Dial 108...
Dial 108...


तारिख 6/2/2020 एका 40 दिवसाच्या मुलीला ह्रदय प्रत्यारोपणासाठी बेंगलोर वरुन मेंगलोरला हलवण्यास सांगितले ! वेळ खुपच कमी राहिलेला असतांना अगदी देवासारखा रुग्णवाहिका चालक त्या कुटुंबाच्या मदतीस धाऊन आला ! त्याने बेंगलोर ते मेंगलोर असे 347 किमी अंतर 4 तास सात मिनिटांत जवळ करत त्या चिमुकलीचा जीव वाचवला. हनीफ असे त्या वाहकाचे नाव आहे ! त्याने स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्या चिमुकलीचे प्राण वाचवले ! याचा विडीयो tiktok वर viral झाल्यावर लोकांना या घटनेची माहिती मिळाली ! यासाठी "green corridor" चा उपयोग करण्यात आला
यात पोलीस प्रशासन व सामान्य जनतेने मोलाची भूमिका निभावली. असे पहिल्यांदा झाल अस नाही पण नेहमीच अश्या प्रसंगी रुग्णवाहिका चालकाने आपला जीव धोक्यात घालुन इतरांचे प्राण वाचवले आहेत.. त्यांच्या या आत्मियतेला व ततपर्तेला सलाम .. त्यांची निष्ठा कामाविषयी असणारी श्रध्दा खरच घेण्यासारखी आहे! रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे ब्रीद ते तंतोतंत पाळतात . ..
पून्हा एकदा माझ्या चालक बांधवांना सलाम आणि मला गर्व आहे कि मी चालकाचा मुलगा आहे ....
सर्व चालकांना साष्टांग नमन....
जय हिद...
भारत माता की जय...