STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

साथ दे तू मला (भाग 25)

साथ दे तू मला (भाग 25)

3 mins
147

हो मितेश नको काळजी करू.

पोहचली की मेसेज कर.आर्या घरी गेली.

मितेश बेडवर सुन्न मनाने बसून राहिला

"तेरी दुरी का दर्द,कैसे हम बया करे,?

तुझं बिन जीं ना सके, मरना सके."(sangieta)


आर्या गेली .तसे मितेश चे मन ही उदास झाले तिला इथे सोडून जाणे त्याच्या जीवावर आले होते.आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचा ऋतू आला होता.त्याला तो भरभरून जगायचा होता .पण त्याचा नाईलाज ही होता.आर्या येईल ना आपल्याला भेटायला पुण्यात अशी मनाची समजूत घालून तो झोपी गेला.

सकाळी लवकर उठून आवरून मितेश हॉटेल मधून बाहेर पडला.आर्या ला कॉल लावला.,हॅलो आर्या गुड मॉर्निंग.

हाय मितेश ..आवरले का तुझे.?

हो आता निघतोय कार मध्येच बसत आहे.

मितेश,नीट जा आणि पोहचला की मला मेसेज कर.

हू...त्याचा आवाज कातर झाला होता.मितेश इतका हळवा होता की अगदी छोट्या छोट्या गोष्टी ही त्याला मनाला लागून राहत असायच्या.आता ही तो सेंटी झाला होता.आर्या ,आय मिस यू स्वीटहार्ट.

मिस यू टू मितेश..टेक केयर..आर्या ने कॉल ठेवून दिला.नाहीतर तिला ही त्याला निरोप देणे जड झाले असते.


मितेश ने कार सुरू केली,मन फ्रेश व्हावे म्हणून एफ एम सुरू केले.

"मुस्‍कुराहट या नमी होगी

जितने गम जितनी खुशी होगी

बांट लेगे मिलके दोनो क्‍या कमी होगी

संग तेरे जिंदगी कितनी हसीन होगी..

दिल मे पायी राहतें

कम हुए कुछ गम

जब से मेरी जिंदगी में

आ गए हो तुम

मेरी सूनी रात में

खाली बंजर राख में

ख्‍वाब लाए तुम


इन लबो पे फिर हँसी होगी

हो हर तरफ बस रोशनी होगी

आसमां से खूबसूरत ये जमीं होगी

संग तेरे जिंदगी कितनी हसीन होगी..अर्जित च्या आवाजात हे गाणं सुंदर वाटत होते जणू मितेश च्या मनाची भावनाच त्या गाण्यात  सामावल्या होत्या.


आर्या त्याच्या आयुष्यात आली आणि पुन्हा त्याच आयुष्य रंगीत झाले.मितेश पुण्याला येऊन एकदम उत्साहात लिखाण करू लागला.स्टोरी मस्त जमत आली होती .त्याने अनुभवलेले काही काल्पनिक असे बरेच प्रसंग त्याने त्या कादंबरीत लिहिले.खूप सुंदर अशी कथा तयार होत होती.त्याच्या आयुष्यात सगळ कस छान आणि सुरळीत चालू होते आर्या सोबत त्याचे रोज बोलणे होत असे ..मेसेज,एकमेकांचे फोटो शेयरिंग चालू होत.

मेहता एकदा पुण्यात आले होते तेव्हा मितेश ने त्यांना थोडी स्टोरी वाचून दाखवली .ती त्यांना फार आवडली .त्याच्या लिखाणाची शैली फारच वेगळी होती.त्याचा शब्द आणि शब्द वाचणाऱ्या च्या मनाचा ठाव घेत असे..प्रत्येकाला त्याच्या कथा वाचताना,जणू आपण आपल च आयुष्य जगतो आहोत अस फिल होत असे.सहज सुलभ लेखन शैली आणि रोमँटिक लव स्टोरीज लिहिण्यात त्याचा हातखंडा होता,त्यामुळे तमाम तरुणाई च्या गळ्यातला तो ताईत बनला होता.कित्येक तरुण मुलींचा तो क्रश होता भरपूर मुली त्याला डायरेक्ट प्रपोज करत असायच्या.


आर्या,मला थोडे बोलायचे होते तुझ्या सोबत..समीर चा तिला कॉल आला होता.

आता बोलण्या सारखे काय शिल्लक राहिले आहे का समीर.?

आर्या,एकदा भेट तरी..आपण बोलून काही गोष्टी सॉर्ट आऊट करू शकतो ना.

मला त्याची गरज वाटत नाही समीर.तुझे नाव खराब व्हायला नको म्हणून तुला आपला डीओर्स नको आहे...खरे आहे का हे?

आर्या,आता सगळ कस कॉल वर बोलता येईल.प्लीज भेट मला.मी येवू का तिकडे.?

समीर मी सांगते तुला.मग भेटू आपण.

आर्या चा मुडच गेला.त्याच्या फोन मुळे.तिने व्हॉटस अप पाहिले मितेश चे चार पाच मेसेज आले होते. पण आता तरी ती ते वाचण्याच्या मुड मध्ये नव्हती.


क्रमशः #Author of the year २०२२



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract