शीर्षक सल्ला , सल्ला , सल्ला
शीर्षक सल्ला , सल्ला , सल्ला
सल्ला हा विषय कथेसाठी घेतल्यावर मला ही खूप वर्षांपूर्वीची घटना आठवली.
आम्ही व मुले रविवारी संध्याकाळी बाहेर जायला चप्पल घालायला व एक जोडपे चार वर्षाच्या मुलाला घेऊन यायला एकच गाठ पडली. मी तोंडातल्या तोंडात चक् करुन चपला काढल्या.
वकीलांसाठी अशील महत्वाचा असतो. त्या दोघांचे पटत नव्हतेआणि दावा दाखल करायला उद्या किती वाजता येऊ असे विचारायला आलेले. ह्यांचे लवकर संपते का बघायला मी तेथून दरवाजापर्यंत चक्कर मारली .,तर मुलगा टेबलावर माझे मिस्टर व आईबाबांच्या मधे अत्यंत केविलवाण्या चेह-याने आळीपाळीने आलटून पालटून पहात होता.त्यांचे बोलणे चालूच होते तासभर. बाहेर जाण्याचा बो-या उडलेला. मी पुटपुटतच स्वयंपाकाला लागले.
हे बाहेरच्या केसबद्दल कोणालाच काही सांगत नाही . मीही विचारत नाही आगदी माझ्या मैत्रिणीची केस असली तरी!!
"जयूताई एखाद्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो" एवढेच वाक्य माझ्या रागावलेल्या चेह-याकडे बघून म्हणाले.
ह्यांनी त्या दोघांनाही एक दिवस पूर्ण विचार करायला सांगितले. मुलाचा ताबा आईकडे जाईल. बघा हा छोटा किती रडवेला झालाय. त्याची काय चूक आहे तुमच्या भांडणात? मलाही दोन मुले आहेत. थोडी तडजोड केलीत तर त्याला तुम्ही दोघेही मिळाल. मुलं लांब जाणे तेही कायमचे, बघा खूप अवघड जाईल एक बाप म्हणून"
बापाच्या काळजालाच हात घातल्याने, कायदा बाजूला ठेवून एक कुटुंब जुळवून मुलाचे आयुष्य हसतखेळत जाण्यासाठी त्यांना भविष्यातील सर्व गोष्टीची खरी जाणीव करुन दिल्याने, जे जोडपे उद्या दावा दाखल करायला कधी येऊ? असे विचारायला आले होते , तेच जोडपे दुस-या दिवशी पेढे घेऊन आले.
सल्ला फी पण द्यायला लागले. "अहो तुमचा किती वेळ गेला"
काही गोष्टी करुन पुण्य मिळते. त्याची किंमत पैशात करता येत नाही.
सल्ला डॉक्टरांचाही असतो. पण काही लोक पथ्ये धुडकावून वाटेल ते खातात आणि नंतर रोग बळावल्यावर डॉक्टरचे काम कठीण करुन ठेवतात.
माझ्या मिस्टरांची नोकरी गेल्यावर खूप लोकांनी राजीनामा मागे घेण्यासाठी माझी मनस्थिती ठीक नव्हती , मी वेडाच्या भरात राजीनामा दिला आसे सल्ले दिले. तेव्हा शेजारच्या वहिनींनी त्यांच्या मिस्टरांना सांगितले .ते न्यायाधीश. त्यांनी मला बोलवून घेऊन सांगितले "तुमची मनस्थिती मी समजू शकतो पण कोणीही काहीही वेडेवाकडे सल्ले दिले तर त्याप्रमाणे प्लीज action घेऊ नका.जी खरी परिस्थिती आहे ती प्रथम तुमच्या immediate बॉसना सांगा.वेळ पडली तर सिनिअर्सना भेटा.तुमची मुले लहान आहेत. खरे सांगून जेवढे अपील होते, ते खोटे सांगून कधीच नाही. तुमचे वय लहान आहे. ह्या वयात चुकू शकतो एखादा decission."
आणि प्रत्यक्षात तसेच झाले. खरेखरे सांगितल्याने मी reinstate झाले. प्रपंच सावरु शकले. मुलांना उच्चशिक्षण देऊ शकले ,राजकारणाच्या बाबतीत विचार केला तर घरात बसण्याचा सल्ला त्याही जनतेला दिला होता,पण त्यांनी तो न मानल्याने त्यांच्यावर लाखाने माणसे गमविण्याची दुर्दैवी वेळ आली.
काही लोकांना ज्या घरात कोणी मरणासन्न अवस्थेत असतानाच "अहो ह्यांना फोन करा ,त्यांना बोलवा ,काय बाई ह्यांची अवस्था झालीय!! जरा कोणी मांडीवर घ्या शेवटची इच्छा विचारा निलगिरी आणून ठेवा असे अनाहूत सल्ले द्यायची सवय असते. पण त्यामुळे चिंताग्रस्त दुःखी मनस्थितीत आसणा-या नातेवाईकांचे मनोधैर्य खचते. उपचार चालू आहेत. कशावरुन ती व्यक्ती वाचणार नाही?ह्यांची निलगिरीची घाई किती उथळपणाची!!
सल्ला देताना विचार करुन ,काळ वेळ ओळखून द्यावा. जर गरज असेल तरच द्यावा.सल्ल्याने कुणाचे भले होणार असेल तर नक्कीच द्यावा.
