रडवेलं मन -१
रडवेलं मन -१


मनात आलं आणि मनं मारुन गेलं, भारावलं काही सुचेना व असं होतं नव्हतं झालं. का झालं कुणास ठाऊक , पण मला ठाऊक होतं, तरीही त्यावर काही करू शकत नव्हतो. असे अनेक सोबती येतात जीवनात हो - अटीतटीत आणि साथ देणारे-सोडणारे. त्यातही प्रेयसीची तर वेगळीच आकांक्षा बनते, प्रज्ञा असायला हवी होती ,आणि का नाही जीवनात असं अनेक वेळा घडतं. मात्र लेख लिहणारा आणि वाचणारं वाचक मन विचारतो माझ्याच मनाला की ; या जगात सुुखाच्या तुकड्यापेक्षा दुःखाचाच तुकडा मोठा दिसतो आणि मन म्हणते हो दिसतो ना पण मग मी काय करू ?
जगावे तरी कुणापरी आणि मरावे तरी कुणापरी ; शेवटी एवढंच देणं लागत. ही मराठी भूमी , भारत भूमी आणि आई न आप्त हेच तर आपले आणि त्यातही जीवनसोबती मिळवण्यासाठी उरलेली आशा आणि त्यातच या समाजाला असलेले कणभर हाताळू आपलं देणं जेणेकरून लोकांच्या मनात चिमूटभर तरी जागा करून जाता येईल . निस्वार्थी देणं जगलं पाहिजे हीच आशा ध्यानी मनी असून आठवणी उरल्या आणि उजाळा आता येणार माझ्या हातून समाज देणं घडण्यासाठी ही ज्ञानोपरी प्रज्ञा, शील, करूणा असावी ही साधना....