भावना...
भावना...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
आयुष्यात प्रत्येक पावलावर, सुख-दुःख,चांगले-वाईट अशा असंख्य गोष्टी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भावनांशी निगडीत असतात. आपल्या प्रत्येक कृती मागे कूठली ना कूठली भावना असते हे नक्की !
मनुष्य हा एक अतिशय संवेदनाशील प्राणी आहे. तो खुप लवकर व्यक्त होत असतो. परिस्थितीचा किंवा लोकांना काय वाटेल ?? याचा काडीचाही विचार न करता बोलून जातो. आता तुम्ही म्हणाल विषय सोडून बोलतोय म्हणून पण सांगायचं झालच तर भावनेचे उगमस्थान हे व्यक्त होणे आहे असे मी म्हणेल, कारण व्यक्त झाल्यानंतरच भावानिक बंध समोर येतात. आपण पाहतो
की प्रत्येक कवीच्या कवितेला भावनिक स्पर्श असतो .शायर पण आपल्या शायरीत भरभरुन व्यक्त होत असतो. दर्द, बेवफाई, प्रेम, सामाजिक इ घटकांवर भावनिक लेखन अतिशय प्रखरपणे केले जाते. भावना ही फक्त मानसशास्त्रीय संज्ञा नाही तर आपल्या सगळ्याच क्रियांमधे दिसुन येते. भावनांशिवाय मनुष्य हा एक चालता -फिरता निर्जीव देह आहे... कारण आपण श्वास घेतो ते पण जगण्याच्या भावनेनेच ना!!!!.आज जरा भावना वेगळ्या पद्धतीने मांडाव्याश्या वाटल्या . एकमेकांप्रतीच्या असो किंवा त्गागाच्या,प्रेमाच्या असो वा वात्सल्याच्या , भावना या भावनाच असतात