कू.शुभम संतोष केसरकर

Abstract Horror

3  

कू.शुभम संतोष केसरकर

Abstract Horror

रहस्य !!

रहस्य !!

10 mins
741


एप्रिल चा महिना जणू मुलांसाठी तारेवरची कसरत म्हणावी कारण त्यापैकी एक उदाहरण आमच्या घरीच असतो , मार्च पर्यंत आमचे साहेब खेळत राहणार आणि त्यानंतर आमच्या सर्वांची झोप मोड करून नुसती रात्र जागवणारा म्हणजेच तो असं दाखवणार की फक्त ह्या जगात तोच जणू अभ्यास करतो .ते कसं , अरे किशोर झोप रे ! तुझ्या पप्पांना उद्या कामावर जायच आहे त्यांना झोपुदे तू दिवे घालव बघू , एवढं आम्ही बोलो की त्याचं रागवणं स्वाभाविक पण तो रागवतच नाही तर दिवे बंद करून काळोखात अभ्यास करायला बसतो त्यामुळे मी त्याला काहीच बोलत नाही कारण त्याला आधीपासून अभ्यास कर म्हणून सांगितले तरी त्याला काहीच फरक पडत नाही व साहेबांचा राग हा नेहमी त्यांच्या नाकावरच टिपलेला असतो . रात्र जागवून व दिवस उलटून त्याची परीक्षा अखेर संपली . मग आता काय वेळ आली ती मजा करण्याची व त्याच बरोबर संपूर्ण घर डोक्यावर घेण्याची त्याचा असा अर्थ " आई-बाबा चला ना कुठे तरी जाऊया , मला तुम्ही फिरायला घेऊन चला जर तुम्ही असं केलं नाही तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही , आणि पुढच्या वर्षी पासून मी शाळेत सुद्धा जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा ."


त्याला कितीही मी समजून सांगितलं तरी पण ह्यांच्या कामावर सुद्धा खूप लक्ष द्यावे लागते . त्याचा वाढणारा फुगवा हा मी दिवसेंदिवस बघत होते पण त्यावर काही भाष्य करण मला काही जमलं नाही , जर मी काही बोले असते तर त्याचे बोलणे हे पुन्हा त्याचप्रकारे सुरू झाले असते त्यामुळे त्यास्थितीत मला मौन बाळगणे हे त्यातल्यात्यात सोयीस्कर वाटले. पण अचानक हा होईना त्याचे मित्र माझ्याजवळ आले व त्यांनी माझी सगळी चिंता दूर केली ते अस की " काकी आम्ही सगळे मित्र मिळून जयेशच्या गावी जाणार आहोत , किशोरला आम्ही त्याबद्दल विचारलं आहे व तो ही येण्यास आतुर आहे तर आम्ही त्याला घेऊन जाऊ का?? "हे सर्व ऐकताच जणू माझ्या डोक्यावर असणारे सर्व ओझे हलके झाले सारखे वाटले पण त्यातल्या त्यात एक चिंतासुद्धा मला सतवत होती ती म्हणजे किशोरला एकटं पाठवण्याची !! पण किशोरची तयारी पूर्ण झाली होती त्यामुळे त्याला मी काहीच बोलू शकत नव्हते पण त्याव्यतिरिक्त तो फिरण्यासाठी जात आहे ना त्यात मला आनंद होता. पहाटे तो जयेशच्या गावी जाण्यास निघाला व त्याला होणारा आनंद मला पुरेपुरे दिसत होता. पण त्याच्या जाण्याने हे घर अगदी शांत व ओघळणाऱ्या झऱ्याचा आवाज येईल इतके शांत होते पण असो त्याची इच्छा पूर्ण झाली ह्यातच मला आनंद.


पूर्ण दिवसभरात तो माझ्याशी दूरध्वनी मार्फत संपर्क करायचा व कधी मला वेळ भेटला तर मी त्याच्याशी बोलायचे . आठवड्याभर हे सर्व सुरळीत चालू होते पण हा होईना कधीतरी मनात एक वेगळीच भीती उमजत होती व नेहमी रुखरुख लागून बसायची व काळजी सुद्धा वाटायची . पण कोण जाणे मागील आठवड्यापासून त्याचा एकही कॉल आलेला नाही व मी त्याला केला तरी फोन त्याचा काही लागेना . काही दिवसांपासून मनात जी रुखरुख चालू होती ती ही तर नाही ना असे व अनेक प्रश्न त्यावेळी मला पडत होते . त्याचा मित्रांचेही फोन त्यावेळी लागत नव्हते , मनात फक्त एकच विचार चालू होते नक्की हे सर्व गेले कुठे असतील . मीच नव्हे तर आम्ही सर्व (मी व त्यांच्या मित्रांचे आई-वडील ) विचलित व चिंताअभावी गेलो होतो . दोन -तीन दिवसांच्या आतुरते नंतर मला किशोरच्या मित्राचा फोन आला व " तो म्हणाला की आम्ही उद्या सर्वजण येत आहोत , तुम्ही कोणीही काळजी करू नका , आम्ही आल्यावर सर्व काही सांगतो पण काकी तुम्हाला एक सांगायचं होत की किशोर……… " (इतक्यात फोन बंद झाला) मी त्याला काही विचारण्याच्या आताच दुसऱ्या बाजूने येणारा आवाज हा बंद झाला .


मी पुन्हा त्यांच्या दूरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते पण ते सर्व अयशस्वी ठरले , काळजी पोटी जणू माझी झोपच संपली होती कारण शेवटी त्याला किशोरबद्दल काय सांगायचे होते ते मला कळू शकले नव्हते . एका आईला वाटणाऱ्या आपल्या मुलाची काळजी जणू आज मला जगू देत नव्हती , तो संपूर्ण दिवस जणू माझ्यासाठी काळाचा आघात म्हणाले तर त्यात काही खोटं ठरणार नाही. रात्रभर हा आमचा जीव नुसता वर-खाली होत होता , अन्नाचा एक घास देखील गळ्याखाली उतरत नव्हता. किशोर ला पाहण्याची इच्छा शिगेला पोहचली होती. किशोर ला कधी मी माझ्या डोळ्यांनी पाहते असं वाटत होतं व अखेर दुसऱ्या दिवशी दुपारी तो घरी आला , त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती वाटत होती , माझ्याशी एक शब्दही न बोलता तो जाऊन स्वतःच्या खोलीत गेला .


तो येतो की नाही ह्या बाबतीत मी आधीच संभ्रमात होते व तो आल्यावर सुद्धा त्याने आपली ओळखही नाही दाखवली आता मी ह्या बाबतीत त्याला कसं समजू असा प्रश्न माझ्या मनात खळबळत होता. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी काय घडलं व त्यामागची नेमकी कारण कोणती हे शोधुन काढणं माझ्यासाठी एक आव्हानच आहे . त्याच्या मित्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सुरवातीचा एक आठवडा आम्ही सर्व मस्ती-मज्जा करत होतो व किशोरही आमच्यासोबत होता व तो ही आनंदी होता , त्याकाळात आम्हाला त्याच्यात कोणताही फरक जाणवला नाही . पण का होईना काही दिवसा अगोदर तो अचानक एकदम विचित्रपणे वागायला लागला होता , कोणाशी कधी बोलायचा नाही , स्वतःच्या धुंदीत तो नेहमी मला दिसत असायचा. आम्ही सर्वांनी विचारलं तरी तो घाबरून त्याला रडू यायचं. आम्ही सर्वांनी ठरवलं की उद्याच आपण आपल्या घरी जाऊ पण त्याच वेळी गावी अचानक बदलेल्या वातावरणामुळे आम्हाला तिकडे काही दिवस थांबावे लागले व तुम्हा सर्वांना सांगण्यात इतक्यात इथे नेटवर्कची अडचण येत होती त्यामुळे तुम्हा कोणालाही आमचा संपर्क होत नव्हता व जेव्हा गावी वातावरण सुधारले तेव्हा आम्ही तिथून निघालो त्यामुळे किशोर ला नक्की काय झालं ते आम्हाला सुद्धा माहीत नाही असे किशोरच्या मित्रांनी आम्हाला सांगितलं.


नक्की त्याच्यासोबत काय घडलं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आमच्याशी हसत खेळत राहणार मुलगा आज काहीच बोलत नाही आहे , स्वतःमध्येच तू गुंतलेला आहे , नक्की करावे तरी काय? विहरणारे हे क्षण व त्यामुळे आमच्यात निर्माण होणारा दुरावा दिवसेंदिवस वाढत चाला आहे. गेले २-३ दिवस आम्ही त्याला सतत विचारण्याचा प्रयत्न करतोय व त्यास तो काहीच उत्तर देत नाही आहे . त्याला आम्ही प्रथमतः एका विशेषज्ञाकडे घेऊन गेलो पण त्यांच म्हणणं असं होतं की तुम्ही एक काम करा, किशोर ज्याठिकाणी गेला होता , त्याठिकाणी त्याला पुन्हा घेऊन जा व तुम्हाला काही किशोरमध्ये काही मानसिक बदल जाणवले तर मला नक्की कळवा . आम्हाला वाटणाऱ्या अस्वास्थे भूमिकेमुळे आम्ही क्षणांचाही विलंब न करता किशोर ला त्यागावी घेऊन गेलो व तिथे असणाऱ्या प्रत्येक ठिकाणा जवळ आम्ही त्याला घेऊन गेलो पण त्याचाही ही त्याला काहीच फरक पडला नाही , पण आम्ही जेव्हा एका रस्त्यावरुन येत होतो तिथे कसे जणू अचानक किशोरला रडू कोसळले व तो एकदम घामाघूम झाला.


 आम्ही त्याला विचारलं " किशोर काय होतंय तुला, कोणी घाबरवतय का तुला ?? असं असेल तर सांग बरं आम्हाला ", पण आम्ही काही दुसरं विचारू तेवढ्यातच तो धावत तिथून निघून गेला . त्या कालावधीत आमच्या दोघांच्याही लक्षात आले होते की नक्की ह्या ठिकाणी काही तरी त्याच्यासोबत घडून गेले आहे . दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे घराजवळील असणाऱ्या शेजाऱ्यांकडे जाऊन विचारलं पण हाती काहीच आले नाही कारण आम्ही ज्या ठिकाणचा उल्लेख त्यांच्याकडे केला ते ऐकून जणू त्यांनी सुद्धा अबोला धरला व आम्हाला ही तिथे न जाण्यास सांगितले. गावातील जवळ जवळ सर्व शेजाऱ्यांकडे आम्ही विचारपूस केली व हाती कोणतेही निष्पन्न आले नाही . आम्ही जेव्हा निराशेच्या भावनेने पुन्हा घरी येत होतो तेव्हा ते ठिकाणा लगतच आम्हाला एक झोपडी दिसली , मी ह्यांना बोलले की आपण एवढी घर बघितली त्यात अजून एक बघू व आपल्या मनात निर्माण होणाऱ्या शंकेचे निरासरण करू , आम्ही त्या ठिकाणी गेलो व त्या ठिकाणी एक दाम्पत्य राहत होते व ते वरिष्ठ व वृद्ध होते . त्यांना जेव्हा आम्ही ह्यासर्व गोष्टीबद्दल सांगितलं , तेव्हा का जणू त्या दोघांनाही अचानक रडू आलं , जेव्हा आम्ही त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की " तुमच्या मुलाने जे काही पाहिलं ते आमच्याशी जोडून आहे, त्यात तो काही खोटं बोलला नाही.


मी एका क्षणाचाही विलंब न करता किशोर ला त्यांच्याकडे घेऊन आले व त्यांनी किशोर ला विचारले असता त्याच्या बोलण्याने कोणी दुसरंच बोलतोय असं वाटलं व आम्ही त्याचे आई-बाबा असून तो त्यांना आई - बाबा म्हणून उच्चारत असे , आम्ही दोघे ह्यासर्व गोष्टी पाहून थक्क व आश्चर्यचकित झालो . किशोर एका मोठया मुलाप्रमाणे त्यांच्याशी बोलत होता , एक शाळेत जाणार मुलगा अचानक एका मोठ्यामाणसाप्रमाणे बोलतोय हे पाहूनच आम्ही काही क्षण सुन्न झालो. जेव्हा त्या दाम्पत्यानी ह्या होत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल कोडी आमच्यासमोर मांडली तेव्हा आम्ही ह्या सर्व गोष्टींबद्दल समजलो. त्यांच्या म्हणण्यानुसार " किशोरच्या आवाजात जो कोणी बोलत आहे तो माझा एकुलता एक मुलगा विजय आहे. नोकरीनिमित्त शहरात वास्तव करणारा माझा मुलगा काही वर्षांपूर्वी ह्या गावी आम्हाला भेटण्यासाठी म्हणून आला , त्याने जेव्हा घरात पाऊल ठेवले तेवढ्यातच मला वाटले की हा कोणत्यातरी अडचणीमध्ये अडकला आहे , त्याच बोलणं , त्याच वागणं व घरी आल्यावर त्याच्या मनात असलेली भीती ह्यासर्व बघूनच मला संशय आला होता . मी काही दिवस त्याला काही विचारले नाही , पण एक दिवस तो स्वतःहून माझ्याजवळ आला आणि बोला " आई गं , मी पुन्हा त्याशहारात नाही जाणार , मला खूप भीती वाटत आहे , ती लोक मला नाही सोडणार , माझा जीव घेतील ती लोक , नको मला पाठवू शहरात आई ", असा जीवाच्या आकांताने ओरडत होता व म्हणत होता की मी हवं असेल तर इथे राहीन व बाबांन सोबत शेती करेन व तुमच्या दोघांचा सांभाळ करीन , फक्त तुझ्या मुलाला तुझ्यापासून दूर नको करुस ". मी त्याला कधीही अश्या मनस्थितीत बघितले नाही व हे सर्व ऐकून मला एकदम धक्काच बसला , कधी एकदा तो शहरात जाईन म्हणून आमच्याशी भांडायचा व जेव्हा त्याला आम्ही पाठवलं तेव्हा हे असं . पण दोन तीन दिवसानंतर का होईना तो अचानक पहाटे घरातून न सांगता निघून गेला. आमचा असा भास झाला की तो पुन्हा शहरात गेला असावा , पण तो कधीही न सांगता असा कधी गेला नाही नक्की आम्ही तरी काय समजावे??


ह्याचा विचार पण त्याने केला नाही . आम्ही सैरभैर प्रमाणे त्याला सगळीकडे शोधत आहे , त्याला संपर्क सुद्धा करत आहे पण त्याचा काहीच पत्ता लागत नाही आहे. त्याच्यासोबत राहणाऱ्या त्याच्या मित्रालासुद्धा विचारलं पण त्याच्याविषयी कोणतीही माहिती मला मिळाली नाही. आमच्या प्रतिक्षेचा बांध जणू संपत होता. दिवसांवर दिवस उलटून गेले व पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही , आम्ही आमचं सर्वस्व हरून बसलो अशी भावना आमच्या मनात येत होती कारण त्याच्याशिवाय आमचं कोणीही नव्हतं , आम्ही जगावं तर कोणाच्या भरोस्यावर व आम्हाला धीर द्यायचा तरी कोणी असे व अनेक प्रकारचे प्रश्न आमच्या दोघांच्या मनात पडत होते व काही दिवसांनी गावकऱ्यांनी त्या रस्त्यालगत असणाऱ्या झाडावर विजयने स्वतःला गळफास घातलेला बघितला व त्यांनी आम्हाला लगेच ह्यागोष्टीबद्दल लगेच सांगितलं व आम्ही काही क्षणांचाही विलंब न करता त्या ठिकाणी पोहचलो , व ते दृश्य बघताच क्षणी मी खाली कोसळले व जेमतेम दोन तासानंतर मला जाग आली , त्यावेळी किशोर माझ्या जवळच तो मृतावस्थेत झोपला होता , मी माझ्या जीवाच्या आकांताने ओरडत होते व काहीच क्षणी त्याचे अंतसंस्कार सुद्धा पार पडले . ह्यासर्व घटनेबद्दल आमच्या येथील स्थानिक पोलिसांनी ह्या गोष्टीची चौकशी केली असता त्याची "हत्या" झाल्याचे उघडकीस आले व ही हत्या २-३ दिवसांपूर्वीच केल्याचे समजले .


पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांच्या असे लक्षात आले की , त्यांच्यासोबतच काम करणाऱ्या व्यक्तींनी चोराच्या आरोपाखाली कोणतीही विचारपूस न करता त्याची हत्या केली ह्याची कबुली त्यांनी दिली व आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले . सुरवातीचे काही महिने आम्हाला असच वाटायचं की तो व्यवसायनिमित्त बाहेर गेलाय पण त्यालगतच काही महिन्यांनी आम्ही आमची समजूत काढली , ह्यासर्व गोष्टी आमच्यासोबत होऊन गेल्या व ह्या घटनेस कमीतकमी दोन वर्षपूर्ण झाले. अचानक तुमच्या मुलासोबत ह्या सर्व गोष्टी होणं अगदी आम्हालाही आश्चर्यजनक आहे. आम्हाला व त्यांना सुद्धा ह्याबाबतीत काहीच माहिती नव्हते .


आम्ही क्षणांचाही विलंब न करता लगेच शहराकडे रवाना झालो व किशोरच्या डॉक्टरांना जाऊन भेटलो व त्यांना पूर्ण हकीकत सांगितली ते ऐकून ते म्हणाले की ह्यासर्व गोष्टी निव्वळ संयोग असावा , किशोर चे त्याठिकाणी जाणे व विजयचा त्याठिकाणी खून होणे हा त्यातल्यात्यात संयोग असावा , आमच्या वैद्यकीय अभ्यासात आम्ही देवधर्म मानतो पण अंधश्रद्धा आम्ही कदापि मानत नाही , त्याला कोणती भूतबाधा झाली असावी त्यामुळे तो असा वागत आहे त्यात आम्ही मानू शकत नाही , जर एक व्यक्ती दुहेरी भूमिका करत असेल तर त्यास " Multiple Personality Disorder " असे म्हणतात व त्याचे उपचार आम्ही करतो . ह्या सर्व गोष्टी ते सांगत असताना मला एक गोष्ट आठवली व मी त्यांना सांगितले , डॉक्टर मला एक बोलायचं होत , की त्याठिकाणी जाऊन आल्यानंतर किशोरचे वागणे हे पूर्वी प्रमाणे होऊ लागले व त्यास कोणताही त्रास होत नाही आहे असे मला जाणवत आहे व त्याला मी विचारले की ह्याआधीच तुला काही आठवतंय का?? तर तो बोला नाही आई , मी मित्रांसोबत गावी गेलो होतो ना व त्यानंतर मी घरी आलो बस , अजूनकाही झालं होतं का आई? असा विपरीत प्रश्न त्याने मलाच विचारला . मी बोलेलले वाक्य ऐकून डॉक्टर अगदी संभ्रमात व चकित झाले व त्यांचाही ह्या सर्व गोष्टीवर विश्वास बसत नव्हता . पण त्यांनाही त्यागोष्टी ऐकून आनंद झाला , पण त्यांच्याही मनात त्या घटने संदर्भात एक गूढ रहस्य अजूनही येत असावे असे माझे वैयक्तिक मत आहे . पण एका आईच्या भावनेने त्याघटनेबद्दल बोलावे तर ते एक आई-मुलाबद्दल प्रेम असावे , मुलाच्या बाबतीत जीवघेणा प्रसंग होणे व त्याला भेटण्यासाठी आईची होणारी धावपळ व अचानक मुलाचे आपणास सोडून जाणे हे सर्व विचित्र प्रसंग कोणत्याच आई व मुलाबाबतीत होऊ नये असे मला वाटतं . विजयची देखील एक इच्छा होती की स्वतःच्या आईला भेटावे व तिच्या कुशीत झोपावे पण काही कारणावास्तव हे शक्य होऊ शकले नाही ह्याचीच मला खंत वाटते पण माझ्या मुलामुळे त्याला स्वतःच्या आईस भेटता आले हे सुद्धा तितकेच महत्वाचे होते , पण त्या रस्त्यावरील कोडे अजूनही सुटलेले नाही व हे अजूनही रहस्य म्हणून कायम आहे .


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract