Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

शीर्षक आनंद

शीर्षक आनंद

1 min
248


  ह्यावर्षीच्या दिवाळीत सर्व मुलांनी ठरवले की अजिबात फटाके उडवायचे नाहीत. ते पैसे अनाथाश्रमातल्या मुलांना मदत म्हणून द्यायचे.आपले बाहेर जायचे कपडे त्यांना द्यायचे.तसेच प्रत्येकानी एक पदार्थ डबा भरुन आणायचा म्हणजे त्यांना ,सर्व पदार्थही मिळतील.

   शामच्या डोक्यात आजून एक कल्पना आली. आपण आपले खाऊचे पैसे ,वाढदिवसाचे पैसे एकत्र करुन त्यांना देऊया.मुलाःमधे खूप उत्साह आला. गाणी , गोष्टी , विनोद आणि सिंथेसायझर वादनाचा असा एक तासाचा कार्यक्रम बसवला.मुले आठ दिवस आधी आनाथाश्रमाच्या संचालकांना भेटून कार्यक्रम ठरवून आले , पण त्यांनी मुलांना काही सांगू नका असे सांगितले.

    त्यादिवशी पहाटे वाजता मुले सर्व मुलांना कॉफी व बिस्कीटे घेऊन गेले.त्या मुलांना छान वाटले.त्याःच्या आंघोळीच्या वेळी फुलबाज्या लावल्या.मुलांचे चेहरे तेजाळले. त्यांना तसेच नंतर लगेचच अर्ध्या तासाने फराळाची ताटे मांडली. मुलांच्य चेह-यावरुन हर्ष ओसंडून वहात होता. ते बघून ह्या मुलांनाही आनंद झाला.

   नंतर करमणूकीचा कार्यक्रम आहे हे कळल्यावर त्यांच्या हर्षाला पारावार राहिला नाही.मुलांनी छान सादरीकरण केले.त्याला ह्या मुलाःनी टाळ्यांच्या जल्लोषात दाद दिली.

     परत येताना त्या मुलांच्या डोळ्यांत पाणी आले.

" किती केलेत तुम्ही आमच्यासाठी!!मनःपूर्वक धन्यवाद "

मुले म्हणाली " धन्यवाद नका म्हणू .तुम्ही आमचे भाऊ आहात. तुमच्या जीवनात बदल व्हावा , दिवाळीचा आनंद फुलावा म्हणून आम्ही हे केले.

   त्यांचा प्रेमळ निरोप घेऊन मुले घरी आली .सोसायटीमधील सर्वांनी त्यांचे आईस्क्रिम देऊन स्वागत केले. त्यांना भेटवस्तू दिल्या व अध्यक्षांनी त्यांचे खूपच कौतुक केले.अशा त-हेने दिवाळीचा आनंदीआनंद झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract