संजीवनी बेट अख्यायिका आणि वास्तव
संजीवनी बेट अख्यायिका आणि वास्तव


भारत देशात मोठ्या प्रमाणात,देव,राक्षस, महाभारत, रामायण कालीन कितीतरी अख्यायिका आहेत.अनेक पौराणिक कथा असून इथे कितीतरी ठिकाणे त्याची साक्ष देतात असे म्हटले जाते.. अनेक पौर्णिमा कथा,व ठिकाणे भारतात आहेत असेही सांगितले जाते.. बरीच पुरावे,साक्ष आजही अस्तित्वात असल्याचे बोलले जाते..लोकांत त्याबद्दल ची श्रध्दा, भक्ती जोपासली जाते आणि बऱ्याच ठिकाणी अशा दुर्मिळ गोष्टींचे जतनही केल्या जाते..
अजून ही आळंदीला अजानवृक्ष म्हणून संबोधले जाणारे पिंपळवृक्ष आहे, त्या वृक्षाखाली ज्ञानेश्वरी पारायण होते ते वृक्ष शेकडो वर्षांपूर्वी. चे असल्याचे सांगितले जाते..पुराणाशी संबंधित कितीतरी पुरावे असल्याचे बोलले जाते व त्यांचे जतन ही केले जाते.. रामायण, महाभारत, देव, दानव या बाबतीत खूप काही इथे बोलल्या जाते.तो ठेवा म्हणून जतन ही केल्या जाते..असेच एक बेट लातूर जिल्ह्यात असून त्याबाबत अनेक पुराणकथा आहेत.
संजीवनी बेट...हो संजीवनी बेट हेच त्याचे नाव ते ठिकाण आहे लातूर जिल्ह्यात, चाकुर तालुक्यातील वडवळ नागनाथ या गावी.. संजीवनी बेट हे वडवळ गावापासून जवळच एखादी किलोमीटर अंतरावर असून परिसरातील व दूरवर त्या संजीवनी बेटाबद्दल कितीतरी अख्यायिका सांगितल्या जातात..तो एक संशोधनाचा विषय असून.मोठ्याप्रमाणात संशोधन ही चालू आहे..
&nbs
p; या संजिवनी बेट नी तेथील वनस्पती वर अमेरिकेत मोठे संशोधक चालू असून, अमृततुल्ये अशा कितीतरी वनस्पती या बेटावर असल्याचे सांगितले जाते म्हणूनच या बेटाला संजीवनी बेट म्हणून च ओळखल्या जाते...
या बेटावर असलेल्या वनस्पती व माहिती वर अमेरिकेत विशेष संशोधन चालू असून या बेटावर अमृततुल्य, बहुमोल,दूर्मीळ अशा हजारो वनस्पती असून गेल्या कितीतरी वर्षांपासून परिसरातील व दूरवरुन कितीतरी लोक मोठ्या संख्येने तिथे येतात.त्या बेटावर राहतात, आणि बेटावर फिरुन तिथे असलेल्या सर्व प्रकारच्या वनस्पती खातात.. अनेक औषधी वनस्पती असल्याने लोक त्या वनस्पती खाण्यासाठी तेथे येतात.. विशेषतः श्रावण महिन्यात हे प्रमाण अधिक असते..
अख्यायिका अशी आहे की, रामायण काळी लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा हनुमानाने जो पर्वत उचलून आणला तो पर्वत घेऊन हनुमान या मार्गाने जात होते.त्यावेळी त्या पर्वतावर असलेली जी संजीवनी वनस्पती आहे ती त्या बेटावर पडली,वाढली आणि ती संजीवनी वनस्पती ह्या बेटावर आजही असून ती प्राशन केल्याने आयुष्य वाढते, माणूस अमर होतो व सर्व असाध्य आजार जे असतील ते लगेच दूर होतात म्हणून या बेटाला संजीवनी बेट असे म्हटले जाते व याला महत्त्व प्राप्त झाले असून व्याधीग्रस्त लोक लाभ घेतात याचे वास्तव समजणे व संशोधन आवश्यक आहे..