Savita Jadhav

Tragedy

4.1  

Savita Jadhav

Tragedy

ममता

ममता

2 mins
427


आई थोर तुझे उपकार,

आईच्या ममतेला तोड नाही.... उगीचच नाही म्हणत

आई खरचच ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे.

याचच उदाहरण म्हणजे ममता.


मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली .आईबापाची लाडाची लेक,दादा, वहिणीची लाडूबाई. बीए पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर...... ममता एकोणीस वर्षाची असताना एक स्थळ चालून‌ आलं.मुलगा बॅंकेत कामाला होता...घरचं पण चांगलं होतं.

लग्न झालं .छान संसार सुरळित सुरू झाला.ममताच्या घरचे सगळे खूप छान होते.

बघता बघता लग्नाला दोन‌ वर्ष झाले...संसाराच्या वेलीवर छान गोंडस बाळ जन्माला आलं.बाळ जेमतेम चार ते पाच महिन्यांचा असेल ...हे महिन्यात ममताच्या घरचे माहेरचे सासरचे सगळेच फॅमिली ट्रीपसाठी सिमल्याला गेली होती . सगळे खूप आनंदात मजा करून यायच्या वाटेवर होते......‌‌

पण.......


    अचानक दैवगती फिरली...त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला ...गाडी खोल दरीत कोसळली.....अपघात एवढा भीषण होता कि.... या अपघातात सगळेच्या सगळेजण जागीच ठार झाले.

पण ममता आणि तिचं बाळ मात्र बचावलं होतं. बचावकार्यात ममता आणि तिच्या बाळाला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.. काही दिवसांतच त्यांना घरी सोडण्यात आले. ममता बाळाला घेऊन घरी आली खरी पण घडलेला प्रसंग एवढा भयानक होता की ते आठवून,सतत तोच तो विचार करून ती पुर्णपणे भान हरपून गेली...तिचं मानसिक संतुलन ढासळलं... वेड्यासारखे बाळाला घेऊन सैरभैर धावत सुटली...कुठं जातोय काय करतोय कशाच भान नव्हतं तिला....आधार देणारं कुणीच उरलं नव्हतं...बाळाला घेऊन फक्त फिरत होती...‌‌‌‌‌‌‌पण एवढं सैरभैर होऊन देखील तिच्यातील आई मात्र जागी होती.


जरी वेड्यासारखे फिरत होती... मानसिक दृष्ट्या बिघडली होती तरी बाळाची मात्र काळजी घेत होती.....ती बाळाच्या आसपास कुणालाही भटकू देत नसे... काळजीपूर्वक बाळाकडे लक्ष देयची‌...अंगावर फाटके कपडे,विस्कटलेले केस ,कुठेतरी झाडाखाली निवांत बसून रहायची ,कुणु काय दिलं तरच खायची.या वेडेपणातच ......बघता बघता बाळ चालू बोलू लागला ....पाच सहा वर्ष वयाचा झाला...बाळ पण इतका समजूतदार होता की जेव्हा पासून त्याला समज आली तो आपल्या आईची काळजी घेऊ लागला..दोघं एकमेकांना सांभाळत एकमेकांच्या साठी जगू लागले....आता या दोघांना आसपासचे सगळे लोक ओळखू लागले होते...


एका संघटनेच्या माध्यमातून या दोघा मायलेकरांना हक्काचा निवारा मिळवून दिला आणि त्यांचे जीवन बऱ्यापैकी समाधानी रहावं यासाठी प्रयत्न करण्यात आले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy