Savita Jadhav

Action Inspirational

3.5  

Savita Jadhav

Action Inspirational

अंगण

अंगण

2 mins
156


अंगण .. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय.


अंगण साक्षीदार असते, कुटुंबातील छोट्या मोठ्या, बऱ्यावाईट,दु:खी,आनंदी सर्व क्षणांचे.


अंगणातलं ते सुंदर तुळशीवृंदावन जिथे तुळशीभोवती सडा सारवण करून छानशी रांगोळी रेखाटली जाते,मन:पूर्वक तुळशीमातेची पूजा केली जाते.

अंगणात धावतात दुडूदुडू पावले,अंगणातच रंगतो पाठशिवणीचा खेळ आणि अंगणातच होतो सवंगड्यांचा आपापसात मैत्रीचा मेळ,,,

पाऊस आला की भिजायला, अंगणात पडलेल्या गारा वेचायला भराभरा मुलांचा घोळका जमतो तो अंगणात.


घरात तर आपण राहतो,खातो ,पितो....बरच काही..पण जास्तीत जास्त वेळ घराच्या ओटीवर अंगणातच घालवला जातो...


अंगणातील निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पती,फुलझाडे,बागेत किलबिल करणारे निरनिराळे पक्षी त्यांचे सुमधूर आवाज,पहाटेची पक्ष्यांची मंजूळ वाणी मनाला मोहित करते.


अंगणात पडलेला प्राजक्ताचा सडा, गुलाब, मोगरा, जाई ,जुई यांचा सुगंध अंगणभर दळवळत राहतो,

झाडावर झोपाळा टांगून झोका घेत,सारीपाटाचे डाव रंगतात


रात्रीचं ते टिपूर चमचम चांदणं नयनरम्य दृश्य ते पहातच रहावस वाटतं ,अंगणीचे ते निंबोणीचे झाड,चांदोमामा चे लपण्याचे ठिकाण....या चांदण्यात,घराच्या अंगणातच थोरामोठ्यांच्या गप्पागोष्टी रंगतात,प्रत्येकजण त्यावेळी मनमोकळेपणाने आपल्या मनातील गोष्टी अगदी सहजपणे सांगत असतात.


इमानी कुत्रा टायगर

खरच खूपच भारी

अंगणात बसून करतो

घराची राखणदारी.


दिवसभर कामावरून दमून भागून आलेला बाबा अंगणातच येऊन बसले आणि चिमुकलं बाळ दुडूदुडू पावलांनी बाबाकडे झेपावते...


चिमुकली ती लाडूबाई रूसुन जाऊन अंगणात बसते आणि 

आई पाठोपाठ येऊन तिची मनधरणी करते, लाडक्या लेकीचा विवाह मंडप सजतो अंगणातच,सप्तपदीच्या फेऱ्या झाल्यावर तिथूनच तिची पाठवणी केली जाते.


अंगणात खूप खूप आठवणी रेंगाळत असतात.

🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀

अंगणात शोभा 

वाढवते तुळस

सांजसकाळी पुजिता

मिटतो सारा आळस.

अंगण म्हणलं की आठवते

मायाळू आजी आणि आई

दोघीपण छान गायच्या

आम्हा भावंडांना अंगाई.

दिवसाची सुरुवात अंगणापासून

दिवस सरतो अंगणात

चांदण्या रातीचा वावर अन्

रातराणीचा बहरही अंगणात.

माहेरच्या अंगणातलं

बालपण आज आठवलं

सगळ्या अल्लड ख़ोड्याना

आजही मनात साठवलं.

खंत एकच आहे........

कॉंक्रीटच्या जंगलात

हरवलय जीवन

दाखवायला पण उरले नाही

दाराच्या पुढती अंगण.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action