शोभते का हिला?
शोभते का हिला?
बघ कशी नटून चालली आहे.ड्रेस घालते आता अगदी नवीन फॅशन चे.
हो ना ,केस पण मोकळे सोडलेत.
लिपस्टीक पण लावली आहे ,हिला शोभते का हे अस या वयात वागणं?
काल तर तिच्या कडे पार्टी होती किती ते मित्र मैत्रिणी आल्या होत्या.
सोसायटी च्या आवारात काही बायका खुसरपुसर करत होत्या.
स्मिता ने त्यांच्या कडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि निघून गेली.हे नेहमी चेच होते.तिच्या दिसण्या वरून, वागण्या वरून,तिला नेहमी टोमणे ऐकावे लागत होते.
आज सोसायटी ची मीटिंग होती.पुरुष बायका सगळेजण क्लब हॉल मध्ये जमले होते.स्मिता आली तसे तिथे असलेल्या बायका पुन्हा गॅसिप करू लागल्या. मीटिंग झाली तशी स्मिता उठून उभी राहिली,मला थोडे बोलायचे आहे.
स्मिता मॅडम काही अडचण आहे का? चेयरमन म्हणाले.
अडचण मला काही नाही अडचण या सोसायटी मधील बायकांना आहे.खूप दिवस म्हणजे मी इथे राहायला आले तेव्हा पासून बघते की माझ्या दिसण्या वरून माझ्या कप ड्यान वरून माझ्या बद्दल खूप गॉसिप केले जाते.हो मी एक विधवा आहे.माझं वय आता बावन्न आहे.तरी ही या वयात मी छान नीटनेटकी राहते. फॅशनेबल कपडे घालते.कसे आहे ना मी विधवा झाले यात माझी काय चूक? आणि कोणी सांगितले की विधवा बाई ने नटायचे नाही,सुंदर दिसायचे नाही? मी सर्वात आधी एक" माणूस" आहे त्यांनतर विधवा आहे.मला ही मन भावना आहेत.पूर्वी चा काळ वेगळा होता पण आता काळ बदलला आहे आणि मला काळा नुसार राहायला आवडते.माझा मुलगा अमेरिकेत असतो,मुलगी लग्न होऊन सासरी गेली.मी एकटी राहते नोकरी करते कोणावर अवलबुन नाही.माझ्या जागी एखादा पुरुष विधुर झाला तर तो त्याच्या मर्जी ने हव तस जगू शकतो.मनात आले तर साठीत सुद्धा तो लग्न करू शकतो.मग मी केवळ एक स्त्री आहे आणि ती ही विधवा म्हणून मी माझ्यावर बंधन घालून घ्यायचे ? का? आणि कशा साठी?
आयुष्य एकदाच मिळते ते मना सारखं जगण्याचा मला तुमच्या सारखाच अधिकार आहे.नवरा गेला माझा तेव्हा चार वर्ष मी डीप्रेस होते.आमचं एकमेकां वर खूप प्रेम होते.माझा नवरा मला नेहमी म्हनायचा, स्मिता आता जशी छान राहतेस तशीच कायम राहत जा.माझ्या नतर ही अशीच रहा,कोणा साठी तू तुझं आयुष्य बदलू नकोस.
तुमच्या कडे बघून मला कीव वाटते की एक बाई असून दुसऱ्या बाई च्या भावना तुम्हाला समजत नाहीत.आपल्या समाजात एक स्त्री च दुसऱ्या स्त्रीला अपमानित करते ही खेदाची बाब आहे.असो तुम्ही माझ्या बद्दल काही ही बोला मला त्याचं काही वाटत नाही पण मला इतकंच सांगायचे आहे की स्वतः ला माझ्या जागी ठेवून बघा.
स्मिता मॅडम तुम्ही बरोबर बोललात. चेयरमन म्हणाले.
तिथे असणाऱ्या सर्व बायका खाली मान घालून गप्प बसल्या होत्या.त्यांची चूक त्यांना उमजली होती.त्या स्मिता ला सॉरी बोलणार होत्या पण स्मिता तिथून निघून गेली होती.
(समाप्त)