वेळ...
वेळ...
खरच ही वेळ आपल्या हातात नसते.सगळं काही आधीच ठरलेल असत.आपल्या जन्मापासून तर मृत्यू पर्यत.आपण किती जरी प्रयत्न केला तरी यात तिळमाञ बदल होत नाही.फक्त आपल्यावर जर वेळ आली तर आपण नशीबाला दोष देत बसतो.पण खर सांगायच झाल तर ती आपल्याला दर वेळी पूर्वसुचना देत असते,फक्त आपणच स्वप्न आणि वास्तव्य या गुंत्यात गुरफटुन ठेवतो स्वतःला.स्वप्न हे मृगजळासारखे असते तर वास्तव्य व हे एका शिळेसारखे असते. जे होत ते चांगल्या साठी होत असत हा सृष्टीचा नियम आहे.so lets face it. पण वेळ हातात असेपर्यत सावरलेल चांगल कारण दुसरी संधी दर वेळेस मिळेल असे नाही. आलेल्या संधीला न डावलता तिच्यातुन काहीतरी साध्य झालय यात आनंद आहे.भावनिक खेळ न करता वास्तव्य स्विकारत आहे
मान्य आहे खुप बदल होणार आहेत पण ते सगळ्यासाठी हिताचे आहेत.मनात नैराश्य नाहीय एक आनंद आहे की मी परिस्थितीशी नेटाने दोन हात केले पण वेळ माझी नाहीये,मला खंत पण नाहीये की माझी वेळ का नाही आली म्हणून ?? कारण जितका वेळ मला मिळाला तो आयुष्यातील सुवर्ण कालखंड आहे.