STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

साथ दे तू मला (भाग 27)

साथ दे तू मला (भाग 27)

3 mins
148

आर्या ने येऊन समीर ला मिठी मारली.टेक केयर समीर.इतकं बोलून आर्या मागे न पाहता घरा बाहेर पडली.समीर तिला पाठमोरी जाताना बघत राहिला.


कशी आहेस आर्या? मितेश आणि आर्या एका कॉफी हाऊस ला बसले होते.

मी ठीक .तुझे लिखाण काय म्हणते?

चालू आहे .अजून बरच लिहीन बाकी आहे.

मी समीर ला भेटून आले मितेश.

काय म्हणत होता तो.?

हि स्टील लव मि..मला पुन्हा एकदा विचार कर म्हणत होता.

ओह..मग तू काय सांगितलेस?

मितेश मी माझा निर्णय त्याला सांगितला.मला आता त्याच्या सोबत नाही राहायचे.कस असते सुरवातीला सगळच छान आणि गुडी गुडी वाटते पण नंतर जस जसे एकमेकांच्या सहवासात आपण येतो तेव्हा मग काही गोष्टी खटकायला लागतात .

आर्या,अस तर प्रत्येक माणूस हा काही अगदी परफेक्ट नसतो ग.काही गुण दोष असतात प्रत्येकात.एकमेकांना समजून घेत पुढे जाणे यालाच तर रिलेशन म्हणतात.

मितेश,तू एक रायटर आहेस, सो तू असा भावनिक विचार करू शकतोस .तुला तेच पटते..पण प्रॅक्टिकल जगात तसचं प्रॅक्टिकल जगावे लागते.

यू मिन टू से..उद्या माझ्यात काही दोष दिसला तर तू माझ्याशी असलेलं नातं तोडून टाकणार.?


मितेश,अरे तुझ्या बाबतीत मी काही बोलले का? फक्त एक लॉजिक सांगते.

आर्या लॉजिक म्हणजेच आयुष्य नसते.खूप तडजोड आणि काही वेळा त्याग ही करावा लागतो.तो ही आपल्या जवळच्या माणसा साठी.

मितेश मला माहित आहे,तू जो त्याग केलास तुझ्या प्रेमाचा.आय अग्री पण त्याने काय मिळवलेस तू? ती जुई तुझी आठवण पण काढत नसेल.

आर्या,त्याग मी माझ्या प्रेमा साठीच केलाय.जुई साठी केला.नाहीतर पळून जावून आम्ही लग्न करू शकलो असतो.

मग का नाही गेलात पळून.?

हेच आर्या, आमच्या प्रेमा पेक्षा मला जुई च्या आई बाबांची काळजी होती त्यांना जुई शिवाय दुसर कोणी नाही आयुष्यात.

मितेश,आपण इतक्या दिवसांनी भेटतो आहोत आणि तू कसला टॉपिक घेवून बसला आहेस.

ओके आय एम सॉरी..चल आपण लाँग ड्राईव्ह ला जावू.

चल.म्हणत आर्या उठली.दोघे ही सिंहगडा कडे आले.मितेश ची बाईक होती ती एका बाजूला पार्क केली आणि दोघे हातात हात घेत चालत राहिले.तिथे सगळे त्यांच्या सारखेच कपल फिरायला आले होते.एके ठिकाणी ते दोघे सावली बघून बसले .मितेश ने आर्या ला आपल्या मिठीत घेतले होते,तिचा हात हातात घेत तो म्हणाला,आर्या,डू यू रिअली लव मि?

असे का विचारतो मितेश..प्रेम आहे म्हणून आज कोल्हापूर हून तुला भेटायला आले ना?

आर्या,मला आता तुला गमवायचे नाही ग.माझ्या कडे सगळ काही आहे पण प्रेम करणार आपल,माझं अस कोणीच नव्हते तू आलीस माझ्या आयुष्यात आणि पुन्हा मी जगू लागलो.

मितेश आय एम विथ यू ऑलवेज..

त्याने आर्या च्या ओठावर आपले ओठ ठेवले..तिचे एक दीर्घ चुंबन घेतले.आर्या त्याच्या मिठीत अजूनच सामावत जात होती.दिवस भर दोघे एकमेकां सोबत होते.खूप फिरले मग संध्याकाळी परत आले.

आर्या,तू कुठे उतरली आहेस? मितेश ने घरी निघताना तिला विचारले.

माझ्या मैत्रिणी कडे जाणार आहे.

आर्या,मला तुझ्या सोबत राहायचे आहे,अस पण उद्या तू परत जाणार आहेस ना.तुझी इच्छा असेल तर.आय डोन्ट फोर्स यू.

आर्या ला ही त्याचा सहवास हवा होता, त्याच्या सोबत जितका जास्त वेळ घालवायला मिळेल तितका तिला ही हवा होता.

मितेश..कुठे जायचे सांग.मी येते.लाजत आर्या म्हणाली.

छानस हॉटेल बघतो मी..ओके तो ही हसत म्हणाला.

आर्या आणि मितेश एका हॉटेल मध्ये आले.रात्री ड्रिंक आणि डिनर त्यांनी केले.मितेश आर्या च्या मांडीवर डोके ठेवून पडला होता,आर्या त्याच्या केसा मधून आपला हात फिरवत होती.रूम मध्ये म्युझिक सिस्टीम सुरू होते..सुंदर असे गाणे लागले होते.

"मेरा दर्पण अँखियाँ तेरी

तुझको तरसे रतिया मेरी

जीना मुझको रास आने लगा

जबसे चहकी बतिया तेरी


जोगन तेरा मारा रसिया

जग जीता दिल हारा रसिया

पग तेरे चौबारे ठहरे

सदके मैं बंजारा रसिया..

मितेश आर्या च्या नजरेत हरवला होता त्याने तिला आपल्या कडे ओढले आणि तिला किस केले.आर्या त्याच्या स्पर्शाने रोमांचित झाली.त्यात गाण्याचे बोल मनावर गारूड करत होते.

रसिया ये तेरा हुआ

तूने जिया मोह लिया

रसिया ने तेरा है जो

वही तुझे सौंप दिया


रसिया रसिया...

दोघे एकमेकांना स्पर्श करत किस करत राहिले. प्रणयाच्या सागरात ते चिंब भिजत होते.

सकाळी आर्या लवकर उठून तिने आपले आवरून घेतले.मितेश अजून ही झोपला होता.त्याच्या अंगावर फक्त पँट होती.शर्ट नसल्याने त्याची कसदार शरीरयष्टी खूप आकर्षक दिसत होती.आर्या भान हरपून त्याच्या कडेच बघत होती.झोपेत मितेश खूप गोड निरागस दिसत होता.आर्या त्याच्या जवळ बसली आणि त्याच्या छातीवर तिने आपले ओठ टेकवले.तिच्या स्पर्शाने मितेश ला जाग आली "आर्या ,तुझं आवरले पण..तू खरच जाणार आहेस का?

हो,मितेश. आता जाते पण पुन्हा येईन ना.आय मिस यू..मितेश मग उठून बसला तिला आपल्या मिठीत घट्ट आवळले."आर्या,आय मिस यू लॉट..

मितेश,आय लव यू.

लव यू टू..म्हणत आर्याने त्याचा डीप किस घेतला.


क्रमशः #Authore of the year २०२२


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract