Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

शीर्षक संसाराची दैना

शीर्षक संसाराची दैना

1 min
268


सोपान कामावरुन खाल मानेने लगेचच घरी आला अन् काशीच्या काळजात धस्सं झालं.त्याच्या चेह-यावरुन काही विचारण्याआधीच सारं समजून गेलं,

"आपण इस्पितळात जाऊ"

"हं" रोज हमरीतुमरीवर येऊन भांडणारा सोपान एकदम गप्पगप्प झालेला बघून काशीच्या पोटात तुटलं.

 हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याच्या सर्व तपासण्या सुरु झाल्या. आता पैसे लागणार या भितीने तिचे हातपाय थरथर कापू लागले.

"मी जरा जाऊन येऊ का?" काशीने नर्सना विचारले.

नर्सनी हो सांगितल्यावर, तिने सोनाराचे दुकान गाठले. मंगळसूत्र विकताना तिच्या डोळ्यांत पाणी आले,पण काही इलाजच नव्हता. धन्यावर उपचार तर करायलाच पाहिजेत.

  

 पैसे घेऊन ती हॉस्पिटलमध्ये आली. सोपानच्या डोळ्यांत पाणी बघून तिच्या जिवाची घालमेल झाली.

"अहो, वाटंल बरं. नगा काळजी करु."

"अगं पण पैशाचं......

"मी आणलेत पैसे"

अगं पण कुठून?"

"माझं मंगळसूत्र........

दोघांच्याही डोळ्यांना धारा लागल्या .

तेवढ्यात नर्स रिपोर्ट घेऊन आल्या.

"तुमची कोरोना चाचणी निगेटिव्ह आलीय. 

सोपानने काशीला भावनावेगाने जवळ घेतले

आज काशीला तिचा नवरा ख-या अर्थाने मिळाला होता

अन् उद्या मंगळसूत्रही


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract