वाटाड्या The stranger...

Others

1  

वाटाड्या The stranger...

Others

लाॅकडाऊन

लाॅकडाऊन

2 mins
246


22 मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर 25 मार्चला लाॅकडाऊनला सुरूवात झाली. 21 दिवसाच्या या कालावधीत लोकांना खूप अडचणींना सामोरे जावं लागलं! सुरूवातीला काही दिवस या सुट्या लोकांनी एन्जाॅय केल्या पण त्यानंतर हळूहळू कंटाळा येऊ लागला. या कालावधीत कलम 144 लागू करण्यात आले. संचारबंदी लागली आणि जीवनावश्यक सेवाच चालू राहतील अशी व्यवस्था करण्यात आली. या वातावरणात खूप लोकांना नियम मोडल्यामुळे प्रसाद खावा लागला.

ही एकंदरीत पार्श्वभूमी लाॅकडाऊनची!!


पण वाढत्या रूग्णांची संख्या पाहता हे लाॅकडाऊन परत 3 मेपर्यंत वाढवण्यात आलं! याचं मुख्य कारण म्हणजे COVID-19 म्हणजेच की कोरोनाचा विषाणू!!


आता हा कसा आपल्याकडे आला व कसा वाढतोय? काय काळजी घ्यावी? काय करावं? काय करू नये? यासंबंधी सगळी तुम्हाला माहिती आहेच! पण यामुळे आपल्या शब्दकोशात काही नवीन शब्दांची वाढ झाली हे नक्की!!! जसे की, लाॅकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईन!!!


1) लाॅकडाऊन - म्हणजे ताळाबंदी म्हणजे संपूर्ण बंद पाळणे होय.

२) सोशल डिस्टन्सिंग - म्हणजे सामाजिक अंतर राखणे 

3) क्वारंटाईन - म्हणजे विलग्नवास होय.

पण या ताळाबंदीमुळे आपल्याला खूप फायदा झाला असं मी म्हणेल. कारण व्यस्त घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या आयुष्यात आपण वेळ देत नसलेल्या घरातील व्यक्तींना आपण वेळ देऊ शकलो. हे ठरवून पण जमलं नसतं! खूप दिवस धूळखात पडलेल्या आठवणी घर आवरण्याच्या योगाने ताज्या झाल्या. लोक विसर पडलेल्या छंदांना परत जोपासू लागले! आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगण्यासाठी खरंच काय आवश्यक आहे याची जाणीव झाली!!

 

जिंदगी मे पहली बार ऐसा वक्त आया है...

इंसान ने जिंदा राहने के लिए

कमाना छोड दिया है...


लहानपणी जे खेळ घरात बसून खेळायचो ज्या मालिका बघायचो त्या परत पाहायला मिळत आहेत!! यार यही तो असली जिंदगी है यारो!! अशी संधी देवाने दिलीय बालपण परत जगायची so enjoy childhood again and be with ur self again! 


हीच वेळ आहे स्वतःला परत भेटण्याची! स्वतःला शोधण्याची!!!  

so search yourself and be yourself again! 

आणि हो 

stay home stay safe!! 

आणि आरोग्यसेतू application download करा या लिंक वरुन!!


I recommend Aarogya Setu app to fight against COVID19. Please download and share it using this link Android : 

https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu

iOS : 

https://apps.apple.com/in/app/aarogyasetu/id1505825357

आज के लिए बस इतना ही!


Rate this content
Log in