Savita Jadhav

Action Inspirational

3.5  

Savita Jadhav

Action Inspirational

मानवी मन

मानवी मन

2 mins
259


माणसाच्या व्यक्तिमत्वाची ओळख त्यांच्या स्वभाव मनावर अवलंबून असते,कारण माणसाचं वर्तन हे त्याच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते.

     माणसाकडून ठराविक वेळी जे कार्य घडते, त्यावरून ती व्यक्ती चांगली आहे की वाईट, दयाळू आहे की रागीट,

यासारख्या गुणांची पारख केली जाते.

मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी माणूस नेहमीच प्रयत्नशील असतो.

पण काही वेळेसच त्याला यश मिळते आणि बऱ्याचदा अपयश.

   आपण जे करतोय ते योग्य आहे का? बरोबर आहे का?

जर चूक असेल तर पुन्हा काही चूक होता कामा नाही याची खबरदारी तो नक्कीच घेत असतो.


पण पुन्हा तेच, शेवटी सर्व मानवी मनाचे खेळ.

    निरोगी मन हेच माणसाच्या सुखद आयुष्याचे खरे रहस्य.

माणसाच्या निरोगी मनाचा त्यांच्या व्यक्तीत्वावर परिणाम होतो. आणि तीच त्या व्यक्तीची खरी ओळख दाखवून देते.

      माणसाचे व्यक्तीमत्व त्यांच्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांवरून ही ठरत असते. समाजात वावरणारे लोक समोरच्या व्यक्तीबद्दल वेगवेगळे समज ,गैरसमज करून घेतात. एखादी व्यक्ती बोलकी असते. एखादी अबोल,आपल्याच विश्वात रममाण असते. 

तर एखादी अगदी विचित्र स्वभावाची असते. 

पण या विचित्र स्वभावाला काही घटना कारणीभूत ठरतात.

माणसाच्या जीवनात घडणाऱ्या विशिष्ट घटनांच्या अनुषंगाने तो आपलं जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी धडपड करतो.

     उदाहरण..... सांगायच तर......

एखादा माणूस भोळा असेल आणि लोक त्याला वेडा म्हणू लागले, तर त्या घटनेचा त्याच्या मनावर परिणाम होतो आणि मला सगळे वेडा म्हणतात, मग मी खरचं वेडा आहे का? असा विचार करत करत.. तो स्वतः ला वेडा समजू लागतो.

     याचा अर्थ असा की.....

जर एखाद्या सामान्य माणसावर सतत लोकांनी दोषारोप केले, तर ज्या व्यक्ती वर दोषारोप केले जातात, त्या व्यक्तीला मात्र अनेक संकटाना सामोरं जावं लागतं.

सतत होणाऱ्या दोषारोप आणि टीका यामुळे एखाद्या व्यक्तीला खरोखरच गुन्हा किंवा चुका करण्यास हा समाजच प्रव्रुत्त करत असतो. 

     समाज दोन्ही बाजूंनी बोलत असतो.

चांगले घडले तरी आणि वाईट घडले तरीही.

समाजातील काही धूर्त लोक चर्चेचा विषय मिळावा म्हणून कायम तत्पर असतात.

   यासाठी आपण आपल्या मार्गाने गेले पाहिजे, आपल्याला योग्य वाटते तसे केले पाहिजे.


☝एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे,

 समाज हा आपल्या साठी नाही,  

     तर 

 आपण या समाजासाठी आहोत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action