Manda Khandare

Abstract Tragedy

4.0  

Manda Khandare

Abstract Tragedy

रे प्रजातंत्रा

रे प्रजातंत्रा

5 mins
212


रे प्रजातंत्रा! , काल परवा तू 72 वर्षाचा झालास म्हणे! म्हणजे वार्धक्याकडे तुझी वाटचाल सुरू झाली आहे तर!म्हणजे आता तुझ्या ही हाती काठी आली असणार ना?आणि त्या काठीला तु कितीतरी अनुभवाच्या गाठी शिदोरी सारख्या बांधल्या असतील.तुला हवे तेव्हा तू ती शिदोरी सोडून जगून घेत असणार हवे त्या क्षणात. तू कितीतरी लढाय़ा बघितल्या,सैनिकांचे मिशन्स फ़ते होताना तू बघितले. तो जिंकण्याचा हर्शोउल्लास, ते जिकडे तिकडे आनंदी आनंद वातावरण. देशभरात त्याचा उत्सव साजरा करणारे देशवासी... हे बघून तु किती सुुखावत असणार ना मनातून! तुला माहिती आहे ना,तुझ्या जन्माच्या वेळी गांधीजींनी अशीच हातात काठी घेऊन कितीतरी आंदोलने केलीत. त्यांनी याच काठीने इंग्रजांचा देशनिकाला केला. त्यांचे भारत छोडो आंदोलन तर माहितीच असेल तुला. दिडशे वर्ष आपल्यावर राज्य करणारे इंग्रज या काठीला घाबरुन पळून गेले होते. तर तिच काठी आता तुला ही हातात घ्यावी लागणार आहे. केवळ वय वाढले, वार्धक्याकडे जातो आहेस म्हणून नाही, तर देशात नुस्ती अराजकता माजली आहे म्हणून. म्हणून खऱ्या अर्थाने ती काठी आता तुझ्या हाती असायला हवी आहे कारण बघतो आहेस ना तु !देशात काय चालले आहे ते! आपल्या देशाला *सोनेकी चिडिया* म्हणायचे, ते कुणा मुळे? कुणाच्या मेहनतीवर?...... हो..... हो... याच शेतकऱ्यांच्या भरोशावर. याच बळीराजा च्या कष्टाने देशाला *सोनेकी चिडिया* म्हणत असत. धन धान्याने संपन्न असे राष्ट्र होते आपले. शेतकरी किती खुश होता तेव्हा. त्याच्या मेहनतीचा मोबदला भरपूर प्रमाणात मिळत होता त्याला. त्यामुळे तो खूप समाधानी होता. देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी त्याचा मोलाचा वाटा होता. आठवते ना तुला. *जय जवान जय किसान* चा नारा किती अभिमानाने साऱ्यांच्या मुखी होता. सीमेवरती जवान ऊन, वारा, पाऊस, हिमवृष्टी याची पर्वा न करता ते देशाचे रक्षण करायचे. तिच परिस्थिती आजही आहे बरे का!त्यात काही वादच नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता, डोळ्यात तेल घालून ते सीमेचे रक्षण करत आहेत. तू साक्षीदार आहेस प्रत्येक बाबींचा. फार अभिमान आहे, गर्व आहे आम्हाला आमच्या इंडियन आर्मी वर. *जय जवान जय किसान* मधे जवानांची तर अगदी मनापासून जय आहे प्रश्नच नाहीये. पण किसानांचे काय? त्यांची परिस्थिती तुला दिसत नाही का रे? किती हाल आहेत शेतकऱ्यांचे. जरा बघ त्यांच्या घरात, शेतात डोकावून. आता नाही म्हंटले जात रे आपल्या देशाला *सोनेकी चिडि़या*. ..ती चिडिया कुठेतरी उडून गेली.हरवली ती. कारण ओसाड पडलेल्या शेतामधे कशी थांबणार ती? कित्येक शेतकऱ्यांना तिने याच शेतामधे झाडावर लटकतांना बघितले आहे.त्याच्या केविलवाण्या पोराबाळांचा भूकेशी होणारा संघर्ष बघितला आहे तिने. आणि हे चित्र बघून तिच्याही पंखातील बळ नष्ट झाले असावे, आणि तिने ही असाच एखाद्या शेतात आपला प्राण सोडला असावा. हे कसे बघवल्या गेले रे प्रजातंत्रा तुला.? आतंकवादी हल्ले, बलात्कार, आत्महत्या, भ्रष्टाचार हे बघून जीव नाही का रे गुदमरत तुझा? 

          कालचेच बघ ना, काल तुझा वाढदिवस. कोरोना चे सावट अजून पूर्णपणे संपले नाहीये. पण तरी ही तुझा वाढदिवस अगदी सर्व ख़बरदाऱ्या घेत, काळजी घेत,तोंडाला मास्क लावून घरच्याघरीच, कुण्या विदेशी पाहुण्यांना न बोलावत चांगला साजरा करायचे ठरवले होते. काल सकाळी तुझ्या वाढदिवसानिमित्त मस्त जल्लोष झाला. राष्ट्रपतिजींच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. किती अभिमान वाटतो म्हणून सांगू तुला! तो हवेत फडकत असलेला झेंडा बघून .....आणि ती प्रत्येक राज्याची झाँकि किती सुंदर होती. सर्व काही नीट झाले. छान झाले. पण म्हणतात ना चांगल्या गोष्टीला लवकर नजर लागते तसेच काहीसे झाले बघ. त्या तुझ्या वाढदिवसाला ही असेच काहीसे गालबोट लागलेच.

       जवळ पास गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे मुक आंदोलन सुरू होते. गांधीजींनी जसे शिकविले होते अगदी तसेच, अहिंसेच्या मार्गाने. दिल्ली ची नोव्हेंबर, डिसेंबर ची थंडी तर तुला माहितीच आहे किती भयंकर कडाक्याची असते ते. या थंडीत ते शेतकरी आंदोलनाला बसले होते. त्यांचा हक्क त्यांना मिळवा म्हणून. पण सरकार त्यांच्या मुद्द्यांवर साधी चर्चा ही करायला तयार नव्हते. थंडीने जीव गमवावा लागला कुणाला तेव्हा सरकार चे लक्ष गेले यांच्या कडे. पण चर्चा करुन तोडगा काहीच निघाला नाही रे!. वाट बघून बघून शेतकर्यांनी शेवटी धमकीच दिली की, २६ जानेवारी ला लाल किल्ल्यावर ट्रयाक्टर रॉली घेऊन येऊ म्हणून. म्हणजे हे असे झाले बघ,एखादे लहान मुल असते ना जे शांतपणे खेळत असते, त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही. आणि त्याला वाटते, माझ्याकडे सर्वांनी बघावे, लक्ष द्यावे, माझे कोड कौतुक करावे म्हणून् मग ते लहान मुल विनाकारण रडायला लागते. तेव्हा कुठे घरातील सर्व मंडळी त्याच्या कडे धाव घेतात. नाना प्रकारे त्याला शांत करण्यासाठी प्रयत्न करतात, अगदी तसेच हे प्रकरण होते. थोडे वाद झाले यावरून पण शांततेत प्रदर्शन करू म्हणून सांगितले होते. यावर सरकार तयार झाले. खरे तर सरकारने विश्वास ठेवला होता. वाटले होते साधे प्रदर्शन करतील. आणि निघून जातील. पण झाले फ़ारच विचित्र. अनपेक्षीत पणे हजारोंच्या संख्येने ट्रयाक्टर घेऊन शेतकरी बांधव लाल किल्ल्यावर येऊन धडकले. दंगे करायला लागले. पोलिसांना मारहाण केली. तोडफोड केली. हे कमी की काय म्हणून त्यांनी चक्क तिरंगा काढून टाकला रे! आणि आपले दोन वेगवेगळ्या रंगाचे झेंडे त्या ठिकाणी लावले. किती लाजीरवाणी गोष्ट होती ही. ज्या झेंड्याला आपण नमन करतो. मान सम्मान देतो. आपला अभिमान समजतो, त्या झेंड्याचा तुम्ही अपमान करत असे (निर्लज्जपणे) त्याला खाली काढता. आणि ते ही 26 जानेवारी च्या दिवशी. तुलाही खूप वाईट वाटले असणार ना? साहजिक आहे म्हणा ते. पण खरे सांगू का हे जे काही झाले, त्यात केवळ आंदोलन करणारे शेतकरीच जबाबदार आहेत असे मला नाही वाटत. कारण शेतकरी असा हिंसक नाही होऊ शकत, हे तुला ही चांगलेच माहिती आहे. आणि मला ही खात्री आहे ते असे नाही वागू शकत. आपण त्या दिवशी दुपारी बघितले होते ना, ते न्यूज चैनल वाले शेतकऱ्यांच्या गाड्या थांबवून त्यांना विचारत होते, कुठे जात आहात? कुणी बोलावले इथे? कुणाच्या मार्गदर्शनाखाली ह्या रॅली निघाल्या आहेत तर त्यांना कुणाला काहीच माहिती नव्हते. कुणी बोलावले, कुणाच्या मार्गदर्शनाखाली हे सुरू आहे. म्हणजे आपण इथे का आलो आहोत हे सुद्धा माहिती नव्हते त्यांना........ काय म्हणावे याला. आंधळ्यासारखे एका पाठोपाठ एक निघाले सारे? डोके नसल्या सारखे......पण खरे सांगू का ही त्यांची चूक नाही. त्यांना कुणीतरी चुकीचे मार्गदर्शन करत होते. त्यांच्या खांद्यावर कुणीतरी बंदूक ठेवून आपला डाव साधत होते. आणि त्या बिचाऱ्या शेतकर्यांना माहित देखील नव्हते....किती हा आंधळा विश्वास म्हणावा. याला जबाबदार कोण आहे? केवळ सरकार नाही म्हणता येणार किंवा नुस्ते शेतकरी सुद्धा नाही म्हणता येणार. या दोघांमधे वाद व्हावे म्हणून तीसरेच कुणीतरी आपली भाकरी भाजून गेले आहे. याची दखल या दोघांनी घ्यायला हवी. तुला काय वाटते? सरकार काय निर्णय घेईल आता? कुणाला शिक्षा करेल? पुन्हा प्रश्न तोच, शेतकर्यांच्या मागण्यांचे काय? चोर सोडून संन्याशाला शिक्षा नको व्हायला. बस येवढीच अपेक्षा आहे. हो ना! तुझा वाढदिवस असा पहिल्यांदाच खराब झाला ना रे प्रजातंत्रा! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract