STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

साथ दे तू मला (भाग २)

साथ दे तू मला (भाग २)

3 mins
148

ऍक्च्युलि मी कोल्हापुर ची थोडेच दिवस पुण्यात होते. ओके म्हणत मितेश पुन्हा मोबाईल बघू लागला.आर्याला मितेश हे नाव कुठेतरी ऐकल्या सारखे वाटत होते. रायटर मितेश ती आठवण्याचा प्रयत्न करू लागली. आणि अचानक तिला आठवले. येस तोच हा असा मनात विचार करत ती त्याला म्हणाली,एक्सक्युज मि त्याने तिच्या कडे पाहिले. लास्ट मंथ मध्ये तुमच्या कविता संग्रहाचे पब्लिकेशन सिझनस मॉल मध्ये झाला होता रेड एफ एम सोबत एम आय राईट?आणि कविता संग्रह होता ” चांदण्याची बरसात एक रात”. तो हसला येस एकदम बरोबर. हा मग मी माझ्या मैत्रिणी सोबत त्या कार्यक्रमाला आले होते. माझी मैत्रीण तुमची जबरदस्त फॅन आहे तिनेच मला तो कविता संग्रह वाचायला दिला होता. खूपच छान कविता आहेत तुमच्या. ओहह थँक यु सो मच. पण आता मी तुम्हाला ओळखलेच नाही एकदाच पाहिले होते ना तेव्हा सो. इट्स ओके आय एम ओन्ली अ रायटर नॉट अँन अक्टर सो ईट इज पॉसीबल दयाट वेरी फ्यु वूड नो मि. मितेश म्हणाला. हो ते तर आहेच. नाईस टू मिट यु आर्या. मि टू आर्या बोलली. पण एक विचारू का राग येणार नसेल तुम्हाला तर? हो विचारा ना. तुमच्या कविता संग्रहातील सगळ्या कवीता सॅड च आहेत असे का? त्यातून असच जाणवत की यु हर्ट सो मच. कसे असते ना मिस ,आम्ही रायटर जे काही लिहितो ते थोडं अनुभवलेल काही काल्पनिक अस असत. मग कुठेतरी एखादी घटना आठवते मग त्या प्रवाहात तीच भावना कागदावर उतरते सो आणि लेखकाच्या मनात जे येत ते त्याच्या लिखानातून बाहेर पडत ते त्यानं अनुभवलंच असेल असं नसत. मितेश म्हणाला. ओके पण एकदम हार्ट टचिंग कविता आहेत तुमच्या. हो बाकी माझ्या काही कथा या छान हॅप्पी ऐडिंग वाल्या पण आहेत. सगळच हार्ट टचिंग नाहीत.


ओके मी जरूर वाचेन. आर्या बोलली. तो फक्त तिच्या कडे बघून हसला आणि परत मोबाईल मध्ये गुंतला. पण त्याच्या मनात विचार चालू होते की खरच आपल्या लिहिन्यातून आपण आपलं दुःख तर मांडत नाही ना? का नाही आपण कँट्रोल ठेऊ शकत मनावर? किती ही नाही म्हंटले तरी मनातलं दुःख कागदावर येतेच येते हम्मम. हे होणारच होत. कारण तो खूपच सेंटी होता. आणि जेव्हा जुई त्याच्या आयुष्यातुन गेली तेव्हा पासून जास्तच भावूक बनला होता. तो आणि त्याच काम इतकंच जग होत त्याच. पण प्रेम या भावनेला पूर्णपणे जपणारा प्रेमाचा आदर करणारा असा तो होता. सो लिहिण्या मुळे कुठे तरी तो हलका होत होता. फोन बंद करून त्याने खिशात ठेवला. त्याने सहज आर्या कडे पाहिले ती फोन मध्येच बघत होती पण थोडया तिरक्या नजरेने ती त्याला न्याहळत होती.जसा तो तिच्या सौदर्यानें तिच्या कडे पाहण्याचे टाळू शकत नवहता तसाच तो ही होता ना . अगदी सहा फूट उंच टोकदार नाक,गोरा रंग ,उभा चेहरा आणि त्याला मर्दाना लूक देणारी त्याची फ्रेंच कट दाढी. कोणती ही मुलगी त्याला वळून पुन्हा पाहायचीच पाहायची. रुबाबदार पर्सनॅलिटी होती त्याची सो आर्या ही त्याला चोरून पहात होती. त्याने ते ओळखले. तो गालातल्या गालात एकटाच हसत राहिला. आणि डोळे मिटून पडून राहिला. आर्याचा फोन वाजला तिने पाहिले रेणू चा फोन होता तिची बेस्ट फ्रेंड. हॅलो बोल रेणू. अग कुठे आहेस आणि सकाळ पासून  तुझा फोन का बंद आहे


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract