साथ दे तू मला (भाग 24)
साथ दे तू मला (भाग 24)
आर्या अजून च त्याला बिलगली.दोघे चांगलेच भिजले होते.
आता पावसाचा जोर वाढला तसे ते दोघे सज्जा कोठी च्या जिन्यावर पायऱ्या वर बसले.आर्या मितेश च्या मिठीत होती.थंडी ने कुडकुडत होती.त्याने पुन्हा एकदा तिला डीप किस केला.आपल्या मिठीत घट्ट पकडुन ठेवले तिला.
थोडा पाऊस कमी झाल्यावर ते दोघे एका हॉटेल मध्ये गेले.आर्या ,थंडीने गारठली होती.तिच्या केसा मधून पाण्याचे थेंब ओघळत होते.मितेश ने बेड वर ठेवलेला टॉवेल घेतला आणि आर्या जवळ गेला.तिला हात पकडुन बेड वर बसवले आणि स्वतः टॉवेल ने तिचे केस कोरडे करू लागला."मितेश,राहू दे..मी करते दे टॉवेल माझ्या कडे.
आर्या,असू दे,मी करतो आहे ना..तू शांत बसून रहा.
आर्या मग काहीच बोलली नाही.मितेश तिच्या समोर इतका समीप उभा होता.त्याच अस जवळ असण तिला कसे तरीच होत होते.त्याला आपल्या समोर बघून ती बावरली होती,तिने आपले डोळे बंद केले.केस पुसत पुसत मितेश तिच्या कडे बघून हसत होता.त्याला तिच्या कपाळाचे चुंबन घेण्याचा मोह झाला.त्याने टॉवेल बाजूला ठेवला आणि आपले उष्ण ओठ तिच्या कपाळावर ठेवले.अंगातून जणू एक करंट पास झाला अस आर्या ला वाटले.तिने डोळे उघडून त्याच्या कडे पाहिले.मितेश ने आपल्या ओंजळीत तिचा चेहरा पकडला आणि तिला अलगद ओठावर किस केले.त्याचा उष्ण स्पर्श आर्या ला हवा हवासा वाटत होता.तिने त्याला आपल्या अजून जवळ ओढले.एकमेकांच्या सहवासात त्यांच्या कपड्याचा अडसर कधी दूर झाला हे त्या दोघांना ही नाही समजले.
सॉरी,आर्या मितेश तिच्या शेजारी झोपला होता.
व्हॉय यू से सॉरी मितेश..सहज घडून गेले हे सगळे आय डोन्ट माईंड.
खरच आर्या?
"कुछ ये मौसम बेइमान हो गया.
पता ना चला,कैसे दिलं को संभाले भला.
तेरी दिवानगी का ये असर, कुछ गुस्ताखी ये दिल कर गया "!!(sangieta)
वा...मितेश इट्स ॲसम..आणि काही
इतकं नको मनाला लावून घेवूस. रायटर च असा इमोशनल व्हायला लागला तर कसे होणार..बुद्धू..आर्या ने त्याच्या गाला वर किस केले.
दोघांनी मग रूम मध्येच ड्रिंक आणि जेवण ऑर्डर केले.पुन्हा थोडा वेळ फिरून ते कोल्हापूरला यायला निघाले.
आर्या ला घरी सोडून मितेश हॉटेल कडे आला.आजचा दिवस खूप आनंदात गेला होता .आर्या सोबत च्या गोड आठवणी घेवून तो पुण्याला उद्या जाणार होता.फोन मधील आर्याचे फोटो तो बघत राहिला.खूप वर्षा नंतर त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचा बहर आला होता.मितेश खुश होता.
"ये कैसा नशा,ये कौन सा मोड है जिंदगी का.
हर लम्हा,हर पल एहसास दे रहा है,तू मेरा होने का."(sangieta)
रात्री त्याने निखिल ला हॉटेल वर बोलवून घेतले.एकत्र दोघांनी डिनर केले.मितेश आर्या बद्दल च जास्त बोलत होता.आणि त्याला अस खुश बघून निखिल आनंदी झाला.मनातच त्याने देवाचे आभार मानले,म्हणाला,"देवा माझ्या या मित्राचा आनंद,त्याच हासू असच कायम असू दे.कोणाची नजर नको लागायला.".
सकाळी मितेश पुण्याला निघणार होता.लॅपटॉप घेवून तो पुढची कथा लिहू लागला .थोडा वेळ तो लिहीत बसला.मग अचानक त्याला आर्यांची आठवण आली तसे त्याने मगाशी सुचलेली शायरी तिला सेंड केली.
आर्या चा लगेच च मेसेज आला,ओपन द डोअर रायटर,अँड सि द सरप्राइज आऊट साइड.
त्याला समजेना की ही असे काय म्हणते..तो विचार करतच दारा कडे गेला आणि त्याने दार उघडले.
ओहह. तू? व्हॉट अ प्लेझंट सरप्राइज आर्या.!
हा,मग तुला काय वाटले की मी खोटा मेसेज केला.?
ह्ममम..ये आत ये.त्याने दार बंद केले.
काय करत होतास ? बेड वर बसत आर्या ने विचारले.
काही नाही स्टोरी पुढे लिहीत होतो.
मग मला दे ना वाचायला.
ना,आता नाही पूर्ण झाल्यावर..
तो काही ऐकणार नाही हे तिला माहीत होते म्हणून ती गप्प बसली.
ये हॅलो काय अशी गप्प का झालीस. आर्या,स्टोरी पूर्ण झाली की पहिल्यांदा तुला वाचायला देईन.ओके.
ओके हसतच आर्या म्हणाली.
दोघांनी मग खूप गप्पा मारल्या आईसक्रीम खाल्ले .रात्री चे अकरा वाजत आले होते , आर्या घरी जायला निघाली.
मितेश कॅन आय गो?
मितेश तिच्या जवळ आला,तिचे हात आपल्या हातात पकडत म्हणाला,नो स्वीहार्ट.. डोन्ट गो.आय मिस यू लॉट.
मिस यू टू मितेश..मला लेट होतोय.प्लीज.
मितेश चे मन जड झाले,त्याने तिचे हात सोडले.
मितेश सकाळी कॉल कर निघताना.अँड टेक केयर.तिने त्याला गालावर किस केले तो स्तबध उभा होता तिला निरोप देणं त्याला अवघड होते.पुन्हा कधी आर्या भेटणार माहित नव्हते.
आर्या दारा कडे गेली मितेश तिथेच उभा होता तिने मागे वळून त्याला आवाज दिला ..मितेश.
त्याने तिच्या कडे पाहिले,काय झाले आर्या?
तशी ती काहीच न बोलता त्याच्या मिठीत आली आणि त्याला घट्ट बिलगून रडू लागली.मितेश तिच्या डोक्या वरून हात फिरवत होता.
आर्या,तू अशी रडलीस तर उद्या माझा पाय कसा निघेल इथून.मला म्हणतेस ना..इमोशनल नको होऊ मग आता तू काय करतेस हे.
आर्या ने त्याचे कडे पाहिले,मितेश आय कान्ट लिव्ह विदावूट यू..आय नीड यू.
आय नो आर्या..आपण भेटू ना लवकरच. पण आता नको ना तू रडू अशी..त्याने तिचे अश्रू पुसले. स्वीहार्ट,मला तुझा हसरा चेहरा माझ्या डोळ्यात घेवून जायचा आहे.. नॉट धिस सॅड फेस..ओके.
हू...आर्या इतकंच बोलली.
मग हास बघू आता..मितेश ने तिला पोटाला गुदगुल्या केल्या,तशी ती हासू लागली.
दॅट्स लाईक माय गर्ल..मितेश ने हळूवार तिला किस केले.मी येवू सोडायला घरी.
नको मी जाईन . दहा मिनिटात पोहचेन.
श्यूअर?
हो मितेश नको काळजी करू.
पोहचली की मेसेज कर.आर्या घरी गेली.
मितेश बेडवर सुन्न मनाने बसून राहिला
"तेरी दुरी का दर्द,कैसे हम बया करे,?
तुझं बिन जीं ना सके, मरना सके."(sangieta)
(क्रमशः)

