आत्मसन्मान
आत्मसन्मान
माणसाच्या मुलभूत गरजा तर सगळेच जाणतात.
अन्न, वस्त्र, निवारा.
हो ना...
पण माणसाला आत्मसन्मान हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे.प्रत्येक व्यक्ती ला स्वतः चा आत्मसन्मान प्रिय असतो.
जिथं आत्मसन्मान असतो तिथे प्रत्येक गोष्ट जिद्दीने, चिकाटीने आणि आनंदाने केली जाते. पण नसेल तर मात्र सगळं व्यर्थच.
आत्मसन्मान म्हणजे काय ?
"स्वतः बद्दल जागरूक राहणं म्हणजे आत्मसन्मान."
तर स्वतः बद्दल प्रेम, स्वतः बद्दल आदर आणि विश्वास बाळगणं म्हणजे आत्मसन्मान.
आपल्या जीवनातील बऱ्या,वाईट गोष्टी ज्या घडतात त्याबद्दल आपण आपला निर्णय घेणं म्हणजे आत्मसन्मान.
अरे तोच नसेल तर आपण कोणतेच काम व्यवस्थित नाही करू शकत. सतत खंगलेल्या अवस्थेत राहणार,निराश राहणार..आपला हाच आत्मसन्मान आपल्याला सकारात्मक उर्जा देत असतो आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी साठी हिमतीने उभं राहण्याची पाठबळ देखील देतो.
आता हेच बघा न...
एखाद्या लहान मुलाला त्यांच्या मित्रांसोबत असताना तुम्ही रागवला तर ते किती चिडते...का तर तो त्याला अपमान वाटतो...हा त्याच्या आत्मसन्मानचा भाग असतो.
एखाद्या अपंग व्यक्तीला त्यांच्या मर्जीशिवाय मदत करणं म्हणजे त्याचा आत्मसन्मान दुखावल्या सारखे नाही का?
विविध ठिकाणी जर तुम्हाला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर तुम्ही मन लावून काम नाही ना करू शकणार...
असो ...
कितीतरी अशी उदाहरणे आहेत...
नव्हे माणसाच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे...
आत्मसन्मान.
सांगायचं तात्पर्य काय तर....
"आत्मसन्मानाचे जगणे..
तिथे नाही कशाचे उणे...
ज्याच्या ठायी आत्मसन्मान अफाट....
कशाला करावी उगाचच चिंता....
यश येईल पाठोपाठ...
जगणे होईल सुखकर आपोआप."
