Savita Jadhav

Action Inspirational

3.5  

Savita Jadhav

Action Inspirational

छंद

छंद

1 min
177


धकाधकीच्या जीवनात,

जोपासावा छंद,

मिळेल जगण्याचा,

खूप खूप आनंद.


जेव्हा जेव्हा कंटाळा येईल,मन खूपच उदास होईल तेव्हा आपल्या आवडत्या छंदामधे वेळ घालवावा, त्यामुळे नक्कीच ताजेतवाने हमखास वाटेल


खेळाचा छंद हा आरोग्यासाठी फार उपयोगी आहे त्यामुळे जीवन निरोगी बनते.

गायनाचा छंद मनाला आनंद देतो आणि संगीताचा संग हा जीवनात रंग भरतो.

हसण्याचा आणि हसवण्याचा छंद यामुळे तर मनाचा भार हलका होतो.

कलेचा छंद जोपासताना कलेमध्ये रमताना कशाचे भान नाही उरत


एकमेकांच्या खोड्या करणं हा भावाबहिणीचा लाडका छंद,

या अवखळपणातून पण त्यांना खूपच आनंद मिळतो.


लहानग्या मुलांना लटकेच रूसण्याचा छंद असतो आणि या छंदातून रूसवा त्यांचा काढताना आईबाबाला आनंद मिळतो


लहानपणीचा आईची अंगाई ऐकण्यात दंग होऊन जायचा छंद.....आजीच्या कुशीचा मांडीवर बसून परीकथा ऐकण्याचा छंद


प्रत्येक गृहिणीचा छंद नवनवीन काहीतरी करण्याचा, मनसोक्तपणे इतरांना खिलवण्याचा.


छंद अनेक प्रकारचे आहेत.....

पळणे,पोहणे,बागकाम, गडकिल्ल्यांच्या भटकंती, वेगवेगळ्या जुन्या नव्या वस्तूंचा संग्रह करणं,वाचनाची आवड जोपासना,अजून बरंच काही.......

आपल्यातील कलागुणांना ओळखून छंद जोपासण्याची खूप गरज आहे.


देव सखा हरी पांडुरंग त्या विठूरायाच्या भक्तांना विठू नामाचा छंद असतो आणि हा नामजप करताना भोळ्या भक्तांना परमानंद मिळतो.


देवघरातील अगरबत्ती,

तिचा दरवळणारा सुगंध,

आवडता छंद जोपासताना,

मनाला मिळतो आनंद.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action