श्वानप्रेम
श्वानप्रेम
दस-याच्या दिवशी ओळखीचे प्रेमकाका सोने द्यायला घरी आले होते. पोर्णिमाने त्या दिवशी गुलाबजाम केले होते. तिने प्रेमकाकांना खायला वाटित गुलाबजाम आणून दिले.
ते म्हणाले, "पोर्णिमा मी गुलाबजाम खात नाही. "
पोर्णिमाने विचारले ,"काका , तुम्हाला डायबेटिस आहे का? "
ते म्हणाले , 'नाही.'
त्यांच्या डोळ्यात पाणी आले. हळवे होत ते म्हणाले "मी एक कुत्रा पाळला होता. मोती त्याच नाव. त्याला गुलाबजाम खूप आवडायचे.मी त्याला गुलाबजाम द्यायचो आणि मी खायचो. मोती अचानक गेला.तेव्हा पासुन मी गुलाबजाम सोडले. आज बारा वर्षे झाली मी गुलाबजाम सोडलेत."
मुक्या प्राण्यांवर अस प्रेम करणारी माणसे असतात याच पोर्णिमाला आश्चर्य वाटलं.
