सक्षम आहे ती.
सक्षम आहे ती.
मुलगी वाचवा देश वाचवा ही टॅगलाईन वाचायला ऐकायला नी दुसर्याला ऊपदेश देताना वापरायला अगदीच छान वाटते मात्र यापैकीच बरेच लोक स्वताच्या घरात प्रत्यक्षात किती प्रमाणात स्वीकारतात ही गोष्ट निरुत्तरीत आहे.बाईच्या अस्तित्वाचा प्रवास नी होरपळ नी संघर्ष अगदी आईच्या गर्भात असल्या पासूनच सुरू होतो कारण तीला खुडून टाकायचं की वाढवायच हे समाज ठरवत असतो.व जन्म देऊन फारच मोठे ऊपकार केलेत या तोरयात मुलीच पालन पोषण?होत असतं अगदी जेवणाच्या ताटातील अन्नापासुन शाळेच्या दप्तरातील कंपास पर्यंत व कपड्यांपासून करीअर पर्यंत, मुलगा असेल तर त्याच्या तुलनात्मक दृष्ट्या डावलले जाते व ही गोष्ट अगदी च किरकोळ वाटेल पंरतु बालवयात मुंलीच्या मनावर मोठे आघात करणार्या असतात. आणखी पुढे समाज नातेवाईक आगीत तेल ओतायला व च ची भाषा करायला आहेतच.जसं एखाद्याला पहीली मुलगी झाली तर वा वा धनाची पेटी लक्ष्मी वगैरे म्हणुन कौतुक करतील तेच दुसरी मुलगी झाल्यावर अरेरे..दुसरी पण.....मुलगीच झाली होय?असे शब्द इतक्या दयेने?शोकाकुल पणे...व ती जी कोणि व्यक्ति आहे जिला दुसरी मुलगी झालीये तिचे असे काही सांत्वन करतात जणू कोणितरी मरणं पावलेय व शोकसभेतच बोलत आहेत की काय असे वाटुन जाते का?लोकांची मानसिकता कशी व कधी बदलणार खर तर मुलगी वाचवा देश वाचवा याहुन मुलगी वाचवा जग वाचवा हे म्हणायची वेळ आहे नी नुसते बोलून काही होणार नाही कृतीमधून व मानसिकतेतून या गोष्टी स्वीकारायला हव्यात तो स्त्रीचा नैसर्गिक अधिकारच आहे.काही लोक असतात आम्ही आमच्या मुलीला स्वातंत्र दिलीय तुला हवे ते कर म्हणतो तीला आम्ही बांधुन नाही ठेवत वगैरे वगैरे गोष्टींचा ऊहापोह करतात.चार लोकांमध्ये पुन्हा पुन्हा आम्ही कीती महान पुढारलेल्या विचारांचे अहोत हे सांगण्याचा व दाखवण्याचा प्रयत्न करतात.मात्र त्यांना समजत का नाही की आपण कोण? तीला परवाणगी देणारे मोकळं सोडतो म्हणणारे कोण आपण?अरे तो तीचा हककच आहै की जसे मुलाच्या बाबतीत तेच तीचेही का नको?एका विशिष्ट वयानंतर ती एक स्वतंत्र व्यक्ति आहे जेव्हा विचारानी परिपक्व होइल तेव्हा तीला तीचे आयुष्य मुकत पणे जगण्याचा अधिकारच आहे. या जगात निसर्गात लाखो जीव प्राणि सुद्धा स्वतंत्र मुक्त आहेत मग मुलीला का बंधने कशासाठी?मुलगी शिकली सवरली तर एक सक्षम पीढी निर्माण करू शकते आपल कुटुंबाला मुलांना योग्य शिक्षण व संस्कार देऊन परिपूर्ण आदर्श परिवाराची मुहूर्तमेढ रोवते जेणेकरून एक आदर्श समाच घडविण्यात मोलाचा वाटा ऊचलते कारणं समाज व देश व्यक्तिसापेक्षच असतो ना एक तर स्री शिकली तर की कुटुंब सुधारेल मग समाज नि देशही सुधारतील व शेवटी जग सुधारेल या साऱ्याची सुरवात स्त्री शिक्षणापासूनचहोणार आहे एक सक्षम महीला देशाच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका बजावित असतेस्त्रीला लग्नाअगोदर वडील भाऊ यांच्या धाकात व पुढे नवरा व मग त्यानंतर स्वतःची मुले यांच्या धाकात म्हणा अथवा सेवेत म्हणा तिच संपुर्ण आयुष्य व्यथित करावे लागते. आणि समाज?समाजाची बंधन तर असहाय्य व जगणं नकोस करणारी आजही एखादी स्त्री परपुरूषाशी बोलताना दिसली, एखादी मुलगी चार मुंलाच्या घोळकयात असली अथवा जरा मोकळेपणाने वागायचा साधा प्रयत्न जरी केला तरीही तिच्याकडे पहाणारया नजरा ऊंचावतात डोळे मोठे होतात माना पून्हा पुन्हा वळतात का?तर आपल्याला सवयच नसते किंवा मानसिकता नसते मुलीला किंवा स्त्रीला इतक मुक्त पहाण्याची.करतर मुलीचा द्वेष करायला स्त्रीच कारणीभूत असते मुलगी झाली म्हणून सुनेला छळणयात सासु आघाडीवर असते.नातवंडामध्ये मुलाला गोजारायचे नि मुलीला हिडीसपीीडीस करायचे वा कायम पाणयात पहायचे अथवा दूर्लक्षित करून सतत जाणीव करून द्यायचे की तु परकी आहेस या गोष्टीत बर्याचदा आजीच आघाडीवर असते. भले तीही एक स्त्रीच आहे. मुलींच्या भविष्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवते स्त्रीयांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी पन्नास टक्के आरक्षणही आहे.परंतु एखाद्या गावात सरपंच असलेली स्त्री फक्त पदापुरतीच बाकी तिच्या आडुन सर्व कारभार तिचा पती सांभाळणार का?तीला मेंदू नाही का?तीही निर्णय घेऊ शकते विचार करू शकते पंरतु पुरूषी अंहकार तीला तसे करायला रोखत रहतो.आज एकीकडे मुली अवकाशात जावून आल्या डॉक्टर इंजिनिअरिंग वकील शास्त्रज्ञ राजकारण सिनेमा होटेल मॅनेजमेंट अशा कितीतरी क्षेत्राचा कारभार सक्षमपणे सांभाळतात तर दुसरीकडे मुलाची वाट पहात सात सात मुली जन्माला घालून तीन तीन गर्भपात करणार्या स्त्रीया ही याच देही याच डोळा एकविसाव्या शतकत या घडीला आपलया समोर घडत असताना पाहुन संतापाने जीव उद्विग्न होऊन जातो ............यावर उत्तर काय?
