Savita Jadhav

Action Inspirational

3.5  

Savita Jadhav

Action Inspirational

शोधा म्हणजे सापडेल

शोधा म्हणजे सापडेल

1 min
172


"आनंदी आनंद गडे...

जिकडे तिकडे चोहीकडे...

उघडून डोळे बघा जरा...

आसपास सगळीकडे...."


आनंद म्हणजे काय हो.....

सुख,समाधान, मानसिक शांतता.

हो न ?

अरे आनंद हा तर आपल्या अंतःकरणात असतो. पण होते काय की त्याच्या वर कधी कधी पुसटशी धूळ बसलेली असते.... नव्हे आपण ती धूळ बाजूला सारण्याचा कधी प्रयत्न करतच नाही.


"तुझे आहे तुजपाशी

    परि तु जागा चुकलासी."


असच वागतो आपण नेहमी. अरे आनंद काय समोरून कुणी तुम्हाला देऊ करणार नाही. तो कुठल्याही दुकानात विकत पण मिळणार नाही. आनंद विनामूल्य सापडेल. तो फक्त शोधायला हवा.


आयुष्यात न अगदीच छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा खूप मोठा आनंद देऊन जातात.


"शोधा..म्हणजे सापडेल"☺


भौतिक सुखाच्या मागे धावता धावता... जगण्यातला खरा आनंदापासून आपण दुरावत चाललो आहोत.


जरा मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण व्यतीत करा.

सकाळी सकाळी उठून पहाटेच्या धुक्यात फिरायला जा...

भर उन्हात एखाद्या झाडाच्या छायेखाली बसून मस्त गार हवेचा अनुभव घ्या. रिमझिम पावसात मनसोक्त भिजा.

रोजच्या धावपळीच्या जगापासून थोडे बाजूला येऊन मित्रांसोबत, कुटुंबातील लोकांच्या सोबत वेळ घालवा...

आनंदी व्हायला अजून काय हवय....मानसिक समाधानाची अनुभूति नक्कीच मिळेल.


जगण्यासाठी पैसा तर मिळवायला हवा आहे. पण त़ो मिळवताना... त्याच्या साठी कष्ट करताना... थोडाफार वेळ आपल्या आनंदासाठी दिलात तर नव्या जोमाने.... कामासाठी प्रेरित व्हाल.


ते म्हणतात न...


*आनंदाचे डोही...

      आनंद तरंग.*


अगदी तसेच,


तुम्ही आनंदी असाल... तर तुमच्या आसपास वावरणारे सगळे आपसूकच आनंदी होतील... 

आनंदाची देवाणघेवाण विनामूल्य...

आणि क्षणाक्षणाला वाढणारी.


चला तर मग..

हे जीवन सुंदर आहे..

आणखी सुंदर बनवू या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action