Savita Jadhav

Action Inspirational

3.5  

Savita Jadhav

Action Inspirational

माणुसकी

माणुसकी

1 min
227


माणुसकी सर्वात महान आहे,

आपण साऱ्यांनीच जपली पाहिजे.

एकमेकांचा आदर राखून मान सन्मान जपला पाहिजे.

माणसाला माणुसकी वागण्यातून दिसते,माणसाच्या प्रेमळ

बोलण्यात ती भासते.आपली नातीगोती जशी आपणच जपायची असतात तसच माणुसकी देखील आपणच टिकवायची असते


अगदीच आहे खरं आपण आपलं बरं असावं,पण.......

माणुसकी जपताना कशाचीही भीती,कोणतेही डर नसावं.

माणूसकीनं वागावं माणूसकीनं जगावं आणि काही समस्या आल्या काही अडचणी आल्या तरी मार्ग काढून पुढे जावं 

माणुसकीने वागण्याचा विडा सर्वांनीच उचलला पाहिजे. सगळ्यांनीच साथ आणि हातभार थोडा का होईना लावायला हवा.


संघटितपणे वागू 

माणुसकीने जगू,

दगडात न पाहता 

देव माणसातच बघू.

घडो हातून देशसेवा,,

एकजुटीने कार्य करूया सुरू,

सारे मिळून माणुसकीची  

गुढी उंच उंच उभारू.


स्वार्थीपणाचे मळभ दूर करण्याचा प्रयत्न आपण सारे करू

आणि माणसामाणसात माणुसकीचे रंग भरू,

कसलीशी बाधा झाली करणी केली यासारख्या बुरसटलेल्या विचारांना दूर सारून गंडादोरा बांधण्यात येणाऱ्या प्रथा अंधश्रद्धा बंद पाडू आणि माणुसकी चा मनोरा उंच उंच फडकवू.


अहंकार अंगी भिणला तर माणूस माणसात राहत नाही,माणुसकी विसरतो ...मग आपण एकत्र येऊन माणुसकीच्या समूहात कोणताही जातपात आणू नये,

फक्त आणि फक्त माणुसकी धर्म असावा.


सत्य, अहिंसा, समानतेच्या,

शत्रूसंगे युद्ध करुया सुरू.

दया, क्षमा अन् शांततेचा,

माणुसकीचा अंगीकार करू.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action