आत्मविश्वास
आत्मविश्वास
उज्वला खूप खूप हुशार होती.कॉलेजमधे एकदा जनरल नॉलेज या विषयावर स्पर्धा होत्या.तिनेही भाग घेतला.कोत्याही विषयावर बोलताना ती खूप छान पध्दतीने बोलायची.जबरदस्त आत्मविश्वास होता तिच्याकडे. पण तिने ज्या स्पर्धेत भाग घेतला होता...ती स्पर्धा खूपच कठिण होती पण तरीही उज्वला ने अतिशय चांगल्या प्रकारे उत्तर देऊन स्पर्धेत उज्ज्वल यश मिळवलं...
तिची एक मैत्रीण होती स्वाती नावाची...स्वातीला उज्वलाचं यश खटकत होतं...ती सतत इतर मैत्रीण जवळ काही ना काही बोलायची,गैरसमज पसरवायची,उज्वला आणि तिच्या इतर मैत्रीण मधे भांडण लावायची...उज्वला हुशार होती.पण हळवी खूप होती.... तिच्या मनावर खूप आघात होत होते स्वातीच्या वागण्यानं....
हळूहळू ती सर्वांपासून दुरावत चालली होती.अभ्यातलं सगळं लक्ष विचलित होत होतं...
उज्वलाच्या दादाच्या हे लक्षात आलं...आपल्या बहिणीसोबत विश्र्वासानं या विषयावर बोलण्याची गरज आहे..तिला या कोशातुन बाहेर काढायची गरज आहे हे ओळखून दादानं तिच्या सोबत बोलायचं ठरवलं.
एक दिवस दादा उज्वला ला घेऊन शेतावर फिरायला गेला..मग त्यानं हळूहळू तिच्या सोबत बोलायला सुरुवात केली... तिच्या मनातील सगळी सल ऐकून घेतली आणि मग तिला समजावून सांगायला सुरुवात केली.
हे बघ उज्वला.....
"Nothing is impossible in this life"
कसं कुणीतरी म्हणलय...
कुणी म्हणलय माहिती नाही..
पण अगदी बरोबर आहे ना...
अशक्य असे काही नाही...फक्त हवा आहे तो, आत्मविश्वास.....ध्येय..... चिकाटी....आणि जिद्द.
आत्मविश्वास, ध्येय हीच मोठी प्रेरणा असते,कुठल्याही ध्येयापर्यंत पोचण्यासाठी....भूतकाळात अडकून पडले तर ध्येय कधीच नाही गाठता येणार... भूतकाळ कवटाळून बसून काही साध्य होणार नाही... गेलेले दिवस पुन्हा येणार नाहीत...so think positive and go ahed...
नवी पहाट तुमची वाट पाहत असेल.... आयुष्यात संकटे येतच राहतील.... पण संकटांना घाबरून न जाता त्याच्याशी दोन हात करायची तयारी ठेवा... गरज आहे ती hard work ची....कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास कमी होता कामा नये.प्रेरणा देणारे कमी आणि मागे खेचणारे खूपच लोक भेटतात,,.... सल्ले देणारे देखील भेटतील... पण ध्येय साध्य करण्यासाठी तेच करा जे तुम्हाला योग्य वाटते...आणि असही जे हितचिंतक आहेत त्यांचेही आणि आई वडीलांचेही blessingsअसतात की पाठीशी..... जे तुम्हाला कायमच प्रेरणा देतील.
दादाचं हे बोलणं उज्वलाने मनापासून ऐकलं आणि तिला पटलं देखील...तिनं दादाला विश्र्वास दिला की यापुढे ती कधीही नकारात्मक विचार करणार नाही...येणाऱ्या प्रत्येक परिस्थिती मधे खंबीरपणे उभी राहिल.
दादानं आपल्या लाडक्या बहिणीचा आत्मविश्वास परत मिळवून दिल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.
