Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

वाटाड्या The stranger...

Others


1  

वाटाड्या The stranger...

Others


टॉपिकलेस

टॉपिकलेस

2 mins 473 2 mins 473

Passion, ध्येय, target, aim अजून बरेच काही शब्द असतील पण अर्थ एकच! जीवनात ध्येय असणे खूप गरजेचे आहे कारण जगण्यासाठी खूप काही गोष्टी महत्त्वाच्या असतात जसे की पैसा ! आपल्या आयुष्यातील अविभाज्य व महत्त्वाचा घटक !! लहानपणी शिकविले जायचे की जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी गरजेच्या आहेत पण जसे जसे मोठे होऊ लागलो तर कळलं की या सगळ्यासाठी पैसा लागतो! मग काय सुरु झाली वाटचाल पैशाकडे! तर पैसा कोणत्या क्षेत्रात जास्त आहे त्यानुसार अभ्यासक्रम निवडण्यात येऊ लागला. Doctor, engineer, MBA, MSW, D. FARM, B. FARM, etc,.....


पण कधीच विचार केला नाही की हे शिक्षण आपल्या कुटुंबाला परवडतय का नाही ! आपले वडील अहोरात्र कष्ट करतात! कश्यासाठी तर आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आपल्याला काही कमी पडु नये यासाठी ! त्यांनी तर आपल्या इच्छा आकांक्षा केव्हाच मागे सोडत सगळे जीवन आपल्या कुटुंबाला सक्षम बनवन्यासाठी खर्ची घातलं ! आपण शब्द टाकावा आणि त्यांनी तो पूर्ण करावा इतकी काळजी त्यांनी आपली घेतली ! आणि हो अजूनही ते सक्षम आहेत बरका ! आणि खंबिर आहेत ! आता तुम्ही म्हणाल परत बरळायला लागल हे ! विषय धरुन कधी बोलायला शिकणार काय माहित?? 

पण सगळ्यांना कळतय की मी काय बोलतोय व का बोलतोय ! खर सांगायच झाल तर आपण फक्त आपल्या आई-वडीलांकडून अपेक्षा करु शकतो पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ना आपल्यात कुवत आहे ना आपली लायकी आहे कारण त्यांच्या मुळे आपण आहोत हे विसरूनच जातो आपण ! आज काल वर्तमानपत्रात पण अश्याच बातम्या वाचतो आपण संपत्ती वाद आईवडीलांना वृद्धाश्रमात पाठवले ! Etc etc यार खर सांगा जन्मभर त्यांनीच करायचं का आपल्यासाठी??


आपलं काहीच कर्तव्य नाही का की त्यांना आनंद द्यावा ?? खरच कलयुग आलय राव ! अरे ज्याने जन्म दिला ज्याच्यामुळे जग पाहिलं त्या जन्मदात्याला वृद्धाश्रमात ठेवताना जरा पण लाज वाटत नाही का?? साला आनंद देता येत नाही तर दुःखी तरी करु नका ना ! अरे आपण आयुष्यात काही तरी बनाव यासाठी त्या माणसानं सगळं आयुष्य खर्च केल आपल्यावर आणि ते ही विनाशर्त ! So please सगळ्यांना हात जोडुन विनंती आहे की आता कर्तव्याला जागे व्हा !! त्यांना आनंद द्या खुश ठेवा ! कारण ते आहेत म्हणून आपण आहोत so please take care or ur parents !!

वाटाड्या the stranger ..


Rate this content
Log in