Author Sangieta Devkar

Abstract Tragedy Inspirational

3.8  

Author Sangieta Devkar

Abstract Tragedy Inspirational

सीता आजची आणि पूर्वीची

सीता आजची आणि पूर्वीची

3 mins
86


एखादी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही. त्या बद्दल आपण तर्क वितर्क लावत बसतो. ख़ुप काही साचलेल असते ते शब्दात मांड़ावेसे वाटते.आपले विचार ही त्या प्रेशर कुकर सारखे असतात.मनात विचारांची गर्दी होते मग हे विचार शब्दा वाटे बाहेर पडू पाहतात जसे की कुकुरचा प्रेशर शिट्टीच्या रूपाने वाफ़ बनून बाहेर पडतो.तसच आज मी एक विषय तुम्हा सर्वा समोर मांडत आहे.समजा रामायणातील एखाद्या पात्राला प्रत्यक्ष भेटता आले तर मी रामाला भेटेन आणि माझे प्रश्न त्याला विचारेन. आज ही आपण आपलं आयुष्य जगत असताना कित्येकदा रामायणातील राम आणि सीतेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागावे अस म्हणत असतो. श्री राम एक मर्यादा पुरुषोत्तम ,आज्ञाधारी मुलगा आणि कर्तृत्ववान राजा . सीता सुंदर राजकुमारी,सहनशील आणि निष्ठावान पत्नी. ही सारी गुण वैशिष्ट्ये त्या दोघा मध्ये होती. म्हणूनच रामाने विना तक्रार 14 वर्षाचा वनवास स्वीकारला आणि पती प्रेमा पोटी सीता ही वनवासात गेली. ही गोष्ट चांगलीच आहे. पती च्या सुख दुःखात पत्नीच तर साथ देते. मग जी पत्नी सगळ्या सुखसोयी सोडून पती साठी वनवासात येते . जंगलात राहते आणि अचानक एके दिवशी तिचे अपहरण होते आणि रावण तिला आपल्या बंदिवासात ठेवतो. सीता जरी रावणा कडे होती कारण त्याला सीता आवडली होती तरी ही रावणाने तिच्या इच्छे विरुद्ध तिला स्पर्श केला नाही. त्याच्या कडे सत्ता होती. शक्ती होती तरी ही त्याने सीतेला सन्मानच दिला. पण रामाने जेव्हा सीतेला परत आपल्या कडे आणले तेव्हा एका धोब्या च्या बोलण्या वरून सीतेवर संशय घेतला आणि तिला अग्नी परीक्षा द्यायला भाग पाडली. जी पत्नी स्व इच्छेने पती सोबत वनवास स्वीकारते ती चरित्रहीन कशी काय असू शकेल? तिच्या साठी राम एकमेव पती परमेश्वर होता. ज्याच्या वर तिचा अगाध विश्वास होता त्या रामा ने लोकांच्या बोलण्या वरून तिच्यावर संशय घेतला का? तुमचे नात इतकं कमजोर आणि अविश्वासनिय होत का हो ? हाच प्रश्न मला रामाला विचारायचा आहे. मग आजची परिस्थिती बघता कुठे काय बदल झाला आहे? राम आणि सीते च्या नात्याचे दाखले आज च्या पिढीला का म्हणून द्यायचे? आज ही राम आणि सीता दोघे ही अस्तित्वात आहेत . आज नोकरी करत घर सांभाळनरी सीता नवऱ्याच्या संशयी वृत्तीला बळी पडते. ऑफिसमध्ये सह अनुयायी असतात त्यांच्या शी बोलणं,मिळून मिसळून राहणं म्हणजे नवऱ्या साठी तिच्या बद्दल संशयच! त्याला भरपूर मैत्रीनी असतात ते चालते पण बायको चा मित्र ? नाही बायकोला काय गरज मित्राची? बायको चा मित्र असूच शकत नाही असतो फक्त यार! ही आजच्या आधुनिक रामाची वर्तणूक. बायको दिसायला सुंदर असेल तर मग त्याच्या डोक्यात संशयाच भूत कायम थैमान घालणार. मग संशया वरून भांडन,वाद,घटस्फोट किंवा कधी कधी खून सुद्धा केला जातो. बायको ने सुंदर दिसू नये,छान सजून धजून जाऊ नये,परपुरुषाशी बोलू नये या तिच्या मर्यादा ज्या पुरुषानेच निश्चित केलेल्या. मग अस असताना का म्हणून आम्ही राम आणि सीतेचा आदर्श मुलां समोर ठेवायचा? त्या काळी ही सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती आणि आजची सीता ही वेळोवेळी अग्निपरीक्षा देतच आहे. सांगा मग पूर्वीची सीता आणि आजची सीता बदलली आहे का? काळ बदलला मात्र सीता मात्र तीच कायम राहिली अजून किती दिवस "सीता ""सीताच" बनून राहणार आहे तो एकटा रामच जाणो.

समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract