Savita Jadhav

Classics

4.0  

Savita Jadhav

Classics

स्मितहास्य

स्मितहास्य

2 mins
404


स्मितहास्याची जादुगिरी,

भुरळ पाडे मनाला,

भिरभरणारा भुंगा सुध्दा,

सुंदर हास्य पाहून स्थिरावला.


खरच खूपच जादू आहे या हास्यामधे,समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील एक स्मितहास्य कधी कधी खूपच कमाल करून जाते.

उदा.लहान बाळाचं हास्य साऱ्या कुटुंबाला भुरळ पाडत असतं...... कामावरून दमून आलेल्या बाबाचा कंटाळा क्षणात गायब करण्याची जादू बाळाच्या हास्यात असते.


अशीच जादू होते जेव्हा एखादी व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रासलेली असते,,,घरातील सदस्य, नातेवाईक सगळेच हताश झालेले असतात.....पण जर कुणीतरी आपुलकीनं छानशी स्माइल देत जर विचारपूस केली तर मात्र अर्धा आजार कुठच्या कुठे पळून जातो..... आणि हेच काम करतात डॉक्टर,नर्सेस आणि दवाखान्यातील इतर कर्मचारी.


अशाच एका सखीची कथा.....

......रजनी.......

भला मोठा परिवार

घरी शेती , गुरंढोरं ,दूधदुभतं कशाची कमी म्हणून नव्हती .सुख अगदी पायाशी लोळण घेत होतं.पण तिला मात्र समाजसेवा करण्याची खूप खूप इच्छा ...तिने लग्नाआधी परिचारिका प्रशिक्षण घेतले होते.....

लग्नानंतर घरातील सगळ्यांचा पाठिंबा मिळाला त्यामुळे तिने एक हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचं ठरवलं...ती नोकरीवर रूजू पण झाली. रजनीचा स्वभाव खूपच मनमिळाऊ,समंजस,आणि चेहरा देखील सतत हसरा असायचा..... सगळ्या पेशंट सोबत ती आपलेपणाने वागायची.अगदी सगळ्यांची न चुकता विचारपूस करायची.त्यामुळे फार कमी वेळातच ती सगळ्यांची आवडती बनली होती.


    पण झालं असं.......

कोरोनाच्या संकटकाळी पेशंटची सेवा करता करता तिलाही कोरोनानं ग्रासलं कोरोनाची लक्षणं दिसायला लागली.आणि सगळ्यांशी मिळूनमिसळून वागणारी,

सतत आपल्या स्मितहास्याने सगळ्यांना आपलसं करणारी "रजनी"...

रजनीला मात्र तिच्या या आजारपणात मनात असूनही कुणाला तिच्या आसपास पण फिरकता येत नव्हतं......सतत माणसांच्या गराड्यात राहणारी रजनी या एकटेपणानं अगदी खचत चालली होती ......तिच्या चेहऱ्यावर सतत खुलणारं स्मितहास्य जणू गायबच होत चाललं होतं.


पण तिच्या चांगल्या स्वभावाचं, तिनं केलेल्या सेवावृत्तीचे फळच म्हणा ना.....ती कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडली....घरी नेण्यासाठी तिचे घरचे सगळे....तिला निरोप देण्यासाठी दवाखान्यातील सर्व कर्मचारी हजर होते.घराच्या अंगणात गाडी थांबली तर तिच्यासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या...... आजारपणामुळे एकाकी रहावं लागलं म्हणून खचलेली,हसू हरवलेली रजनी सगळ्यांचं तिच्या वरील प्रेम आणि माया बघून अगदी हुरळून गेली....

आणि........

रजनीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा 

"स्मितहास्याची लकेर" उमटली‌.



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics