. आदी ,आपली एंगेजमेंट झाली म्हणून मी खूप आनंदात होते. त्या दिवशी माझ्या क्लीग्ज रेवा,सुषमा आणि पूजा आम्ही चौघी नी पार्टीला जायचे ठरवले होते.घरी येताना कॅब मधये आमचं बोलणं सुरू होत. कॅब ड्राइवर कंपनी चा जो रोज आम्हाला न्यायला,सोडायला येत असे. त्यामुळे त्याच्या वर आमचा विश्वास होता. पण कधी कधी तो विचित्र नजरेने मला बघत असायचा. मग मी त्यांच्या कडे बघितले की हसायचा. मी ही त्याची गोष्ट इग्नोर करत असे. त्या दिवशी आम्ही कंपनी तुन जरा लेट च बाहेर पडलो कारण एक मिटिंग होती. एक एक करत सगळ्याना घरी सोडले शेवटी मी एकटीच कॅब मध्ये राहिले. एके ठिकाणी नेहमीचा रस्ता सोडून तो ड्राइवर बिरजू नाव त्याच भलतीकडेच कॅब नेत होता. मी विचारले त्याला,बिरजू ये कौनसा रास्ता? कहा जा रहे हो तुम? 

मॅडम अभी पता चलेगा रूको..म्हणत त्याने कॅब एका अंधाऱ्या सुनसान जागी आणली. मी खूप घाबरले होते कॉल करायला फोन हातात घेतला तर बॅटरी संपलेली. बिरजू ने कॅब थांबवली आणी तो मागे माझ्या जवळ आला,मॅडम आप बहोत खूबसुरत हो, मै रोज देखता हु आप को.. आपके ये टाईट जीन्स,ये नये नये फॅशन के कपडे,ये लिपीस्टिक लगाये ओठ ..क्या बकवास कर रहे हो बिरजू? रितू ने घाबरून विचारले

सही है मॅडम आप की खूबसुरत जवानी देखे मै आपसे प्यार करने लगा हु. त्याने रितू च्या अंगावर हात फिरवला. तिने जोरात थप्पड लावली त्याला. 

मॅडम अभि देखो इस थप्पड का जवाब ..अस म्हणत बिरजू ने एक फोन केला. तसे तिथे अजून दोन जण आले ते पण बिरजू सारखेच सेक्युरिटी गार्ड वाटत होते. "कोन हो तुम, क्या चाहीये तुमहें ? रितू बोलली.

आप चाहीये मॅडम और आप की ये मदमस्त जवानी,जो मुझे हर रात सोने नही देती.बिरजू बोलत होता.. 

रितू त्याला धक्का देत कार मधून उतरणार होती की त्या दोन माणसांनी तीला पकडले आणि कार मध्ये ढकलले,बिरजू ने तिचे पाय धरले आणि त्या दोघांनी तिचे हात पकडले.रितू त्यांच्या तावडीतून सुटायला बघत होती पण त्या तिघां समोर ती हरली. बिरजू ने तिची जीन्स काढली आणि तिला मारहाण करत तो तिच्या शरीरा वर तुटून पडला. बिरजू च्या पाठोपाठ त्या दोन नराधमांनी ही रितू वर अत्याचार केले. तिला मारहाण करून एका सुनसान रस्त्या वर फेकून दिले. रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तिला मग हॉस्पिटलमध्ये नेले.

 हे सगळं सांगताना ही रितू रडत होती. आदि चे ही डोळे वाहत होते. रितू,मी आहे तुझ्या सोबत कायम. आता तुला सोडून कुठे ही जाणार नाही. रितू त्याच्या कुशीत शिरून रडत होती. आदि तिला धीर देत होता. 

  रितू ला घेऊन आदी बाहेर आला. आई बाबाना ती बाहेर आली यातच सगळं काही समजले. आई बाबा काही काळजी नका करू,रितू सोबत जे झालं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. मी लवकरच रितू सोबत लग्न करणार आहे आणि जे घडले ते फक्त आपल्यात राहू दे. आता रितू पूर्ण बरी झाली आहे.

  बघ पुष्पा मी म्हणालो होतो ना की आपल्या माणसाचा स्पर्श कधी कधी औषधा चे काम करून जातो.

  हो खर आहे तुमचे . पुष्पा

  बाबा पण त्या गुंडाना पकडले का पोलिसांनी?  आदित्य

  हो आदि लगेचच ते गुंड पोलिसांना सापडले.आता ते लॉकअप मध्ये आहेत.

  रितू आय लव यु अँड डोन्ट वरि आय एम ऑलवेज विथ यु.. आदि ने रितू चा हात हातात घेतला. कधीही न सोडण्यासाठी!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract