Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

वाटाड्या The stranger...

Abstract


3  

वाटाड्या The stranger...

Abstract


समाधान हवे आहे !

समाधान हवे आहे !

1 min 716 1 min 716

खूप प्रचलित पण कोणाकडेही नसणारा शब्द! याला मराठी समाधान, संतोष असेही म्हणतात. हा शब्द ऐकण्यासाठी खूप झिजावं लागत ! पण खूप कमी नशीबवान लोक असतात. ज्यांच्या पदरात हे सुख पडतं.


कितीही जीव ओतून काम केलं ना तरी त्यातले फक्त आणि फक्त नकारात्मक भावनेचे शब्द आपल्या वाट्याला येत आहेत. असं वाटायला लागलंय आता! आणि याचा चालता -बोलता शब्दकोश म्हणजे आपले वरिष्ठ ! ( जस नावे वेगळी पण काम एकच) त्यांना ही कलाच प्राप्त असते जणू. (कमी शब्दांत समोरच्या व्यक्तीला त्याची जागा दाखवणे) त्यांच्या नजरेत आपण फक्त आणि फक्त पराभूत असतो. आपण काम व्यवस्थित कसे करत नाही याचं प्रात्यक्षिक तर ते नेहमी देत असतातच. पण, आपल्यात ती क्षमता किंवा ते काय म्हणतात ते दर्जात्मक नाहीये अस त्यांना वाटत असावं. असा माझा एक समज आहे.


आणि जर ते आपल्या जागी असते तर आतापर्यंत ते काम केव्हाच पूर्ण झालं असतं. असं नकळतपणे मनावर बिंबवल जातं. ते कसय माहितीये का? त्यांना खूप पर्याय आहेत हो. पण आपल्याला पर्याय नाहिये ना. गरजवंताला अक्कल नसते हे कितपत खरं आहे याचा प्रत्यय आता येऊ लागलाय. पण एवढं मात्र, नक्की सांगतो की प्रयत्न पुरेपुर करुन देखील यश येतंच असं नाही ना.


आपली प्रांजळ इच्छा एवढीच की माणूस म्हणून पण कधीतरी आमच्याकडे बघा. कधीतरी आमच्या जागी स्वतः ला ठेवून बघा. तुमचा आधार वाटावा भिती नको. असो, माणुसकी जपा सगळं जग तुमच आहे. शेवटी सोबत तरी काय नेणार आपण.Rate this content
Log in

More marathi story from वाटाड्या The stranger...

Similar marathi story from Abstract